देवेंद्र फडणवीस तन्मय फडणवीसांच्या लसीकरणावर काय म्हणाले?

शोभा फडणवीस, देवेंद्र फडणवीस आणि तन्मय फडणवीस

फोटो स्रोत, Tanmay fadnavis/instagram

फोटो कॅप्शन, शोभा फडणवीस, देवेंद्र फडणवीस आणि तन्मय फडणवीस

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांचे तरुण पुतणे तन्मय फडणवीस यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तन्मय फडणवीस यांचे वय 45 वर्षांहून कमी आहे तसंच ते फ्रंटलाईन वर्कर नाहीत. तेव्हा त्यांना लस कशी घेता आली? असा प्रश्न विचारला जात आहे.

लस घेतानाचा फोटो तन्मय यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. लशीचा दुसरा डोस घेत आहोत असा संदेश त्यांनी फोटोसोबत दिला होता. नंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली. पण तोपर्यंत फोटोचे स्क्रिनशॉट ट्वीटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले.

काँग्रेसनेही यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपकडे रेमडेसिवीरप्रमाणे लसींचाही साठा आहे का? असा प्रश्न काँग्रेसने विचारला आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

प्रदेश काँग्रेसने यासंदर्भात ट्वीट केलं आहे. "45 वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातली आहे. असं असताना फडणवीसांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजपच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जीवाची काहीच किंमत नाही का?" अशी टीका काँग्रेसने केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

तन्मय फडणवीस यांनी कोरोना लस कोणत्या निकषात घेतली याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ते म्हणाले, "तन्मय फडणवीस हा माझा दूरचा नातेवाईक आहे. लस जर मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे असेल तर हरकत नाही. पण पात्रतेच्या निकषात नसेल, तर सर्वथा अयोग्य आहे. निकषात पात्र नसल्याने माझी पत्नी आणि मुलगी यांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. आज जरी 18 वर्षांपेक्षा सर्वांना लस घेण्याची परवानगी देण्यात आली असली तरी नियम सर्वांनीच पाळलेच पाहिजे, हे माझे ठाम मत आहे." असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

कोण आहेत तन्मय फडणवीस?

तन्मय फडणवीस हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आहेत. माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे पुत्र अभिजीत फडणवीस यांचा तन्मय हा मुलगा आहे. शोभा फडणवीस या देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आहेत.

तन्मय फडणवीस

फोटो स्रोत, Tanmay fadnavis/instagram

इन्स्टाग्राम अकाऊंटवर तन्मय यांनी आपली ओळख पब्लिक फिगर अशी केली आहे, तर ट्वीटवर त्यांनी आपण अभिनेता असल्याचं म्हटलं आहे.

सोशल मीडियावर ट्रोल

सोशल मीडियावर युजर्सनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. नेपोटिझम, वशीलेबाजी, #चाचाविधायकहैहमारे असे हॅशटॅग वापरून कॉमेन्ट्ससह मोठ्या संख्येने युजर्स देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करताना दिसतात.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

तन्मय यांचे वय 45 पेक्षा अधिक नाही आणि ते फ्रंटलाईन वर्कर नाहीत मग त्यांना लस कशी मिळाली? असा प्रश्न उपस्थित करत ट्वीटरवर अनेकांनी #चाचाविधायकहैहमारे हे हॅशटॅग वापरले आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

X पोस्टवरून पुढे जा, 4

X पोस्ट समाप्त, 4

यासंदर्भात आम्ही फडणवीस कुटुंबाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण अद्याप त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. तसंच भाजपने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

लशीसाठीची पात्रता

महाराष्ट्रात लशीचा तुटवडा असताना आणि लस घेण्यासाठी पात्र नसतानाही तन्मय फडणवीस यांनी लशीचे दोन्ही डोस कसे घेतले? त्यांना लस कोणी उपलब्ध करून दिली? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचे कारण म्हणजे लस घेण्यासाठी 45 वर्षांहून अधिक वय असलेले लोक आणि फ्रंटलाईन वर्कर्स पात्र आहेत.

16 जानेवारीपासून भारतात कोव्हिड 19साठीच्या लसीकरणाला सुरुवात झाली. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील नागरिक आणि सहव्याधी असणारे 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येत आहे.

केंद्राच्या नियमावलीनुसार 'को-विन' अॅपचा लसीकरण नोंदणीसाठी वापर बंधनकरक करण्यात आला आहे. पण यासोबतच थेट लसीकरण केंद्रावर जाऊनही लस घेता येईल. पण हा पर्याय सार्वजनिक लसीकरण केंद्रांसाठीच उपलब्ध आहे.

तन्मय आणि देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Twitter / fadnavis_tanmay

राज्यात लशीचा तुडवटा असून अनेक जिल्ह्यांमध्ये लस केंद्रांवर लसीकरण थांबवण्यात आले होते.

केंद्र सरकार इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला लशीचा पुरवठा कमी करत असल्याचा आरोप राज्य सरकारने केला. तर केंद्रातील सत्ताधारी भाजपनं हा आरोप फेटाळला आहे.

महाराष्ट्राची आकडेवारी पाहिल्यास, राज्यात कोरोना लशीचा पहिला डोस 1 कोटी 9 लाख 59 हजार 587 लोकांना, तर लशीचा दुसराही डोस 13 लाख14 हजार 386 जणांना देण्यात आलाय. म्हणजेच, महाराष्ट्रात आतापर्यंत 1 कोटी 22 लाख 73 हजार 973 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. भारत सरकारच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर ही आकडेवारी देण्यात आली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)