कोरोना : लॉकडाऊन लावण्याची वेळ आली तर दोन दिवसांचा वेळ देऊ - अजित पवार

अजित पवार

फोटो स्रोत, facebook

"गेल्या वेळी पंतप्रधानांनी अचानक लॉकडाऊन लावला आणि मजूर अडकले. आम्हाला यावेळी तसं होऊ द्यायचं नाही. महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याची वेळ आलीच तर नागरिकांना दोन दिवसांचा वेळ देऊ," अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कोरोना स्थिती आढावा बैठकीनंतर अजित पवार बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणाले, "लॉकडाऊन लावण्याची वेळ आली तर दोन दिवसांचा वेळ देऊ. अनेक मंत्र्यांनी सूचना केली की किमान 2 दिवस आधी सांगा. ही वेळ येऊ नये, पण आलीच तर विचार केला."

"पहिल्या लाटेपेक्षा आता कठीण परिस्थिती आहे. लवकर कठोर पावलं नाही टाकले तर हॉस्पिटल बेड्सची संख्या कमी पडू शकते. कोरोनाबाबत लोकांची भीती दूर झाल्याने अडचणी वाढल्या. मागच्या वेळीपेक्षा पॉझिटिव्ह येण्याची संख्या वाढली. एकमेकांकडून लागण होण्याचं प्रमाणही वाढलं. ऑक्सिजन बेड कमी पडू नये, यासाठी उपाययोजना करत आहोत," असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांनी सांगितलेले प्रमुख मुद्दे -

  • पहिल्या लाटेपेक्षा कठीण परिस्थिती. लवकर कठोर पावलं नाही टाकले तर हॉस्पिटल बेड्सची संख्या कमी पडू शकते. ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून विविध मार्ग शोधत आहोत.
  • लॉकडाऊन लावण्याची वेळ आली तर दोन दिवसांचा वेळ देऊ. गेल्या वेळी पंतप्रधानांनी अचानक लॉकडाऊन लावला आणि मजूर अडकले. अनेक मंत्र्यांनी सूचना केली की किमान 2 दिवस आधी सांगा. ही वेळ येऊ नये, पण आलीच तर विचार केला.
  • कोरोनाबद्दलची भीती दूर झाली आहे. त्यामुळे अडचणीला सामोरं जावं लागतंय. पहिल्या लाटेत एक माणूस 5 लोकांना बाधित करत असेल तर आता एक माणून 15-20 लोकांना बाधित करत आहेत.
  • व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत, पण ऑक्सिजन बेड्स कमी पडू नयेत म्हणून पावलं उचलत आहोत. अनेक घटक मानधन मागत आहेत. पण राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन विचाराअंती निर्णय घेऊ.
  • चाकण परिसरात ऑक्सिजनचे तीन प्लांट सुरू, कमतरता पडणार नाही. दुसऱ्या लाटेत संसर्गाचं प्रमाण वाढलं आहे. पण आधीपेक्षा त्रास कमी जाणवत आहे. बेड वाढवण्यासाठी खासगी हॉस्पिटलचीही मदत घेणार आहोत.
  • कुणालाही मानधन देताना आधी सर्व बाजूंचा विचार करणं आवश्यक. राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता संपूर्ण विचाराअंती त्याबाबत निर्णय घेऊ.
  • लॉकडाऊनला पुणेकरांचाच नव्हे तर महाराष्ट्राचाही विरोध आहे, हे आम्हाला माहीत आहे. पण रोज 5 टक्क्यांनी पेशंट्स वाढत आहेत. म्हणून कडक पावलं उचलणं गरजेचं आहे.
  • पंढरपूर-मंगळवेढा निवडणुकीला निर्बंधामधून सुट असेल. राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या सर्व निवडणुका पुढे ढकलणार.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)