होळी : मुघलांच्या दरबारातही साजरी व्हायची

होली

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, राना सफ़वी
    • Role, इतिहासकार, बीबीसीसाठी

ईमान को ईमान से मिलाओ

इरफ़ान को इरफ़ान से मिलाओ

इंसान को इंसान से मिलाओ

गीता को क़ुरान से मिलाओ

दैर-ओ-हरम में हो ना जंग

होली खेलो हमारे संग

- नज़ीर ख़य्यामी

रामनगरला भेट दिली होती तेव्हा मी होळीत सहभागी झालो होतो. ही होळी उत्तराखंडच्या जुन्या संस्कृतीशी जोडली गेलेली होती. वसंत पंचमीनंतर स्त्रिया एकत्र येऊन एकमेकांच्या घरी जाऊन होळीची गाणी गात असत. काही महिला नृत्य करत. ही गाणी रागांवर आधारित असत, पण आता या लोकगीतांमध्ये काही सिनेमातील गाण्यांच सूर ऐकायला मिळतात.

रामनगर येथील क्यारी गावातल्या एका रिसॉर्टमध्ये आमची राहण्याची सोय करण्यात आली होती. गावातील होळी उत्सवात आमच्या सहभागाची व्यवस्थाही त्यांनी केली. गावात पोहचलो तेव्हा आम्ही रंगांचा सुंदर समुद्र पाहिला. रंगीबेरंगी कपडे घातलेल्या ढोलकाच्या तालावर महिला लोकगीत गात होत्या.

त्या महिलांनी आम्हाला पाहिलं तेव्हा आम्ही आमच्या कपाळावर टिळा लावला आणि गालावर गुलाल लावून आमचं स्वागत केलं. मला होळी खेळायला आवडते. गावात आमचं स्वागत चेहऱ्यावर कोरडे रंग लावून करण्यात आलं तेव्हा त्यांना रंग लावण्यापासून मीही स्वत:ला रोखू शकले नाही.

रंग इस्लाममध्ये हराम मानला जातो का?

मी जेव्हा होळीचे हे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले, तेव्हा काही लोकांनी मला सांगितले की मुस्लिमांनी होळी खेळू नये, कारण इस्लाममध्ये रंग हाराम मानले जातात.

मला त्यांना पुरावा मागायचा होता, पण अज्ञान आणि पूर्वग्रहांमुळेच असे गैरसमज वाढतात याची मला कल्पना आहे म्हणून मी तसं विचारलं नाही.

होळी

फोटो स्रोत, Getty Images

अशा अज्ञानाच्या कल्पनांविरुद्ध लढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे.

नमाज पठण करण्यापूर्वी जेव्हा आम्ही वुजू (हात,पाय,चेहरा पाण्याने स्वच्छ करणे) करतो तेव्हा आपल्या त्वचेवर असे काहीही असू नये ज्यामुळे पाण्याचा त्वचेशी थेट संपर्क होणार नाही. अशा परिस्थितीत वुजू करण्यापूर्वी चेहऱ्यावरील गुलाल काढावा लागेल.

700 वर्षांपूर्वी हजरत आमीर खुसरो यांनी लिहिलेली कव्वाली आजही खूप लोकप्रिय आहे.

आज रंग है, हे मां रंग है री

मोरे महबूब के घर रंग है री

होळीनिमित्त दर्ग्यात गर्दी

गेल्यावर्षी होळीच्या निमित्ताने मी ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तीच्या मंदिरात गेले होते. मला त्याठिकाणी खूप गर्दी दिसली. जेव्हा मी गर्दीबद्दल प्रश्न विचारला तेव्हा मंदिराचे सय्यद सलमान चिश्ती यांनी मला सांगितले की, हे सर्व जण ख्वाजा गरीब नवाज यांच्यासोबत होळी खेळायला आले आहेत.

इलाहबादमध्ये सेरेब्रल पाल्सी पीडित मुलांसाठी होळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी होळी खेळण्यासाठी आपल्या मुलाला घेऊन जाताना एत मुस्लीम महिला (25 फेब्रुवारी)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इलाहबादमध्ये सेरेब्रल पाल्सी पीडित मुलांसाठी होळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी होळी खेळण्यासाठी आपल्या मुलाला घेऊन जाताना एत मुस्लीम महिला (25 फेब्रुवारी)

दर्ग्यातील सर्व लोक होळीच्या निमित्ताने ख्वाजा गरीब नवाज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले होते.

कोणत्याही शतकातील विचार आणि संस्कृती त्यावेळच्या कला आणि चित्रकलेच्या माध्यमातून सर्वोत्तम पद्धतीने समजता येऊ शकते.

दिल्ली सल्तनत आणि मुघल युगातील मुस्लिम सूफी संत आणि कवींनी होळीच्या दिवशी अनेक उत्कृष्ट रचना तयार केल्या आहेत.

बाबा बुलेशहा यांनी लिहिले-

होरी खेलूंगी, कह बिसमिल्लाह,

नाम नबी की रतन चढ़ी, बूंद पड़ी अल्लाह अल्लाह

होळी

फोटो स्रोत, Getty Images

भगवान श्रीकृष्णाचे भक्त इब्राहिम रासखान (1548-1603) यांनी होळीला कृष्णाशी जोडणारे सुंदर लेखन केले आहे.

आज होरी रे मोहन होरी,

काल हमारे आंगन गारी दई आयो, सो कोरी,

अब के दूर बैठे मैया धिंग, निकासो कुंज बिहारी

मुघलकालीन होळी

मुघल होळीला ईद-ए-गुलाबी किंवा अब-ए-पाल्शी असं म्हणायचे आणि मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जात होती. तुम्ही गुगलवर मुघल फोटो आणि ईद असे सर्च केले तर तुम्हाला ईदसाठी प्रार्थना करणारे जहांगीरचे एकच चित्र दिसेल, पण तुम्ही मुघल आणि होळी असे सर्च केले तर तुम्हाला त्या काळातील राजा-राणीची सर्व चित्रे आणि नवाब आणि बेगम यांची होळी खेळतानाची चित्रे पाहता येतील.

संपूर्ण मुघल साम्राज्यात होळी नेहमीच मोठ्या आनंदाने साजरी केली जात असे. होळीनिमित्त दरबारी मोठी सजावट केली जात असे.

लाल किल्ल्यात यमुना नदीच्या काठावर मेळा आयोजित केला जात होता. किल्ल्याच्या खिडकीतून राजपुत्र आणि राजकन्या याचा आनंद घेत असत.

रात्रीच्या वेळी लाल किल्ल्यात दरबारातील प्रसिद्ध गीतकार आणि नर्तकांबरोबर होळी साजरी करण्यात येत होती.

नवाब मोहम्मद शाह रंगीला यांची लाल किल्ल्यातील रंग महलात होळी खेळतानाचे एक प्रसिद्ध चित्र आहे.

दिल्लीचे प्रसिद्ध कवी शेख जहुरुद्दीन हतीम यांनी लिहिले-

मुहैया सब है अब असबाब ए होली

उठो यारों भरो रंगों से जाली

बहादूर शाह जफर केवळ होळीच्या उत्सवात सहभागी होत नसत तर त्यांनी होळीवर एक प्रसिद्ध गाणं लिहिलं आहे.

क्यों मोपे मारी रंग की पिचकारी

देख कुंवरजी दूंगी गारी (गाली)

अकबराने गंगा जमुनी तेहजीब सुरू केली तर अवधच्या नवाबांनी त्याला एका वेगळ्या उंचीपर्यंत पोहचवले. नवाब आपापल्या पद्धतीने सर्व सण साजरे करत.

मीर ताकी मीर (1723-1810) यांनी लिहिले:

होली खेला आसिफ़-उद-दौला वज़ीर,

रंग सोहबत से अजब हैं ख़ुर्द-ओ-पीर

वाजिद अली शाह यांनी आपल्या एका प्रसिद्ध ठुमरीमध्ये लिहिलं-

मोरे कान्हा जो आए पलट के

अबके होली मैं खेलूंगी डट के

आणि मला वाटतं नाझीर अकबराबादी यांच्याव्यतिरिक्त इतर कोणीही होळीला एवढ्या सुंदर पद्धतीने शब्दबद्ध केलं नसेल-

जब फागुन रंग झमकते हों तब देख बहारें होली की,

और दफ़ के शोर खड़कते हों तब देख बहारें होली की

तारीख-ए-हिंदुस्तानीमध्ये मुन्शी जकाउल्लाह म्हणाले, "कोण म्हणतं होळी हा केवळ हिंदूंचा सण आहे?"

एकूणच होळी हा एक सुंदर सण आहे आणि त्याचा इतिहास सुद्धा तितकाच सुंदर आहे ज्यात हिंदू आणि मुसलमान एकत्र येत होळी साजरे करत आले आहेत.

कहीं पड़े ना मोहब्बत की मार होली में

अदा से प्रेम करो दिल से प्यार होली में

गले में डाल दो बाहों का हार होली में

उतारो एक बरस का ख़ुमार होली में

-नज़ीर बनारसी

(हा लेख यापूर्वी 2 मार्च 2018 रोजी बीबीसी हिंदीवर प्रकाशित करण्यात आला होता.)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)