कोरोनाः महाराष्ट्रात लष्कर बोलवावं लागेल, असं वाटल्याचं उद्धव ठाकरे का म्हणाले?

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, facebook

"कोरोनाची साथ सुरू झाली तेव्हा आपल्याला प्रशासकीय अनुभव नव्हता. रुग्णालयंही कमी पडणार असं वाटत असल्यामुळे राज्यात लष्कराला पाचारण तर करावं लागणार नाही ना, अशी भीती वाटली होती", असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

कोरोना व्हायरस काळात चांगली कामगिरी बजावणाऱ्या पत्रकारांना कोव्हिड योद्धा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं, त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, "जेव्हा कोव्हिड आला तेव्हा मला प्रशासकीय अनुभव नव्हता. अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं तेव्हाच वाटलं हॉस्पिटल कमी पडणार... असं एका क्षणी वाटलं लष्कराला तरी पाचारण करावं लागणार नाही ना...?

"कोरोनाच्या पहिले दोन महिने पहाटे पहाटे पर्यंत व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सगळं ठरवत होतं. अनेक गोष्टी कळत कळत आपण इथपर्यंत आलो. जेव्हा 24 मार्चला लॉकडाऊन जाहीर झाला त्याआधी 17 तारखेपासून मजुरांसाठी केंद्राकडे ट्रेन मागत होतो. पण तेव्हा 'अभी नही' वगैरे झालं. मग नंतर ते चालत निघाले." असं म्हणत ठाकरे यांनी केंद्रावर टीका केली.रात्रीच्या संचारबंदीचं कारण काय या प्रश्नालाही ठाकरे यांनी उत्तर दिलं.

ते म्हणाले, "रात्रीची संचारबंदी... मग अनेकजण विचारतात दिवसा कोरोना येत नाही का? थोडी बंधन लोकांवर राहिली पाहिजेत. युकेमध्ये कोरोनाचा दुसरा प्रकार आला. आपण विमानं बंद केली. टेस्टींग वाढवलं. पण विविध देशात विविध स्ट्रेन येतायत. आपण दरवाजे बंद केले आहेत. पण एखादी खिडकी उघडी राहिली तर काय? हा कोणी विचारच केला नाही. तेव्हाही ही त्रिसूत्री कामी येईल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)