कोरोना लॉकडाऊन - उद्या रात्री 8 पासून निर्बंध, वीकेंडला लॉकडाऊन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अनिल देशमुख, परमबीर सिंह, सचिन वाझे

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाला आळा घालण्यासाठी संपूर्ण राज्यात उद्या रात्री 8 वाजल्यापासून कडक निर्बंध असतील. तसंच राज्यात शुक्रवारी रात्री 8 पासून सोमवारी सकाळी 7 पर्यंत कडक लॉकडाऊन राहिल, असं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर केलं आहे.

तर कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे येत्या 30 एप्रिलपर्यंत राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

नागरिकांनी बंधनं पाळली नाहीत, तर प्रत्येकी 500 रुपये दंड करण्यात येईल, असंही टोपे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते बोलत होते.

काय सुरू , काय बंद?

नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यात उद्यापासून काय सुरू आणि काय बंद राहिल याचीही माहिती दिली.

  • दिवसा 5 हून अधिक लोकांच्या जमा होण्यावर बंदी असेल.
  • सगळे मॉल्स, रेस्टॉरंट्स, बार बंद होणार.
  • अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकानं बंद राहतील.
  • सरकारी कार्यालय 50 टक्के क्षमतेनं, तर उद्योग पूर्णतः सुरू राहतील.
  • जिथे कामगार राहू शकतील तिथे बांधकाम सुरू राहिल.
  • वीकेंडला ट्रान्सपोर्ट (परिवहन सेवा) सुरू असेल.
  • पब्लिक ट्रान्सपोर्ट अर्ध्या क्षमतेनं चालेल.
  • रेल्वे सेवा चालू राहिल.
  • खासगी ऑफिसेससाठी वर्क फ्रॉम होम सुविधा असावी.

रेमडेसिव्हिर औषधाच्या तुटवड्याविषयी बोलताना मलिक म्हणाले, "रेमडेसिव्हिरविषयी नियमावली लागू होईल. गरज नसलेल्यांना औषध देणार नाही. सरकारी हॉस्पिटल्सध्ये तुटवडा नाही."

लॉकडाऊन लावण्याची वेळ आली तर दोन दिवसांचा वेळ देऊ - अजित पवार

मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली बैठक संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, "पहिल्या लाटेपेक्षा आता कठीण परिस्थिती आहे. लवकर कठोर पावलं नाही टाकले तर हॉस्पिटल बेड्सची संख्या कमी पडू शकते. कोरोनाबाबत लोकांची भीती दूर झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. मागच्या वेळीपेक्षा आता पॉझिटिव्ह येण्याची संख्या वाढली आहे. एकमेकांकडून लागण होण्याचं प्रमाणही वाढलं. ऑक्सिजन बेड कमी पडू नये, यासाठी उपाययोजना करत आहोत."

लॉकडाऊनविषयी बोलताना ते म्हणाले, "लॉकडाऊन लावण्याची वेळ आली तर दोन दिवसांचा वेळ देऊ. गेल्या वेळी पंतप्रधानांनी अचानक लॉकडाऊन लावला आणि मजूर अडकले. अनेक मंत्र्यांनी सूचना केली की किमान 2 दिवस आधी सांगा. ही वेळ येऊ नये, पण आलीच तर विचार केला."

अजित पवार

फोटो स्रोत, FACEBOOK

धार्मिक स्थळांवर निर्बंध - अस्लम शेख

धार्मिक स्थळांवर निर्बंध असतील, तिथं मोजक्या लोकांनाच परवानगी दिली जाईल,अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी या बैठकीनंतर दिली आहे.

ते म्हणाले, "मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रसार झपाट्याने होत आहे. त्या पार्श्वभूमीवर असलेले निर्बंध आणखी कठोर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. उद्योजकांना वेळेचं बंधन घालून देणार आहोत. धार्मिक स्थळांवर निर्बंध असतील, मोजक्या लोकांनाच परवानगी दिली जाईल. तसंच सिनेमागृह, नाट्यगृह, बगीचा, खेळाचे मैदान पूर्णपणे बंद असतील."

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. यासोबतच ते अनेक नेत्यांशीही बोलले.

यात त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना फोन करून राज्यात लॉकडाऊन लागल्यास सहकार्य करा, असं आवाहन केलं .

मनसेच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ट्वीट करण्यात आलं की, "राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोनवरील संवादात केलं आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

या आवाहनाला प्रतिसाद देत मनेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून सांगण्यात आलं आहे की, "आपण सर्वांनी सरकारी सूचनांचं पालन करावं, सरकारी यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करावं, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केल्याची बातमी आली.

राज्यात मिनी लॉकडाऊन?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या पूर्ण लॉकडाऊन करण्याच्या बाजूने नसून मर्यादित स्वरुपात लॉकडाऊन करण्याचा त्यांचा विचार असल्याची माहिती उद्योगपती हर्ष गोयंका यांनी दिली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कालपासून राज्यातील विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञ आणि मान्यवरांशी लॉकडाऊन संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठका घेत आहेत.

याचाच एक भाग असलेल्या उद्योगपतींसोबतच्या बैठकीत हर्ष गोयंका हेसुद्धा सहभागी झाले होते.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

लोकांमधील बिनधास्तपणा सर्वांसाठी धोकादायक - किशोरी पेडणेकर

गेल्या काही महिन्यांपासून लोकांमध्ये कोरोनाच्या संदर्भात बिनधास्तपणा आलेला आहे. हा बिनधास्तपणा स्वतःसोबतच इतरांसाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे यावर आळा घालणं आवश्यक आहे, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

"पुण्यामध्ये मिनी लॉकडाऊन असल्याचं आपल्याला माहिती आहे. बाकीच्या ठिकाणीही अशा प्रकारचं मिनी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. धार्मिक स्थळं पूर्णपणे बंद केली. हॉेटेल्स बंद केले. बस कमी क्षमतेने चालवण्यात येणार आहेत. सप्टेंबर महिन्यापासून आपण रुग्णसंख्या कमी केली होती. पण सध्या लोकांमध्ये बिनधास्तपणा आलेला आहे. हा बिनधास्तपणा तुमच्यासह इतरांसाठीही धोकादायक आहे. यावर आळा घालावा लागेल," असं पेडणेकर यांनी म्हटलं.

मुंबईतले परप्रांतीय मजूर निघाले गावाकडे

मुंबईतील उत्तर प्रदेश, बिहारमधून आलेले परप्रांतीय मजूर गावाकडे परत जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जमले आहेत.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याचं ऐकल्यामुळे हे मजूर गावी निघाले आहेत.

लॉकडाऊन लागल्यास परत गेल्या वर्षीसारखे हाल होऊ नये, म्हणून आम्ही गावाकडे जायचा निर्णय घेतल्याचं या मजूरांचं म्हणणं आहे.

स्थलांतरित

फोटो स्रोत, Getty Images

लॉकडाऊनचा इशारा

देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, दिल्ली, अहमदनगर आणि नांदेड या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे.

मुंबईची स्थितीही चिंताजनक आहे. नागरिकांनी नियमांचं पालन न केल्यास लॉकडाउन लावू असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला होता. जर नागरिक स्वतःहून कोरोनाच्या नियमांचे पालन करणार नसतील तर दोन दिवसात याबाबत निर्णय घेऊ असे देखील मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी शनिवारी उद्योजक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, व्यायामशाळा चालक, मराठी नाट्य निर्माता संघ तसेच त्यानंतर राज्यातील मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृह चालक-मालक संघटनेच्या प्रतिनिधींशी ऑनलाइन संवाद साधला होता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)