कोरोना : 'खातरजमा न करता निधन जाहीर करण्याची इतकी घाई का?'- सुमित्रा महाजन, #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Hindustan Times
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा आढावा.
1. 'श्रद्धांजली वाहण्याची इतकी घाई का?' सुमित्रा महाजन यांचा सवाल
"इंदौर प्रशासनासोबत तपासून न घेताच न्यूज चॅनल्स माझ्या तथाकथित निधनाची बातमी कशी दाखवू शकतात? खातरजमा न करता निधन जाहीर करण्याची इतकी घाई का? ," असा सवाल माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना केलाय. TV9 मराठीने याविषयीची बातमी दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचं निधन झाल्याच्या बातम्या गुरुवारी (22 एप्रिल) पसरल्या. शशी थरूर, सुप्रिया सुळे यांच्यासारख्या नेत्यांनी त्यांना ट्विटरवर श्रद्धांजलीही वाहिली. पण नंतर ही बाब लक्षात आणून दिल्यावर या नेत्यांनी आपली ट्विट्स डिलीट केली.
सुमित्रा महाजन यांना तापाची लक्षणं आढळल्याने त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची कोव्हिड टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
2. संगीतकार श्रवण राठोड यांचं निधन
नदीम - श्रवण जोडीतील संगीतकार श्रवण राठोड यांचं कोव्हिड-19 मुळे मुंबईत गुरुवारी (22 एप्रिल) निधन झालं. लोकमतने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Twitter / AdnanSamiLive
मुंबईतल्या एस. एल. रहेजा रुग्णालयात त्यांच्यावर कोव्हिड-19 साठीचे उपचार करण्यात येत होते.
नदीम सैफी आणि श्रवण राठोड यांची नदीम-श्रवण ही जोडी 90च्या दशकात बॉलिवुडमध्ये लोकप्रिय होती. 'आशिकी' चित्रपटातल्या त्यांच्या गाण्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यासोबतच दिल है की मानता नहीं, साजन, सडक, साथी, दिवाना, फूल और काटें, राजा हिंदुस्तानी, धडकन, राजा, परदेस, दिलवाले या चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिलं.
गुलशन कुमार हत्या प्रकरणात नदीम यांचं नाव आल्यानंतर ही जोडी तुटली.
3. पश्चिम बंगालमध्ये सगळ्यांना मोफत लस देण्याची ममता बॅनर्जींची घोषणा
18 वर्षांवरील सगळ्यांना मोफत लस देण्यात येणार असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी जाहीर केलंय. त्या दक्षिण दिनाजपूर भागातल्या प्रचारसभेत बोलत होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
5 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना ही लस देण्यात येणार असल्याचं ममतांनी म्हटलंय. कोव्हिड 19 साठीच्या लशींच्या किंमतींवरून त्यांनी केंद्रावर टीकाही केलीय. प्रत्येक भारतीयाला लस मोफत मिळायला हवी, असं ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना बंगालमधल्या सगळ्या सभा रद्द करून आपण कोव्हिड संदर्भातल्या उच्चस्तरीय बैठकीला हजर राहणार असल्याचं गुरुवारी म्हटलं होतं.
तर कोव्हिडच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं म्हणत निवडणूक आयोगाने आता बंगालमध्ये रोड शो आणि वाहन रॅलीवर बंदी घातली आहे.
4. महाराष्ट्राला 100 टन लिक्विड ऑक्सिजन मिळणार
महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन घेऊन येणारी एक्स्प्रेस विशाखापट्टणमहून रवाना झालेली आहे. या एक्स्प्रेसवरच्या 7 टँकर्समध्ये 100 लिक्विड ऑक्सिजन आहे. उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत ही एक्स्प्रेस नागपूरला पोहोचण्याचा अंदाज आहे.

फोटो स्रोत, ANI
रोरो - म्हणजेच रोल ऑन, रोल ऑफ या रेल्वेद्वारे महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन पुरवठा केला जातोय. 18 एप्रिलच्या रात्री नवी मुंबईतल्या कळंबोलीमधून ही एक्स्प्रेस विशाखापट्टणमसाठी रवाना झाली होती.
केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी याविषयी ट्वीट केलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
या पुरवठ्यामुळे महाराष्ट्रातला ऑक्सिजन तुटवडा काहीसा कमी होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र टाईम्समध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली आहे.
5. रामदेव बाबांच्या पतंजली योगपीठात 83 जण पॉझिटिव्ह
कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे रामदेव बाबांच्या पतंजली योगपीठामध्ये तब्बल 83 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
10 एप्रिलपासून आतापर्यंत पतंजली योगपीठातील 83 जण पॉझिटिव्ह आढळल्याचं हरिद्वारमधील सीएमओ डॉक्टर शंभू झा यांनी म्हटलंय. या सगळ्यांना पतंजली परिसरातच आयसोलेट करण्यात आलं असून गरज पडल्यास बाबा रामदेव यांचीही कोव्हिड टेस्ट करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.
आपण तयार केलेलं कोरोनिल औषध कोरोनावर प्रभावी असल्याचा दावा बाबा रामदेव आणि पतंजली कंपनीने केला होता, याविषयी मोठा वादही झाला होता.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








