राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना पत्र पाठवून कोरोनासंबंधीच्या उपाययोजनांबद्दल काय सांगितलं?

राज ठाकरे

फोटो स्रोत, SHARAD BADHE/BBC

कोरोनाच्या संसर्गाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्रात 100 टक्के लसीकरण होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी केंद्राने साथ द्यावी, अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केंद्र सरकारला केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी यासंबंधी पत्र लिहिलं आहे.

राज ठाकरेंनी या पत्रात म्हटलं आहे, "कोव्हिड-19 ची पहिली लाट आणि त्यानंतरची राष्ट्रीय टाळेबंदी, यामुळे महाराष्ट्रातल्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. याचे आर्थिक, सामाजिक पडसाद अर्थातच देशभरही पडलेले आपण अजूनही अनुभवत आहोत.

ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. ते कायमचे उपायही नव्हेत. पण जर राज्याला पुरेशा लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो? या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर 100% लसीकरण करण्याची रणनिती महाराष्ट्रासाठी महत्वाची, व कळीची आहे. म्हणूनच, महाराष्ट्राला 100% लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून, राज्यातल्या सर्व वयोगटातील 100% लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवंय."

राज ठाकरेंचं पत्रं

फोटो स्रोत, MNS

महाराष्ट्राला आवश्यक त्या लसी पुरवण्यासाठी राज ठाकरे यांनी काही पर्याय सुचवले आहेत. राज्याला, राज्यातल्या खासगी संस्थांना स्वतंत्रपणे लशी खरेदी करू द्याव्यात, सिरम इन्स्टिट्यूटला महाराष्ट्रात मुक्तपणे पण योग्य नियमन विक्री करू द्यावी, असं राज ठाकरेंनी सुचवलं आहे.

राज ठाकरेंचं पत्रं

फोटो स्रोत, MNS

यासोबतच राज्यातल्या हाफकिन, हिंदुस्तान अँटीबायोटिक सारख्या संस्थांना लस उत्पादनाची परवानगी द्यावी, कोव्हिड -19वरच्या उपचारांसाठी आवश्यक रेमडेसिवीरसारख्या औषधांचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्याला मोकळीक द्यावी असंही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलंय.

राज्यातल्या ऑक्सिजन पुरवठ्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल (13 एप्रिल) त्यांच्या भाषणात म्हटलं होतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)