कोरोना : कोविन अॅपवर नोंदणी करताना अनेकांना अडचणी, सोशल मीडियावरून तक्रारी

फोटो स्रोत, Getty Images
कोव्हिड -19 साठीच्या लसीकरणासाठी 18 वर्षांवरील सगळ्यांना 1 मेपासून लस देण्यात येण्याचं जाहीर करण्यात आलंय. त्यासाठी कोविन पोर्टल दुपारी 4 वाजल्यापासून नोंदणी सुरू होणार होती. पण ही वेबसाईट चालत नसल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर अनेकांनी केल्या आहेत.
नोंदणीकृत मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर आपल्याला ओटीपीच येत नसल्याची तक्रार अनेकांनी केली आहे.
कोविन पोर्टलवरून लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसाठीची नोंदणी सुरू करण्यात आल्यानंतरही अनेकांना हीच अडचण आली होती.
कोविन पोर्टलवर एका मोबाईल नंबरच्या लॉगिनवर चार जणांची नोंदणी करता येते. लशीचा पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी या पोर्टलवरूनच स्लॉटची नोंदणी करावी लागते.
"भारतात रोज 50 लाख लोक कोविनच्या माध्यमातून नोंदणी करत आहेत. आज (28 एप्रिल) दुपटीपेक्षा जास्त लोक नोंदणी करण्याची अपेक्षा आहे. आपली नोंदणी करण्याची यंत्रण यासाठी समर्थ आहे, असं आम्हाला वाटतं," असं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. शर्मा म्हणाले आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
आरोग्य सेतू अॅपकडून स्पष्टीकरण
पण 4 वाजता काही तांत्रिक कारणामुळे अडचण आली होती आणि ती आता सुधारण्यात आली असून वेबसाईट काम करत असून 18 वर्षांवरील व्यक्तींना आता कोविनवर नोंदणी करता येईल, असं आरोग्य सेतू अपकडून सांगण्यात आलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
18 वर्षांवरील नागरिकांसाठीची नोंदणी खुली करण्यात आल्याच्या काहीच मिनिटांमध्ये ही वेबसाईट क्रॅश झाल्याचं अनेकांनी सोशल मीडियावर म्हटलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
तर या वेबसाईटच्या क्रॅश होण्यावरून मीम्सही फिरू लागली आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
प्रयाग नामक युजरनं हेराफेरी सिनेमातील दृश्याच्या आधारे मीम तयार केलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
हे वाचलंत का?

YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)