IPL 2021 : कोरोना विषाणू आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कसा घुसला?

कोरोना बायो बबल

फोटो स्रोत, Getty Images / Orbon Alija

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

इंडियन प्रीमियर लीगमधल्या खेळाडूंना कोरोना विषाणूची लागण झाली आणि आता या स्पर्धेचा चौदावा हंगाम स्थगित करावा लागाला आहे.

पण ही वेळ कशामुळे आली? आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव कसा झाला? असे प्रश्न पडतात.

खरं कर बीसीसीआयनं आयपीएलमध्ये सर्वांच्या सुरक्षिततेची ग्वाही दिली होती. आठही टीम्सचे सदस्य, अधिकारी आणि स्पर्धेशी संबंधित जवळपास सर्वांचीच वारंवार कोव्हिड चाचणी केली जात होती.

तरीही कोरोना विषाणू हे कवच कसा भेदू शकला, याचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न.

आयपीएलमध्ये काय होते सुरक्षेचे उपाय?

आयपीएलमध्ये यंदा सर्व सामने प्रेक्षकांविना झाले आणि सर्व खेळाडू बायो-बबलमध्येच राहात होते. म्हणजे त्यांना टीमशिवाय आणि टीमशी संबंधित निवडक व्यक्तींशिवाय बाहेरच्या कुणालाही थेट भेटण्यास परवानगी नव्हती.

हॉटेलमधून ठरलेल्या बसमधून थेट मैदानात जायचं, सराव किंवा सामना संपला की बसमधूनच थेट हॉटेलमध्ये जातात, अशा पद्धतीची ही व्यवस्था आहे. बसचालकांचीही यात वेळोवेळी तपासणी केली जाते.

गेल्या वर्षी दुबईत याच पद्धतीनं आयपीएलचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं.

यंदा तर बीसीसीआयनं क्लस्टर कॅरव्हॅन फॉरमॅटही लागू केला होता. यात चार चार टीम्सचे दोन क्लस्टर म्हणजे दोन गट एकाच वेळी एकाच शहरांत खेळत होते आणि दुसऱ्या शहरात दाखलं झाले.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

पण साहजिकच हे दोन्ही उपाय कोव्हिडला रोखण्यासाठी पुरेसे ठरले नाहीत. मुंबई आणि चेन्नईत स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याचं यशस्वी आयोजन झालं. पण दुसर्‍या टप्प्यात दिल्ली आणि अहमदाबाद या दोन्ही क्लस्टर्समध्ये खेळाडू कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याच्या घटना घडल्या.

बायो-बबल असतानाही कसा झाला संसर्ग?

सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सनी आपल्या टीममधील वरूण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना कोव्हिडची लागण झाल्याचं जाहीर केलं होतं.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार वरुण चक्रवर्तीला काही दिवसांपूर्वी खांद्याच्या दुखापतीमुळे बायो-बबलमधून बाहेर पडून डॉक्टरकडे जावं लागलं होतं. तिथून कोरोनाचा टीममध्ये प्रवेश झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नाईट रायडर्सनी त्याविषयी अधिकृत माहिती दिलेली नाही आणि टीममधले बाकीचे सर्व सदस्य निगेटिव्ह असल्याचं स्पष्ट केलं होतं. कोलकात्याची स्वतःची मेडिकल टीम आहे, आणि संसर्गाचा उगम कुठून झाला तसंच खेळाडूंच्या संपर्कात आणखी कोण आलं होतं, त्यांचा तपास केला जातो आहे.

दुसरीकडे चेन्नई सुपरकिंग्सच्या एका पदाधिकाऱ्यानंही बायोबबलमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग कसा पोहोचला याचा शोध सुरू आहे, असं रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.

कोरोना बायो बबल

फोटो स्रोत, Getty Images / AlexSava

कोलकाता आणि चेन्नईप्रमाणेच अन्य टीम्सही आता काँटॅक्ट ट्रेसिंग म्हणजे संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेत आहेत.

'बायो-बबल' पाळणं कठीण का आहे?

बायो-बबलची योजना कागदावर सुरक्षित आणि योग्य वाटत असली, तरी प्रत्यक्षात हे नियम पाळणं सोपं नाही, असं गेल्या काही दिवसांत काही खेळाडूंनीच म्हटलं आहे.

कधीकधी केवळ अनवधानानं नियमांचा भंग झालेला असू शकतो.

बायो-बबलमध्ये तुमच्यावर अनेक बंधनं येतात. अगदी जवळच्या व्यक्तींनाही तुम्ही प्रत्यक्ष भेटू शकत नाही. मर्यादित वर्तुळाबाहेर दुसऱ्या कोणाशी तुमचा थेट संपर्क राहात नाही. मानसिकदृष्ट्या ही गोष्ट ताण आणणारी ठरू शकते.

राजस्थान रॉयल्सच्या संघातील इंग्लीश क्रिकेटर लियाम लिव्हिंग्सटोननं याच मानसिक थकव्याचा म्हणजे 'बबल फटिगचा उल्लेख केला होता. लिव्हिंगस्टोननं ही स्पर्धा त्यामुळेच अर्ध्यावर सोडून माघारी परतण्याचा निर्णय घेतला होता.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या अडम झॅम्पानं स्पर्धेतून माघार घेतल्यावर बायोबबलविषयी भाष्य केलं होतं. आयपीएलमधला बायोबबल तुलनेनं कमजोर असल्याचं त्याचं म्हणणं होतं. "कुणाचा एखादा नातेवाईक कोव्हिडमुळे मृत्यूशय्येवर असेल, तर ते क्रिकेटची पर्वा करणार नाहीत," असं सूचक वक्तव्य त्यानं केलं होतं.

आयपीएलमध्ये एखाद्या खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफमधील व्यक्तीच्या बाबतीत असं झालं असण्याची आणि तिथून हा उद्रेक सुरू झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

हवेतून विषाणूचा प्रसार झाल्याची शक्यता

आयपीएलमधल्या उद्रेकामागे अनेक कारणं असू शकतात. पण बायोबबलचे नियम कडकपणे पाळल्यावरही संसर्ग झाला असेल, तर यामागे विषाणूच्या प्रसाराची पद्धत आणि वेग कारणीभूत असू शकतो.

म्हणूनच आता काहींनी कोव्हिडच्या एरबॉर्न ट्रान्समिशन म्हणजे हवेतून प्रसाराच्या शक्यतेकडे लक्ष वेधलं आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

त्यात एकमेकांशेजारच्या हॉटेल रूम्समध्येही कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याच्या घटनांचा उल्लेख आहे. आयपीएलमध्येही असं काही घडलं होतं का, हे तपासाअंतीच कळू शकतं.

बायो-बबल किती सुरक्षित?

कोरोना विषाणूनं एखाद्या क्रीडास्पर्धेत बायो-बबल भेदण्याची ही पहिलीच घटना नाही.

आयपीएल

फोटो स्रोत, ANI

यंदा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमध्येही बायो-बबलचे नियम लागू झाले होते, पण एका व्यक्तीची टेस्ट पॉझटिव्ह आल्यानं शेकडो लोकांना विलगीकरणात जावं लागलं आणि स्पर्धेवरच काही काळ प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं.

क्रिकेटचा विचार केला, तर गेल्या वर्षी जुलैत इंग्लंडमध्ये झालेल्या इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघांमधल्या मालिकेत बायो-बबल मोडण्याची घटना घडली होती. त्या मालिकेच्या दुसऱ्‌या कसोटीआधी इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरनं बबलचे नियम मोडल्यानं त्याला दंड आणि पाच दिवसांच्या विलगीकरणाला सामोरं जावं लागलं होतं.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इंग्लंडच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान एक दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर आणि हॉटेलचे काही कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्यावर मालिकेचा पहिला सामना रद्द करावा लागला होता. ती मालिकाही पुढे होऊ शकली नाही.

कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात खेळ सुरू राहावेत म्हणून बायो बबलची संकल्पना पुढे आली होती, पण ती कोरोना विषाणूला रोखू शकली नाही, हे आयपीएलमध्ये पुन्हा दिसून आलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 3

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)