कोरोना : महाराष्ट्रातील 5 लाख नागरिक कोव्हॅक्सिन लशीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत - राजेश टोपे

राजेश टोपे

फोटो स्रोत, facebook

45 वर्षांच्या वरील नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी राज्याकडे मर्यादित साठाच उपलब्ध आहे, राज्यात सुमारे 5 लाख नागरिक कोव्हॅक्सीन लशीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांची पहिल्या डोसची वेळमर्यादा संपली असल्याने दुसरे डोस लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

राज्याला 45 वर्षांच्या वरील नागरिकांसाठी 9 लाख लस मिळाल्या होत्या. 8 लाख लशींचा वापर झाला आहे. आतापर्यंत राज्यातील 28 लाख नागरिकांना लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

45 वर्षांच्या वरील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्राने घेतलेली आहे. त्यामुळे ती लस लस आम्हाला उपलब्ध करून द्या, अशी मागणी टोपे यांनी केली. विशेषतः कोव्हॅक्सीन लशीसाठी 4 ते 5 लाख लोकांची वेळमर्यादा संपली आहे. जास्त वेळ झाल्यास पहिल्या लशीचाही चांगला परिणाम राहत नाही, त्यामुळे लवकरात लवकर कोव्हॅक्सीन देण्याची व्यवस्था करावी, असं राजेश टोपे म्हणाले.

कोव्हॅक्सीन लशीचा पहिला डोस आणि दुसरा डोस यांच्यात 60 दिवसांपेक्षा जास्त अंतर असता कामा नये. अंतर जास्त झाल्यास लशीचा प्रभाव दिसून येत नाही. शास्त्रीयदृष्ट्या ते योग्यही नाही. त्यामुळे केंद्राने लवकरात लवकर लस उपलब्ध करून द्यावी. केंद्राकडून लस मिळत नसल्यास राज्याच्या खर्चाने लस विकत घेण्याचं नियोजन करावं लागेल, असंही टोपे यांनी म्हटलं.

16 हजार पदांची भरती

कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान राज्यातील आरोग्य यंत्रणांवर ताण येत असल्याचं निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेवेळी मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी राज्याच्या आरोग्य विभागात 16 हजार पदांची भरती तातडीने करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

अ आणि ब वर्गातील प्रत्येकी 2 हजार तर क आणि ड वर्गातील सर्व मिळून 12 हजार कर्मचाऱ्याची भरती आरोग्य विभागात करण्यात येणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. गुरुवारी (6 मे) पत्रकारांशी संवाद साधताना राजेश टोपे यांनी ही घोषणा केली.

प्रत्येक जिल्ह्यात मनुष्यबळाची कमतरता आहे. आरोग्य विभागाला 50 टक्के पदभरती करण्याची परवानगी देण्यात आली होती. पण ती अपुरी असल्याचं आम्ही मंत्रिमंडळाला कळवलं होतं. त्यामुळे आम्हाला पूर्ण क्षमतेने पदभरती करण्याची परवानगी मिळाली आहे. एकूण 16 हजार पदे भरण्यात येतील.

मुख्यमंत्री स्तरावरच ही पदभरती करण्यात येणार असून त्यासाठी मंत्रिमंडळाकडे जाण्याची गरज नाही.

क आणि ड वर्गाच्या जागा विभागीय पातळीवर तर अ आणि ब वर्गातील पदे MPSC कडून परीक्षा घेऊन भरण्यात येतील, अशी माहिती टोपे यांनी दिली.

कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यास विलंब करणं शास्त्रीय पद्धतीला धरून नाही, असं राजेश टोपे म्हणाले.

कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस निर्धारित वेळेत द्यावाच लागतो, त्यामुळे त्यादृष्टीने केंद्राकडून लस वेळेत मिळवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. अन्यथा राज्याकडून स्वतः खरेदी करून हे डोस देता येतील का, याबाबत निर्णय घेण्यात येईल.

रेमडेसिवीर औषधाचंही न्यायपूर्ण पद्धतीने वाटप करण्याबाबत नियोजन करण्यात आलेलं आहे. कोणत्याही जिल्ह्यात नाराजी नाही. सर्व जिल्ह्यांना समान पद्धतीने वाटप करण्यात येत आहे, असंही टोपे यांनी सांगितलं.

तिसरी लाट येण्याची शक्यता

कोरोनाची तिसरी लाट जुलै-ऑगस्ट महिन्यात येण्याची शक्यता आहे. त्याची पूर्वतयारी राज्यशासनाकडून केली जात आहे. प्रत्येक जिल्ह्याला त्याबाबत स्पष्ट सूचना दिलेली आहे. बेड, ऑक्सिजन तसंच मनुष्यबळाच्या बाततीत आपण सज्ज असलं पाहिजे, असे आदेश आरोग्य मंत्री या नात्याने मी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

रेमडेसिवीर औषधखरेदीसाठीची परवानगी लवकरात लवकर घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. नव्या ऑक्सिजन प्लांटचे प्रस्ताव तपासण्याचं काम टास्कफोर्सला दिलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)