आयपीएल 2021 आजपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घेण्यात आली आहे?

विराट कोहली, रोहित शर्मा

इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL च्या 14 व्या हंगामाला आजपासून (9 एप्रिल) सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू असा पहिला सामना चेन्नईतील मैदानात रंगणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे IPL च्या आयोजनाबाबत शंका व्यक्त केली जात होती. मात्र, सर्व खबरदारी घेऊन IPL ला आजपासून सुरू होणार आहे.

IPL चा 13 वा हंगाम कोरोनामुळे दुबईत खेळवण्यात आला होता. बायो बबलमध्ये खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला ठेवण्यात आलं होतं. इतर कुणालाही भेटण्यास खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला मनाई करण्यात आली होती.

यंदा मात्र भारतातच सामने खेळवले जाणार आहेत. मात्र, सर्व खबरदारी घेत असल्याचा दावा आयपीएलच्या प्रशासनाकडून केला जातोय.

आजपासून (9 एप्रिल) सुरू होणाऱ्या IPL साठी हे नियम लागू करण्यात आलेत :

  • टीममधील खेळाडू शेड्युल बस पकडून हॉटेलमधून थेट मैदानात पोहोचतील
  • सराव किंवा सामना संपल्यानंतर थेट हॉटेलवर आणलं जाईल
  • खेळाडूंना ने-आण करणाऱ्या गाडीच्या चालकाचीही चाचणी केली जाईल
आयपीएल 2021

फोटो स्रोत, BCCI

यंदा आयपीएलच्या आयोजनासाठी मोठी तयारी करण्यात आलीय. खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि इतर संबंधित लोकांना जास्त प्रवास करावा लागू नये, अशा पद्धतीने वेळापत्रक तयार करण्यात आलंय.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळापत्रक कसं आखण्यात आलंय?

मुंबई, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता इथे मॅचेस रंगणार आहेत. अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये प्लेऑफ्स आणि फायनल रंगणार आहे. काही दिवसांपूर्वीच भारत-इंग्लंड डे नाईट टेस्ट या मैदानावर खेळवण्यात आली होती.

लीग स्टेजमध्ये प्रत्येक संघ चार ठिकाणी सामने खेळणार आहे. 56 लीग मॅचेसपैकी चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरू इथे प्रत्येकी दहा मॅच खेळवण्यात येतील. अहमदाबाद आणि दिल्ली इथे प्रत्येकी आठ मॅच होतील.

यंदाच्या हंगामाचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या मॅचेस तटस्थ अर्थात न्यूट्रल ठिकाणी खेळवण्यात येतील. कोणताही संघ घरच्या मैदानावर खेळणार नाही.

आयपीएल 2021

फोटो स्रोत, BCCI

11 डबल हेडर्स म्हणजे एकाच दिवशी दोन सामने असतील. दुपारचे सामने साडेतीन वाजता सुरू होतील तर रात्रीचे सामने साडेसात वाजता सुरू होतील.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, स्पर्धेचं वेळापत्रक आखण्यात आलं आहे. खेळाडू बायोबबलमध्येच राहतील. प्रत्येक संघ स्पर्धेदरम्यान तीनवेळा प्रवास करणार आहे.

कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन, सुरुवातीचे सामने प्रेक्षकांविना खेळवले जाणार आहेत. परिस्थिती सुधारल्यास, प्रेक्षकांना मॅचेस मैदानात पाहण्याची मुभा मिळू शकते. यासंदर्भात नंतर निर्णय घेतला जाईल.

आयपीएलचा चौदावा हंगामात प्रत्येक संघात अनेक बदल झाले आहेत. पाहा कुठल्या संघात कोण आहे?

1.सनरायझर्स हैदराबाद

संघात कायम-डेव्हिड वॉर्नर, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, मोहम्मद नबी, मिचेल मार्श, केन विल्यमसन, वृद्धिमान साहा, मनीष पांडे, जॉनी बेअरस्टो, श्रीवत्स गोस्वामी, जेसन होल्डर, शाहबाझ नदीम, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा, विजय शंकर, विराट सिंग, बसिल थंपी, रशीद खान, टी.नटराजन, खलील अहमद.

आयपीएल 2021

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा

नवीन- केदार जाधव, जगदीश सुचिथ, मुजीब उर रहमान.

2. किंग्ज इलेव्हन पंजाब

संघात कायम- के.एल. राहुल, ख्रिस गेल, निकोलस पूरन, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, मनदीप सिंग, मयांक अगरवाल, रवी बिश्नोई, प्रभसिमरन सिंग, दीपक हुडा, सर्फराझ खान, अर्शदीप सिंग, मुरुगन अश्विन, दर्शन नालकांडे, इशान पोरेल, हरप्रीत ब्रार.

नवीन- झाय रिचर्डसन, रिल मेरडिथ, शाहरुख खान, मॉइझेस हेन्रिके, डेव्हिड मलान, फॅबिअन अॅलन, जलाज सक्सेना, सौरभ कुमार, उत्कर्ष सिंग

3. मुंबई इंडियन्स

संघात कायम - रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, ख्रिस लिन, अनमोलप्रीत सिंग, सौरभ तिवारी, आदित्य तरे, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, अनुकुल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मोहसीन खान

आयपीएल 2021

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, मुंबई इंडियन्सने 2020 हंगामाचं जेतेपद पटकावलं होतं.

नवीन- नॅथन कोल्टिअर नील, अॅडम मिलने, पीयुष चावला, जेम्स नीशाम, युधवीर चरक, अर्जुन तेंडुलकर, मार्को जेन्सन, अर्जुन तेंडुलकर

4. कोलकाता नाईट रायडर्स

संघात कायम-आयोन मॉर्गन (कर्णधार), आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, कमलेश नागरकोट्टी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सुनील नरिन, राहुल त्रिपाठी , पॅट कमिन्स, , वरुण चक्रवर्ती, टीम सैफर्ट

नवीन- शकीबर अल हसन, हरभजन सिंग, बेन कटिंग, करुण नायर, पवन नेगी, शेल्डॉन जॅक्सन, वेंकटेश अय्यर, वैभव अरोरा.

5. दिल्ली कॅपिटल्स

संघात कायम- श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, अमित मिश्रा, अवेश खान, अक्षर पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, रवीचंद्रन अश्विन, शिखर धवन, मार्कस स्टॉइनस, प्रवीण दुबे, शिमोरन हेटमायर, अँनरिक नॉर्किया, ललित यादव

आयपीएल 2021

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, दिल्ली कॅपिटल्स

नवीन- टॉम करन, स्टीव्हन स्मिथ, सॅम बिलिंग्ज, उमेश यादव, रिपाल पटेल, विष्णू विनोद, ल्युकमन मेरिवाला, एम.सिद्धार्थ.

6. चेन्नई सुपर किंग्स

संघात कायम- महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फॅफ डू प्लेसिस, इम्रान ताहीर, जगदीशन नारायण, करण शर्मा, , लुंगी एन्गिडी, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, , शार्दूल ठाकूर, सॅम करन, जोश हेझलवूड

आयपीएल 2021

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा

नवीन-के.गौतम, मोईन अली, चेतेश्वर पुजारा, के.भगत वर्मा, सी.हरिथ निसांथ, एम.हरिसंकर रेड्डी.

7. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

संघात कायम एबी डीव्हिलियर्स, विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिकल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, अॅडम झंपा, केन रिचर्डसन, शाहबाझ अहमद, जोश फिलीप, पवन देशपांडे, हर्षल पटेल, डॅनियल सॅम्स.

नवीन- ग्लेन मॅक्सवेल, कायले जेमिसन, डॅन ख्रिस्तियन, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, सुयश प्रभूदेसाई, के.एस.भरत

8. राजस्थान रॉयल्स

संघात कायम- संजू सॅमसन (कर्णधार), बेन स्टोक्स, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, महिपाल लोमरुर, मनन व्होरा, मयांक मार्कंडे, राहुल टेवाटिया, रियान पराग, श्रेयस गोपाळ, जयदेव उनाडकत, यशस्वी जैस्वाल, अनुज रावत,अँड्यू टाय.

नवीन- ख्रिस मॉरिस, शिवम दुबे, चेतन साकारिया, मुस्ताफिझूर रहमान, लायम लिव्हिंगस्टोन, आकाश सिंग, के.सी.करिअप्पा, कुलदीप यादव.

आयपीएल वेळापत्रक. . .

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)