महिला हक्क : दुसरं लग्न करण्याची भीती का?

लग्न, दुसरं लग्न, नातेसंबंध

फोटो स्रोत, PUNEET BARNALA/BBC

फोटो कॅप्शन, आपल्या समाजात दुसरं लग्न मान्य होतं का?
    • Author, चिंकी सिन्हा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारतात पहिलं लग्न मोठ्या धुम-धडाक्यात साजरं होतं. पण, दुसऱ्या लग्नाचं काय? त्यात लग्न महिला करत असेल तर? दुसरं लग्न वाजत-गाजत साजरं होताना पहायला मिळत नाही. त्यामुळे हा विवाह खास होता.

दुसरं लग्न नेहमीच शांततेत. निवडक कुटुंबियांच्या उपस्थितीत, धूम-धडाका न करता केलं जातं. 'लग्न आयुष्यात फक्त एकदाच होतं' असं आपण अनेकवेळा सहजपणे म्हणतो.

तेलगू गायीका सुनिता उपाद्रष्टा यांनी त्यांचा अत्यंत जवळचा मित्र राम वीरप्पन यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. लग्नाच्या दिवशी त्यांनी केसात गजरा घातला होता आणि लाल रंगाचं ब्लाउज घातलं होतं.

वयाच्या 42 वर्षी सुनिता यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नाचा आनंद अनेकांनी साजरा केला. पण, काहींनी याला विरोधही केला. सुनिता यांनी 19 वर्षांची असताना किरण कुमार गोपारागा यांच्याशी विवाह केला होता. मात्र, दोघांमध्ये घटस्फोट झाला होता.

लग्नातील फोटोमध्ये सुनिता यांच्यासोबत मुलगा आकाश आणि मुलगी श्रेया देखील दिसतात. ही दोन्ही मुलं पहिल्या लग्नापासून आहेत. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला फोटो सामान्य लग्नासारखाच आहे. पण, ज्या समाजात पुरुषांच्या तूलनेत फार कमी महिला दुसरं लग्न करतात. त्या समाजाविरोधात पुकारलेलं हे बंड असल्याचं दिसून येतं.

लग्न, दुसरं लग्न, नातेसंबंध

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, विवाहाचे पर्याय

महिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत नेहमीच चर्चा होते. एखादी महिला नव्याने जीवन सुरू करत असेल तर समाज दोन्ही बाजूने बोलतो. चर्चा या समाजाच्या मानसिकतेवरही करण्यात आली पाहिजे. जेणेकरून आपला समाज दुसरं लग्न करणाऱ्या महिलांबद्दल काय विचार करतो हे कळून येईल.

भारतात पिढ्यान-पिढ्यांपासून लग्नासाठी मुलगी कुमारी असावी अशी अट आहे. लहान वयात विधवा झालेल्या महिला आयुष्यभर एकट्या रहात होत्या. त्यांना अशुभं मानलं जातं. पण, आता समाज बदलतोय.

प्रेम आणि दुसरं लग्न

श्रीमोई पीयु कुंडू सहा वर्षांच्या असताना त्यांच्या काकाने आईला लग्नासाठी मागणी घातली. श्रीमोई यांनी 'स्टेटस सिंगल: द ट्रूथ अबाउट बीईंग सिंगल वुमन इन इंडिया' नावाचं पुस्तक लिहीलं आहे.

श्रीमोई सांगतात, "त्यांच्या वडिलांचं आई 20 वर्षांची असताना निधन झालं. त्यावेळी श्रीमोई फक्त तीन वर्षांच्या होत्या."

वडिलांच्या मृत्यूनंतर आईने आपल्या माहेरी कोलकत्यात रहाण्याचं ठरवलं. त्या एका शाळेत शिकवत होत्या. मुलीला सांभाळण्यासाठी ट्यूशन घेत होत्या. त्याचवेळी आंध्र प्रदेशमधील एक युवक त्यांच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून रहाण्यासाठी आला.

लग्न, दुसरं लग्न, नातेसंबंध

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लग्न

श्रीमोई सांगतात, "नियतीने त्यांच्या रूपात माझ्यासाठी नवीन वडील पाठवले होते. पहिल्या नजरेतच ते प्रेमात पडले."

12 वर्षांच्या असताना श्रीमोई यांना आपल्या आईबाबत निर्णय घ्यायचा होता.

श्रीमोई सांगतात, "आई त्यांच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी होती. मी बहुदा सहावीत असेन. मी त्यांना काका म्हणून हाक मारायचे. मी माझ्या खऱ्या वडिलांवर नाराज होते. त्यांना रागाच्या भरात चिठ्ठी लहायचे. माझ्या आईने काकांसोबत लग्न केलं तर? ते मला विसरून जातील. याची मला नेहमीच भीती वाटायची. आई लग्नानंतर खूप आनंदीत होती. काकांवर तिचं अपार प्रेम होतं."

श्रीमोई यांच्या आईचं लग्न औपचारिकता म्हणून झालं. श्रीमोई यांना आठवतं, आईने लाल रंगाची साडी नेसली होती. त्यानंतर ते आपल्या आवडत्या चायनीज हॉटेलमध्ये गेले आणि लग्नाचा आनंद साजरा केला. बस्स!

लग्न, दुसरं लग्न, नातेसंबंध

फोटो स्रोत, PuneetBarnala/BBC

फोटो कॅप्शन, ऑनलाईन लग्न

श्रीमोई पुढे म्हणतात, "माझ्या आईचं पहिलं लग्न मोठ्या धुम-धडाक्यात साजरं झालं. प्रत्येक मुलीला अशा लग्नाची इच्छा असते. पण, आईच्या दुसऱ्या लग्नानंतर मला खूप ऐकावं लागलं. तुझ्या आईचा नवीन बॉयफ्रेंड कसा आहे? असं विचारलं जायचं. वडील नसल्याने खूप त्रास देण्यात आला का?"

त्या पुढे म्हणातात, "महिलेसाठी दुसरं लग्न करून पुन्हा जीवन सुरू करणं फार कठीण आहे. आपला समाज महिलाविरोधी आहे."

श्रीमोई यांच्या आईने वयाच्या 60 व्या वर्षी एका मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. श्रीमोई यांच्या बहिणीचं नाव गेरू आहे.

दुसऱ्या लग्नाचं आव्हान

घटस्फोट किंवा विधवा महिलांना नव्याने जीवन सुरू करण्यासाठी एक पार्टनर शोधणं फार मोठं आव्हान आहे. समाजाच्या दबावाचा सामना त्यांना करावा लागतो.

गेल्या काही वर्षांमध्ये घटस्फोटित महिलांसाठी काम करणाऱ्या अनेक संघटना तयार झाल्या आहेत. विविध मॅट्रीमोनी साईट्सवर दुसरं लग्न करण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. विवाहबाह्य संबंधासाठी अनेक डेटिंग अॅप सुरू झाले आहेत.

फ्रान्समध्ये विकसीत करणाऱ्या आलेल्या डेटिंग अॅप ग्लीडीनच्या सांगण्यानुसार, "कोव्हिड-19 साथीदरम्यान भारतात त्यांच्या सब्सक्राईबर्सची संख्या 13 लाखांच्या पार पोहोचली आहे."

लग्न, दुसरं लग्न, नातेसंबंध

फोटो स्रोत, PuneetBarnala/BBC

फोटो कॅप्शन, लग्नासाठी पर्याय

गेल्या तीन महिन्यात त्यांच्या सब्सक्राईबर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याची माहिती, ग्लीडीनने दिली आहे.

त्यांच्या माहितीनुसार, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये भारतात त्यांचे सब्सक्राईबर्स जून ते ऑगस्ट या तिमाहीच्या तूलनेत 246 टक्क्यांनी वाढले.

ग्लीडीनच्या सांगण्यानुसार, "विवाहबाह्य संबंध जोडप्यात थेरपीसारखं काम करतात."

2016 च्या भारतीय मनुष्य विकास सर्वेक्षणानुसार, देशात विधवा, पतीपासून वेगळ्या राहाणाऱ्या आणि घटस्फोटित महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. ज्यावरून ही गोष्ट स्पष्ट होते की, भारतात पुरूषांच्या तूलनेत फार कमी महिला दुसरं लग्न करतात.

भारतात गेल्या दोन दशकात घटस्फोटाची प्रकरणं दुप्पट झाल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या एका रिपोर्टमध्ये अधोरेखित करण्यात आलंय.

या रिपोर्टनुसार, सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणाऱ्या महिलांमध्ये घटस्फोटाची संख्या जास्त आहे.

गेल्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले होते, "सुशिक्षित आणि श्रीमंत कुटुंबात घटस्फोटाची प्रकरणं वाढली आहेत कारण, महिलांमध्ये अहंकार निर्माण झाला आहे."

"समाजात कुटुंबाची ओळख महिलेपासून निर्माण होते," असं ते म्हणाले होते.

वेगळे का रहातात..हे जाणून घेण्यात समाजाची उत्सुकता

2015 मध्ये माझ्या दोन मैत्रिणींचं त्यांच्या पतीसोबत पटत नव्हतं. दोघी सुशिक्षित होत्या आणि करिअर चांगलं होतं.

एका मैत्रिणीचा पती तिच्यासोबत प्रतारणा करत होता. दुसरीला वाटत होतं तिचं पतीसोबत पटत नाहीये. दोन्ही जोड्या खूप छान होत्या.

लग्नाची जोडी विधाता ठरवतो. ती तोडणं गुन्हा आहे, असा विचार समाजाकडून केला जातो. माझी मैत्रिण घरी सोफ्यावर झोपायची. तिने पतीचं घर सोडलं नव्हतं.

लग्न, दुसरं लग्न, नातेसंबंध

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, साथीदार मिळवण्याचे कोणते पर्याय आहेत?

त्यानंतर तिचा पती घर सोडून गेला. घरातील फर्निचर नवीन ठिकाणी ठेवण्याचं तिने ठरवलं. प्रेम संपल्याने दोघं वेगळे झाले नाहीत. पण, काहीवेळा फक्त प्रेमाने चालत नाही. माझी मैत्रिण एकटी रहायची आणि एकांतात दिवस घालवायची. एका दिवशी फारच एकटं वाटायचं. मग माझ्याकडे यायची. मी तिला चहा बनवून एकटं सोडून द्यायचे.

ती दिसायला खूप सुंदर आहे. पण, पतीने सोडून दिलेल्या महिलांकडे पहाण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळा आहे.

लोकांना पती-पत्नी वेगळे का झाले हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. लोक म्हणतात, महिलेने प्रयत्न केला नसेल.

लग्नाचा शोध

2016 मध्ये माझ्या मैत्रिणीने तिच्या बेडरूममध्ये पुन्हा झोपण्यास सुरूवात केली. घर पुन्हा नव्याने सजवलं. सहाजिकच, तीने नव्याने आयुष्य सुरू करण्याचं ठरवलं होतं. तिच्या पतीने दुसरं लग्न केलं होतं. तिचे काही लोकांसोबत संबंध होतं. पण, दुसरं लग्न करू का नको, असा प्रश्न तिला पडला होता.

पण, माझ्या दुसऱ्या मैत्रिणीने घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर तिला मदतीसाठी कोणीच नव्हतं. पतीसोबत तडजोड कर, असं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं. एकट्याने आयुष्य जगता येणार नाही, असं त्यांचं म्हणणं होतं.

लग्न, दुसरं लग्न, नातेसंबंध

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लग्नसोहळा

घटस्फोटानंतर ती कोणा पुरूषासोबत आयुष्यभर जीवन जगेल. असा पुरूष शोधणं फार मोठं आव्हान होतं.

तिने डेटिंग साइट्सचा आधार घेतला. पण, अफेअर किंवा भेटीगाठींच्या पुढे गोष्ट गेली नाही.

माझ्या मैत्रिणींनी अजूनही लग्न केलेलं नाही.

प्रत्येकाची गोष्ट एकसारखी नाही

ज्योती प्रभू सांगतात, "सत्तरच्या दशकात मी भावाला भेटण्यासाठी अमेरिकेत गेले होते. न्यूयॉर्कमध्ये माझी भेट भावी पतीसोबत झाली."

त्या पुढे म्हणतात, "लग्नानंतर आम्हाला दोन मुली झाल्या. त्यांचं पालन-पोषण योग्य पद्धतीने केलं."

पण, 50-55 वर्षं वयाचे असताना त्यांच्या पतीचा मृत्यू झाला.

ज्योती प्रभू सांगतात, '"सहा वर्षं मी विधवा म्हणून जगले. एकटेपणाचा कंटाळा आला होता. एकटेपण खायला निघालं होतं. पुस्तकांमध्ये रस नव्हता. माझ्या कुटुंबीयांनी मला एका पत्नी नसलेल्या व्यक्तीशी भेटण्यासाठी सांगितलं. मी तयार झाले."

लग्न, दुसरं लग्न, नातेसंबंध

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लग्नविधी

ज्योती आपल्या पायावर उभ्या होत्या. पैशाची कमी नव्हती. त्यांना जीवन जगण्यासाठी एक आधार हवा होता.

ज्योती सांगतात, "मला डिनरला जाण्यासाठी. फिरण्यासाठी, पिच्चर पहाण्यासाठी एका आधाराची गरज होती. त्यानंतर आम्ही जीवनाचे उरलेले दिवस एकमेकांसोबत जगण्याचा निर्णय घेतला. त्यांची दोन मुलं आणि माझ्या मुली मोठे झाले होते. सर्व आपापल्या जीवनात व्यग्र होते. त्यामुळे आम्हाला एकमेकांना वेळ देण्यासाठी खूप वेळ होता."

एकटं राहण्याचा पर्याय आजही उपलब्ध नाही

आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यामुळे भारतात परिस्थिती बदलत आहे. पण, फार धीम्या गतीने.

दुसऱ्या लग्नाचा संबंध पिढीजात मिळणाऱ्या अधिकारांशी आहे. दुसऱ्या लग्नामुळे संपत्तीचं हस्तांतरण होतं. ही गोष्ट अनेकांना मान्य नसते.

भारतात कायद्यानुसार, घटस्फोट किंवा पतीपासून वेगळं झाल्यानंतर पत्नीच्या अधिकारांना फार सीमा असते. पत्नी पतीकडे पोटगीचा दावा करू शकते. भारतात लग्न आणि घटस्फोट विविध धर्मांच्या पर्सनल लॉ प्रमाणे ठरवली जातात.

लग्न, दुसरं लग्न, नातेसंबंध

फोटो स्रोत, PuneetBarnala/BBC

फोटो कॅप्शन, नातेसंबंध

सद्य स्थितीत भारतात विविध डेटिंग साइट्सवर दुसरं लग्न करण्याचे पर्याय दिले जात आहेत.

आर्थिक परिस्थिती आणि इतर अनेक कारणांनी महिला दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेत आहेत. पण, अनेकवेळा या निर्णयावर कौटुंबिक आणि सामाजिक दवाब असतो.

मॅट्रीमोनियल साइट्सच्या आकड्यांनुसार त्यात 70 टक्के युजर्स पुरूष असतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)