MPSC : 8 तासांत घडल्या 'या' 5 नाट्यमय घडामोडी

MPSC परीक्षा पुढे ढकलण्यावरून राज्यातील परिक्षार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण आहे. ही नाराजी गुरुवारी (11 मार्च) स्पष्टपणे दिसून आली.
गेल्या वर्षी नियोजित असलेली ही परीक्षा तब्बल पाचव्यांदा पुढे ढकलल्यामुळे गुरुवारी MPSC चे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडून या निर्णयाचा निषेध नोंदवला आहे. अखेर रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत एक फेसबुक लाईव्ह घेऊन सरकारची बाजू स्पष्ट केली.
तसंच या परीक्षा एका आठवड्यातच घेणार असून आज (शुक्रवार 12 मार्च) त्याची नवी तारीख जाहीर केली जाईल, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणात आज काय घडणार, नव्या तारखेला विद्यार्थ्यांचा काय प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गुरुवारी सकाळी MPSCचं पत्रक आल्यापासून ते संध्याकाळी मुख्यमंत्र्यांचं फेसबुक लाईव्ह होईपर्यंतच्या आठ तासांत राज्यातील वातावरण ढवळून निघालं. या आठ तासांत घडलेल्या या पाच नाट्यमय घडामोडी काय होत्या, हे आपण या बातमीत सविस्तरपणे समजून घेऊ.
1. परीक्षा पुढे ढकलल्याचं पत्रक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी MPSC ची परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर गेली. 14 मार्चला होणारी ही परीक्षा आता पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याचं MPSC ने कळवलं. परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचं पत्रकात म्हटलं होतं. दुपारी एकच्या सुमारास हे पत्रक प्रसिद्धीस पाठवण्यात आलं.

फोटो स्रोत, Mpsc
2. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू
MPSC ने परीक्षा पुढे ढकलल्याचं कळताच विद्यार्थ्यांमध्ये याबाबत चर्चा रंगू लागली. अखेर पुण्यामध्ये MPSC ची तयारी करत असलेले विद्यार्थी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले. याला आंदोलनाचं स्वरुप मिळून विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच ठाण मांडलं आणि रास्ता रोको केला.
विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात राजकीय पक्षांचे नेतेही सहभागी झाल्याचं दिसून आलं.

निवडणुका घेताना, राजकीय नेत्यांच्या मुलांच्या लग्नात, राजकीय अधिवेशन, आंदोलनांमधून कोरोनाचा प्रसार होत नाही, पण MPSC परीक्षांच्या वेळीच कोरोना कसा पसरतो, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. केंद्राच्या UPSC, रेल्वे आणि इतर परीक्षा होत आहेत, असं असूनही राज्य सरकार वारंवार MPSC ची परीक्षा पुढे का ढकलत आहे, असा सवालही परिक्षार्थी विचारत होते.
पुण्यानंतर राज्यात नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर आणि इतर शहरांमध्येही विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं.
3. विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचीही टीका
"परीक्षा रद्द करणं अत्यंत अयोग्य ठरेल, मुलं वर्षानुवर्ष मेहनत करतात, त्यामुळे परीक्षा झाल्या पाहिजेत. सरकारनं हा निर्णय रद्द केला पाहिजे," असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
"वेगवेगळ्या विभागाची कार्यालय सुरू आहेत, अधिवेशन होत आहे, परीक्षासुद्धा होऊ शकते, त्यामुळे ज्या तारखेला परीक्षा ठरली होती त्याच तारखेला घ्या,प" असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं.
ग्रामीण भागातून आलेले हे विद्यार्थी आहेत, त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आला, असं भाजप नेते गोपिचंद पडळकर यांनी म्हटलंय.
दरम्यान, सत्तेत सहभागी असलेल्या पक्षांच्या नेत्यांनीही या निर्णयावर टीका केल्याचं दिसून आलं.
"असं अचानक शेवटच्या क्षणी परीक्षा रद्द करणं योग्य नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होतो. आधी यूपीएससीची परीक्षा झालेली आहे. काळजी घेऊन आपल्याला ही परीक्षा घेता येईल. अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांची शहरात राहण्याची सोय नाही. मी सरकारला विनंती करतो की हा निर्णय रद्द करावा," असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
"हा निर्णय चुकीचा आणि विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळणारा निर्णय असून 3 दिवस राहिले असताना परीक्षा पुढे ढकलणं निषेधार्ह आहे. याचं समर्थन होऊच शकत नाही, तातडीने हा निर्णय बदलला पाहिजे," असं महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबेंनी म्हटलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीसुद्धा हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली.
4. प्रशासनातील समन्वयाचा अभाव?
हा सगळा प्रकार सुरु असतानाच राज्य सरकारमधील तीन पक्ष तसंच प्रशासन या सगळ्यांमधील समन्वयाचा अभावही स्पष्टपणे दिसून आला. या निर्णयाबाबत आपल्याला माहिती नव्हतं, अशीच प्रतिक्रिया सरकारमधील मंत्र्यांकडून येऊ लागली.
"महाराष्ट्रातील MPSC च्या पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आपल्याला अंधारात ठेवून घेण्यात आलेला आहे. हा निर्णय सचिव स्तरावरून घेण्यात आला असून सरकारला याबाबत काहीच कल्पना देण्यात आली नाही," असं स्पष्टीकरण राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
MPSC कडून प्रसिद्ध झालेल्या पत्रकानुसर त्यांना 10 मार्च रोजी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पत्र प्राप्त झाल्याचं नमूद केलं आहे. पण हा निर्णय सचिव स्तरावरून घेण्यात आल्याचं सांगत वडेट्टीवार यांनी या प्रकरणातून अंग काढून घेतलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
5. मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
दिवसभरात या सगळ्या घडामोडी सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणावर बोलणार असल्याचं त्यांच्या कार्यालयाकडून संध्याकाळी कळवण्यात आलं. त्यानुसार रात्री साडेआठ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुकवर लाईव्ह आले.

फोटो स्रोत, @OFFICEOFUT
MPSC च्या विद्यार्थ्यांना झालेल्या गैरसोयीबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो, "14 तारखेची परीक्षा फक्त काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. मी स्वतः तारखांचा घोळ संपवा, अशा सूचना सचिवांना दिल्या आहे. शुक्रवारी (12 मार्च 2021) ही तारीख जाहीर होईल. येत्या आठवडाभरातच ही परीक्षा होईल. MPSC ची परीक्षा देण्यासाठी कुठल्याही विद्यार्थ्याला वयाच्या मर्यादेचं बंधन येणार नाही, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
पण यानंतरही विद्यार्थी आपल्या मागणीवर ठाम होते. MPSC परीक्षा ही ठरल्याप्रमाणे 14 मार्च रोजीच घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली होती.
आपण ही रात्र रस्त्यावरच झोपून घालवू, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. पण रात्री पोलिसांनी विद्यार्थ्यांना हटवून रस्ता मोकळा करून घेतला.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आज (शुक्रवारी) परीक्षेची नवी तारीख जाहीर होईल, आता त्यावर विद्यार्थ्यांची काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)