कोरोना लॉकडाऊन :...म्हणून राज्यात कठोर निर्बंध लागू करावे लागतील-राजेश टोपे

राजेश टोपे

फोटो स्रोत, Twitter

कोरोनाचं संकट कमी झालेलं नाही. राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. दिल्ली तसंच गुजरातमध्ये जे झालं आहे तसं होऊ द्यायचं नसेल तर राज्यात कठोर निर्बंध लागू करावे लागतील, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

बिनधास्त फिरण्याची प्रवृत्ती वाढत असल्याने पुन्हा निर्बंध लागू होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. "आपल्याला घराबाहेर पडताना मास्क परिधान करावाच लागेल. घराबाहेर असताना सोशल डिस्टन्सिंग पाळावंच लागेल. दिल्लीत मास्क परिधान न करणाऱ्यांना २००० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. राज्यातल्या लोकांनी सहकार्य केलं तर असा जबर दंड आकारावा लागणार नाही. लॉकडाऊन लागू केला नसला तरी निर्बंध लागू करण्यात येतील. मुख्यमंत्र्यांचीही तशी भूमिका आहे," असं टोपे यांनी स्पष्ट केलं.

यासंदर्भात दोन दिवसात मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर घोषणा केली जाईल असं टोपे यांनी सांगितलं. लग्न समारंभांकरता दोनशे लोकांच्या उपस्थितीली असलेली परवानगी कमी करण्यात येणार असल्याचे संकेतही आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.

गर्दी करणं टाळायला हवं. गर्दीच्या वेळा टाळायला हव्या. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर निर्बंध सिथील केले होते, पण पुन्हा आकडे वाढत असतील तर निर्बंध पुन्हा कठोर करावे लागतील, असं त्यांनी सांगितलंय.

हे नक्की वाचा

हे आवर्जून पाहा

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)