रॉयल एनफील्ड आणि भारतीय कंपन्यांचं ब्रिटिश मार्केटवर गारुड

रॉयल एनफील्ड, भारत, महिंद्रा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रॉयल एनफील्ड
    • Author, जस्टीन हार्पर
    • Role, बीबीसी न्यूज

ब्रिटिश मोटारबाईक कंपनी बीएसए गेल्या महिन्यात घोषणा केली की अब्जाधीश मालकाच्या अखत्यारीत कंपनीला नवी झळाळी प्राप्त करून देणार आहेत.

आणखी एक ब्रिटिश ब्रँड नॉर्टन 2019 मध्ये भारतीय कंपनीने विकत घेतला होता.

या कंपन्या ऐतिहासिक रॉयल एनफील्डच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

रॉयल एनफील्ड कंपनी भारतीय मालकांच्या ताब्यात आल्यानंतर नवनवी शिखरं पादाक्रांत करत आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांना मात्र एनफील्डच्या वाटचालीचं आश्चर्य वाटत नाही.

भारतीय उत्पादकांना लोकप्रिय मात्र अडचणींनी वेढलेल्या ब्रँड खरेदी करण्यात स्वारस्य असतं. या कंपन्यांचा कायापालट करू शकू असा विश्वास भारतीय उत्पादकांना असतो.

ब्रिटनमध्ये महिंद्रा

भारतीय अब्जाधीश आनंद महिंद्रा म्हणाले, "मला विश्वास आहे की बीएसए ब्रँडअंतर्गत युकेत इलेक्ट्रिक बाईकची निर्मिती करून ब्रिटनच्या मोटारबाईक इंडस्ट्रीला उभारी देऊ".

महिंद्रा ग्रुप 2021च्या मध्यापर्यंत बर्मिंगहॅममध्ये मोटारबाईक्सची असेंबल करू इच्छित आहे.

दुसरीकडे, नव्याने उभी राहिलेली बीएसए लवकरच ऑक्सफर्डशायरमधल्या बॅनबरीमध्ये संशोधन केंद्राची उभारणी करत आहे. इलेक्ट्रिक मोटारबाईक टेक्नॉलॉजी विकसित करण्यासाठी या केंद्रातलं संशोधन उपयोगी ठरेल. अर्थात या मोटारबाईक्स पेट्रोल इंजिनावर चालणाऱ्या असतील.

रॉयल एनफील्ड, भारत, महिंद्रा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महिंद्रा समूहाला यंदाच्या वर्षात ब्रिटनमध्ये मोटारबाईक उत्पादन सुरू करायचं आहे.

फोर्ब्स मासिकाने दिलेल्या माहितीनुसार, महिंद्रा यांची संपत्ती 1.7 बिलिअन डॉलर्स एवढी आहे. मोटारसायकल उत्पादनांचा अनुभव असल्यानेच त्यांनी युकेत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

बीएसए अर्थात बर्मिंगहॅम स्मॉल आर्म्स कंपनीची स्थापना 1861 मध्ये झाली. 1950पर्यंत ही कंपनी जगातली सगळ्यात मोठी बाईक उत्पादन करणारी कंपनी आहे. ट्रायम्फ आणि सनबीम ब्रँड त्यांच्याकडेच होते.

मात्र ही कंपनी दिवाळखोरीत निघाली आणि त्यांनी 1970च्या दशकात उत्पादन बंद केलं. 2016मध्ये महिंद्रा समूहाने ही कंपनी विकत घेतली.

बीएसए कंपनीची मालकी क्लासिक लिजंड्स कंपनीकडे आहे. या कंपनीत महिंद्रा समूहाची 60 टक्के भागीदारी आहे.

रॉयल एनफील्ड, भारत, महिंद्रा

फोटो स्रोत, Screen grab

फोटो कॅप्शन, बीएसए कंपनीचं मुख्यालय याठिकाणी आहे जिथे बीबीसीच्या एका कार्यक्रमाचं चित्रीकरण झालं होतं.

संयुक्त उपक्रम असलेल्या या कंपनीला युके सरकारचा पाठिंबा आहे. युके सरकारने बीएसए कंपनीला इलेक्ट्रिक बाईक तयार करण्यासाठी 4.6 दशलक्ष युरो इतकं अनुदान दिलं आहे. बीएसए किमान अडीचशेहून अधिक लोकांना रोजगार मिळवून देईल अशी सरकारची अपेक्षा आहे.

"क्लासिक ब्रिटिश बाईक तरुणांना आकर्षित करते तसंच सातत्याने राईडिंग करणाऱ्यांना त्यांच्या उमेदीचा काळ जागवण्यासाठी ही बाईक चांगलं निमित्त ठरतं", असं स्कॉट ल्युकायटिस यांनी सांगितलं. स्कॉट हे मोटारस्पोर्ट्स सल्लागार आहेत.

लुक आणि बाईकचा अनुभव त्यांनी इलेक्ट्रिक बाईकमध्ये ग्राहकांना मिळवून दिला तर बाजारात त्यांची चलती होऊ शकते असं स्कॉट सांगतात.

रॉयल एनफील्ड, भारत, महिंद्रा

फोटो स्रोत, CLASSIC LEGENDS

फोटो कॅप्शन, क्लासिक लिजंड्सचे सहसंस्थापक अनुपम थरेजा यांच्याबरोबर आनंद महिंद्रा

"या प्रकल्पाचा आकार लहान असला तरी हे आस्थापन युकेतल्या मोटारबाईक व्यवसायाला नवी झळाळी प्राप्त करून देईल", असं महिंद्रा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

एप्रिल महिन्यात नॉर्टन कंपनी टीव्हीएस या भारतीय कंपनीने 16 दशलक्ष युरो इतक्या किमतीला विकत घेतली. 1989 मध्ये स्थापना झालेली नॉर्टन मोटारस्पोर्ट्स बाईक्सच्या निर्मितासाठी प्रसिद्ध आहे. कार्यरत स्थितीत असलेल्या मोजक्या ब्रिटिश मोटारसायकल ब्रँडमध्ये नॉर्टनचा समावेश होतो.

डॉमिनेटर आणि कमांडो या कंपनीची काही खास मॉडेल्स आहेत. 1980च्या दशकात युके पोलीस नॉर्टन कंपनीच्या इंटरपोलचा वापर करत असे. विंटेज अर्थात पूर्वीच्या काळातील बाईक मॉडेल्सकडे जतन करणाऱ्यांचं लक्ष असतं.

रॉयल एनफील्ड, भारत, महिंद्रा

फोटो स्रोत, NORTON

फोटो कॅप्शन, नॉर्टन कंपनीला टीव्हीएसने खरेदी केलं.

गेल्याच महिन्यात नॉर्टन कंपनीने ठराविक प्रमाणात कमांडो क्लासिक बाईक्सच्या निर्मितीला पुन्हा सुरुवात केली. नव्या वर्षात कंपनी नव्या दमाने बाईक निर्मितीत ठसा उमटवू पाहते आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन रसेल सांगतात, "यानंतर आम्ही सायकलची निर्मिती करणार आहोत. बाईक्सच्या आणखी काही मॉडेल्सची घोषणाही आम्ही करू.

अत्याधुनिक अशा नव्या प्लांटमुळे उत्पादन वेगाने होऊ शकेल", असं त्यांना वाटतं.

फ्रॉस्ट अँड सुलीवान या सल्लागार फर्ममध्ये कार्यरत ऑटोमोबाईल क्षेत्रातील जाणकार विवेक वैद्य सांगतात की, "या ब्रिटिश बाईक भारतीय रस्त्यांवर नियमितपणे दिसत असत. जुन्या चित्रपटांमध्ये या बाईक तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. या बाईक पोलीसही वापरत असत.

भावनिक मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवला तरी भारतीय कंपन्या मजबूत स्थितीत असल्यानेच या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात".

ते पुढे सांगतात, "हे ब्रँड अडचणीत सापडले होते. त्यांना तोटा सहन करावा लागत होता. त्यांना पुढे काम सुरू ठेवणं अवघड झालं होतं. भारतीय कंपन्या एक लोकप्रिय ब्रँड आपल्या नावाशी जोडला जाईल तसंच पाश्चिमात्य बाजारांमध्ये त्यांना पाय रोवता येईल".

वैद्य यांनी यासंदर्भात लँड रोव्हरचं उदाहरण दिलं. टाटा समूहाने हा ब्रँड 2008 मध्ये खरेदी केला. टाटांनी या कंपनीला नफ्यात आणलं.

"भारतीय कंपन्यांचे हे विचारपूर्वक डावपेच आहेत. ते एक ब्रँड विकत घेतात आणि त्यामार्फत अनेक देशांमध्ये पोहोचतात. यातून त्यांना फायदा होतो, उत्पादनही वाढीस लागतं. हे ब्रँड्स अशा पद्धतीनेच वाढवायला हवेत".

रॉयल एनफील्ड, भारत, महिंद्रा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एनफील्ड चालवणारे ग्राहक

ब्रिटिश कंपनी रॉयल एनफील्ड आक्रमक पद्धतीने विस्तारत आहे. आशियातील मोटारबाईक्स क्षेत्रातील सगळ्यात मोठ्या जगतावर अधिराज्य गाजवण्याचा त्यांचा मनसुबा आहे.

जगातल्या सगळ्यात प्राचीन बाईक ब्रँड्समध्ये गणना होणाऱ्या रॉयल एनफील्ड कंपनीवर 1994 पासून भारताच्या आयशर समूहाचा मालकी हक्क आहे. अलीकडेच कंपनीने थायलंडमध्ये नवीन फॅक्टरी सुरू करण्याची योजना आहे.

नव्या फॅक्टरीतून एका वर्षाच्या आतच उत्पादन सुरू होईल. भारताबाहेरची कंपनीची ही सगळ्यात मोठी फॅक्टरी असेल.

रॉयल एनफील्ड, भारत, महिंद्रा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रॉयल एनफील्ड

250 ते 750 सीसी प्रकारात रॉयल एनफील्डची विक्री गेल्या वर्षात 88 टक्क्यांनी वाढली आहे.

1950 आणि 1960च्या दशकानंतर हे ब्रँड्स अडचणींच्या फेऱ्यात असले तरी संपले नव्हते. ही गोष्ट वेगळी की या ब्रँड्सवर आता केवळ ब्रिटिश कंपन्यांची मालकी नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)