कंगना राणावत रिहानावर भडकली, शेतकरी आंदोलनावर ट्वीट केल्याचा आला राग

रियाना कंगना

फोटो स्रोत, Getty Images

तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सिंघू, गाजीपूर आणि टिकरी सीमांवर शेतकरी ठाण मांडून बसले आहेत.

या आंदोलनाची देशभरात चर्चा आहे. इतकंच नाही तर हा आता आंतरराष्ट्रीय मुद्दा बनला आहे.

ब्रिटनचे खासदार तनमनजीत सिंह धेसींसह अनेकांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

या यादीत आता आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाच्या नावाचाही समावेश झाला आहे. रियानाने 2 फेब्रुवारी रोजी भारतातल्या शेतकरी आंदोलनासंबंधी ट्वीट केलं.

सीएनएनच्या एका बातमीची लिंक शेअर करत ती लिहिते, "आपण या विषयावर का बोलत नाही?" या ट्वीटमध्ये त्यांनी #FarmersProtest हा हॅशटॅगही वापरला आहे.

रिहानाच्या या ट्वीटवर आजवर 66.9 हजार प्रतिक्रिया आल्या आहेत. 14 हजारांहून अधिक लोकांनी हे ट्वीट रिट्वीट केलंय. तर 154.4 हजार लोकांनी या ट्वीटला लाईक केलंय. भारतात रिहाना टॉप ट्वीटर ट्रेंड आहे.

रिहानाच्या ट्वीटवर प्रतिक्रिया

रिहानाच्या या ट्वीटवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींच्या मते हे ट्वीट पब्लिसिटी स्टंट आहे तर शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला यासाठी काही जण तिचं कौतुकही करत आहेत.

किसान एकता मोर्चानेही आपल्या ट्वीटर हँडलवरून ट्वीट करत रिहानाला धन्यवाद म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

@Kisanektamorcha ने म्हटलं आहे, "शेतकरी आंदोलनाप्रती काळजी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद रिहाना. संपूर्ण जगाला दिसतंय, मग सरकारला का नाही दिसत?"

मात्र, अभिनेत्री कंगणा राणावतने रिहानाच्या ट्वीटवर टीका करत तिला मूर्खही म्हटलंय.

कंगणा लिहिते, "कुणीच याविषयी बोलत नाही कारण ते शेतकरी नव्हे अतिरेकी आहेत. ते भारताला कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून चीनला आमच्या देशावर कब्जा करता यावा."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

मात्र, अनेकांनी कंगणाच्या या ट्वीटवर आक्षेप नोंदवत तिने अशा प्रकारची प्रतिक्रिया देऊ नये, असा सल्ला दिला आहे.

ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

भाजप नेते मनोज तिवारी यांनीही रियानाला टॅग करत म्हटलंय, "तू कुठे आहेस रिहाना? आपण या विषयी बोललं पाहिजे."

असं ट्वीट करत तिवारी यांनी काही आंदोलक एका पोलीस शिपायाला मारत असल्याचा फोटो शेअर केला आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

रिहानाच्या ट्वीटवर पोलीस अधिकारी प्रणव महाजन लिहितात, "कारण एखाद्याने त्या विषयावर बोलू नये, ज्या विषयाची त्याला माहितीच नाही."

ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

महाजन यांच्या ट्वीटवर सर्वोच्च न्यायालयातील वकील करुणा नंदी यांनी असहमती व्यक्त केली आहे.

पत्रकार रोहिणी सिंह यांनीही रियानाच्या ट्वीटवर प्रतिक्रिया दिली. त्या लिहितात, -

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

व्यंगचित्रकार मंजुल लिहितात, "सेलिब्रेटीने विचारलं की लोक शेतकरी आंदोलनाविषयी का बोलत नाहीत. लोक लगेच बोलू लागले त्या सेलिब्रेटीविषयी."

X पोस्टवरून पुढे जा, 6
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 6

जिग्नेश मेवानी यांनी #RihannaSupportsIndianFarmers या हॅशटॅगसह ट्वीट करत म्हटलं आहे -

X पोस्टवरून पुढे जा, 7
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 7

पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्गनेदेखील "आम्ही भारतातल्या शेतकरी आंदोलनाच्या बाजूने एकजुटीने उभे आहोत", असं ट्वीट करत शेतकरी आंदोलनाचं समर्थन केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 8
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 8

9 वर्षांची पर्यावरण कार्यकर्ता लिसिप्रियानेही रियानाचं समर्थन केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 9
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 9

मात्र, काहींनी हा भारतातला अंतर्गत मुद्दा आहे, असं म्हणत रिहानाला या मुद्द्यापासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे.

रिहानाच्या ट्वीटवर फाल्गुनी नावाच्या ट्विटर हँडलवरून लिहिण्यात आलंय - "हा आमच्या देशातला अंतर्गत विषय आहे आणि तुम्ही यात बोलू नका."

ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

काहींनी रिहानाचा ट्वीट पेड असल्याचाही आरोप केलाय.

ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

ट्वीटरवर आणखी काय ट्रेंड होतंय?

ट्वीटरवर रिहाना टॉप ट्रेंड आहे. त्यासोबतच #FarmersProtest आणि कंगणाही ट्रेंडिंग यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहे.

रिहाना कोण आहे?

32 वर्षीय रिहाना पॉप सिंगर आहे. जवळपास दहा वर्षांपूर्वी तिने तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. बिलबोर्ड हॉट 100 यादीत स्थान मिळवणारी ती सर्वांत कमी वयाची सिंगर आहे. रिहानाला आजवर 8 ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत.

रियाना

फोटो स्रोत, Getty Images

रिहाना पॉप सिंगर तर आहेच. शिवाय एक यशस्वी बिझनेस वुमनही आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)