तामिळनाडू निकाल: स्टॅलिन यांच्या द्रमुकची घोडदौड सत्तेच्या दिशेने, 123 जागांवर आघाडी

एम. के. स्टॅलिन

फोटो स्रोत, Getty Images

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून एम. के. स्टॅलिन यांचा द्रविड मुनेत्र कळघम निर्णायक आघाडीच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.

सध्या द्रमुक पक्षाचे उमेदवार 123 ठिकाणी आघाडीवर असून त्यांच्या प्रतिस्पर्धी अण्णाद्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे उमेदवार 78 ठिकाणी पुढे असल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासूनच तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत काँटे की टक्कर सुरू असल्याचं दिसून आलं.

तामिळनाडू विधानसभेत एकूण 234 जागा आहेत. येथे बहुमतासाठी 118 जागांची आवश्यकता आहे.

विशष म्हणजे दोन्ही पक्षांचे उमेदवार बराच वेळ समसमान जागांवर आघाडीवर होते.

अगदी दोन्ही पक्षांचे उमेदवार प्रत्येकी 65 ठिकाणी आघाडीवर अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

पण नंतर द्रमुकने मुसंडी मारली. त्यानंतर द्रमुक पक्ष वेगाने पुढे गेला.

सध्या द्रमुक 123 ठिकाणी आघाडीवर असून अण्णाद्रमुक 78 जागांवर पुढे आहे.

0
aidmk+
0
DMK+
0
Others

भाषिक, प्रांतिक अस्मितेची भूमिका स्टॅलिन पुढे नेतील ही अपेक्षा - राज ठाकरे

तामिळनाडूत एम. के. स्टॅलिन यांचा द्रमुक पक्ष विजयाच्या उंबरठ्यावर आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही द्रमुक अध्यक्ष स्टॅलिन यांचं अभिनंदन केलं आहे.

करूणानिधींची भाषिक अस्मितेची भूमिका स्टॅलिनही तितक्याच निष्ठेने पुढे नेतील, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

ट्विट करत राज ठाकरे म्हणाले, "तामिळनाडू विधानसभेत स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुक पक्षाने मिळवलेल्या विजयासाठी स्टॅलिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन. भाषिक आणि प्रांतिक अस्मितेच्या राजकारणाला करूणानिधींनी कायमच प्राधान्य दिलं. हीच भूमिका तुम्हीदेखील तितक्याच निष्ठेने पुढे न्याल आणि काही बाबतीत राज्यांच्या स्वायत्ततेबाबत आग्रही रहाल, अशी आशा व्यक्त करतो."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

शरद पवारांकडून एम. के. स्टॅलिन यांचं अभिनंदन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तामिळनाडूतील यशाबद्दल द्रमुकचे पक्षाध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांचं अभिनंदन केलं आहे.

तुम्ही या विजयासाठी पात्र आहात. तुमच्यावर श्रद्धा असलेल्या लोकांची चांगल्या प्रकारे सेवा करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा अशा शब्दात शरद पवार यांनी स्टॅलिन यांचं अभिनंदन केलं.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

एम. के. स्टॅलिन आघाडीवर

द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन हे कोलातूर मतदारसंघातून पुढे आहेत. ते या निवडणुकीत द्रमुक पक्षाचा चेहरा आहेत.

एम. के. स्टॅलिन

फोटो स्रोत, Getty Images

विजयानंतर द्रमुकच्या मुख्यमंत्रिपदाची माळ एम. के. स्टॅलिन यांच्यात गळ्यात पडू शकते. करूणानिधी यांच्या निधनानंतर पक्षाची जबाबदारी स्टॅलिन यांच्याकडे आली होती. त्यांनी अथक परिश्रम घेत सत्ताधारी अण्णाद्रमुकच्या विरोधात आव्हान निर्माण केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

कमल हासन आघाडीवर

अभिनेते आणि मक्कल निधी मायम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कमल हासन या निवडणुकीत रिंगणात उभे आहेत.

कोईंबतूर दक्षिण मतदारसंघात कमल हासन आघाडीवर असल्याची माहिती ANI वृत्तसंस्थेकडून मिळाली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

द्रमुकचे उदयानिधी आघाडीवर

द्रमुक नेते स्टॅलिन यांचे चिरंजीव उदयानिधी स्टॅलिन हे चेपॉक-तिरुवलकेनी मतदारसंघात आघाडीवर आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

द्रमुक कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू

द्रविड मुनेत्र कळघम पक्षाच्या चेन्नईमधील अन्ना अरिवलयम येथील मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांनुसार द्रमुक पक्ष विजयाकडे वाटचाल करत असल्याने द्रमुक कार्यकर्त्यांनी त्याचा जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 6
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 6

जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

निवडणुकीत विजयानंतर रस्त्यांवर गर्दी करून जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या निवडणूक आयोगांना दिले आहेत.

त्यानुसार, विजयी उमेदवारांना गर्दी जमवून विजयी मिरवणूक काढणं महागात पडू शकतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 7
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 7

विजयी जल्लोष टाळण्याचं एम. के. स्टॅलिन यांचं कार्यकर्त्यांना आवाहन

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत एम. के. स्टॅलिन यांचा द्रविड मुनेत्र कळघम हा पक्ष आघाडी मिळवण्याच्या दिशेने जोरदार घोडदौड करत आहे. सध्या द्रमुक 119 पेक्षा जास्त ठिकाणी आघाडीवर आहे.

दरम्यान, द्रमुक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर पक्ष कार्यालयाबाहेर जमा होत असल्याचं दिसून येत होतं.

X पोस्टवरून पुढे जा, 8
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 8

केंद्रीय निवडणूक आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याची तसंच जल्लोष न करण्याची सूचना केली आहे.

त्याला प्रतिसाद देत द्रमुक अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी पक्ष कार्यकर्त्यांना विजयी जल्लोष टाळण्याचं आवाहन केलं आहे.

सर्व्हरवर ताण असल्याने उशीरा अपडेट

मतमोजणी संथपणे होत नसून, सर्व्हरवर खूप मोठा ताण असल्याने तिथं अपडेट उशीरा येत आहेत, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे.

निवडणूक आयोगाच्या साईटवरील आकडे अतिशय उशीरा अपडेट होत असल्याचं सकाळपासूनच दिसून येत होतं. याबाबत तक्रार करण्यात येत होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 9
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 9

मतदारसंघांच्या मतमोजणी केंद्रांमध्ये काम कोणत्याही अडथळ्याशिवाय योग्यरित्या सुरू असून फक्त ते साईटवर अपडेट होत नसल्याचं आयोगाने सांगितलं आहे.

सर्वोच्च नेत्यांशिवाय पहिलीच निवडणूक

सध्यातरी विरोधी पक्ष असणारा द्रमुक पक्ष इथे बाजी मारण्याची शक्यता असल्याचं एक्झिट पोल्सनी म्हटलं आहे. त्यामुळे अण्णा द्रमुकचं स्थान हिसकावून घेण्यात द्रमुक यशस्वी ठरेल का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

शिवाय, यंदाची निवडणूक दोन्ही पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांशिवाय होणारी पहिलीच निवडणूक आहे. माजी मुख्यमंत्री जयललिता आणि करूणानिधी हे दोघेही सध्या हयात नाहीत.

0
AIDMK+
0
DMK+
0
Others

Overall Results

AIDMK+
DMK+
Others
No Results

All constituencies results - A to Z

जयललिता यांचं 2016 मध्ये तर करुणानिधी यांचं 2018 मध्ये निधन झालं. दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जात होते. करुणानिधी यांना मात देत जयललिता यांनी 2011 आणि 2016 अशा सलग दोन निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता. पण दोघांच्याही निधनामुळे राज्यातील राजकारणाचं समीकरण बदलल्याचं पाहायला मिळतं.

ई. के. पलानीस्वामी

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, ई. के. पलानीस्वामी

सध्या अण्णाद्रमुकची धुरा पूर्णपणे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्या हातात आहे. तर द्रमुकची कमान करुणानिधी यांचे कनिष्ठ चिरंजीव एम. के. स्टॅलिन सांभाळत आहेत.

नुकत्याच आलेल्या एक्झिट पोल्समध्ये तामिळनाडूत द्रमुक बाजी मारणार, असा अंदाज सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांनी व्यक्त केला आहे.

तामिळनाडू एक्झिट पोल -

रिपब्लिक टीव्ही - CNX

अण्णाद्रमुक (AIADMK) : 58-68

द्रमुक : 160-170

AMMK आघाडी : 4-6

P-Marq

अण्णाद्रमुक (AIADMK) : 40-65

द्रमुक :165 - 190

AMMK आघाडी : 1-3

पुद्दुच्चेरी -

त्याशिवाय केंद्र शासित प्रदेश पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडेही सर्वांचं लक्ष असेल.

याठिकाणी विधानसभेच्या एकूण 30 जागा आहेत.

0
BJP+
0
INC+
0
Others

इथं भाजपला स्पष्ट बहुमत असल्याचा अंदाज एक्झिट पोल्समध्ये वर्तवण्यात आला आहे. भाजप येथे पहिल्यांदाच सत्ता हस्तगत करण्याची शक्यता आहे. पण खरं चित्र निकालानंतरच कळून येईल.

रिपब्लिक-सीएनएक्स - NDA : 16-20, SDA : 11-13 इतर : 0

एबीपी-सी व्होटर - NDA : 19-23, SDA : 6-10 इतर : 1-2

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)