मिलिंद सोमण यांच्याविरोधात न्यूड फोटो प्रकरणी गुन्हा दाखल

फोटो स्रोत, Milind Soman/FACEBOOK
अभिनेता मिलिंद सोमणविरोधात गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. न्यूड फोटो प्रकरणामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिलिंद सोमण यांनी काही दिवसांपूर्वी गोवा इथल्या बीचवर न्यूड फोटोशूट केलं होतं आणि तो फोटो सोशल मीडियावर टाकला होता.
बुधवारी (4 नोव्हेंबर) मिलिंद सोमण यांनी 55व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा गोवा बीचवर विनावस्त्र धावतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
त्यांनी या फोटोला "55 and running!" असं शीर्षक दिलं होतं. त्यांच्या पत्नीनं हा फोटो काढला होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त, 1
"मिलिंद सोमण यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 294 आणि IT कायद्यातील कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे," अशी माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकज सिंग यांनी दिली आहे.
राजकीय संघटना गोवा सुरक्षा मंचच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सिंग यांनी सांगितलं आहे.
पूनम पांडेला जामीन
शुक्रवारी (9 नोव्हेंबर) अभिनेत्री पूनम पांडे हिला गोवा पोलिसांनी अटक केली होती. काही दिवसांपूर्वी पूनमने गोव्याच्या चापोली धरणावर न्यूड फोटोशूट आणि व्हिडियोशूट केलं होतं. याच प्रकरणात तिला अटक झाली होती. कॅनकोना पोलिसांनी तिला अगौदा इथल्या रिसॉर्टमधून अटक केली होती.
या फोटो शूटविरोधात गोव्याच्या फॉर्वर्ड पक्षाच्या महिला विंगने पोलिसात गुन्हा नोंदवला होता. हा अश्लिलता पसरवण्याचा प्रयत्न असल्याचं आणि अशाप्रकारचे व्हिडियो पॉर्न असल्याचं त्यांचं म्हणणं होतं.
दरम्यान, कॅनकोना इथल्या न्यायालयानं याप्रकरणी पूनम पांडेला जामीन मंजूर केला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त, 2
पूनम पांडेचा हा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अनेकांनी ही अश्लीलता असल्याचं म्हटलं. गोव्यात विरोधी पक्षांनी यावरून आवाज उठवल्यावर अखेर पोलिसांनी कारवाई केली होती.
दरम्यान, मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण आणि पूनम पांडेच्या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर वेगवेगळी मतं पाहायला मिळत आहेत.
फोटोशूटची तुलना
फिल्ममेकर अपूर्व असरानी यांनी पूनम पांडेच्या फोटोविषयी ट्वीटमध्ये लिहिलं "पूनम पांडे आणि मिलिंद सोमण दोघंही आपल्या बर्थडे सूटमध्ये गोव्यात दिसले. पांडे हाफ न्यूड तर सोमण पूर्ण न्यूड. अश्लिलतेसाठी पांडेवर कायदेशीर कारवाई झाली. तर सोमण यांना 55 व्या वर्षी तंदुरुस्त शरीरयष्टीसाठी लोकांचं प्रेम मिळतंय. मला वाटतं आपण निर्वस्त्र स्त्रियांच्या तुलनेत निर्वस्त्र पुरूषांप्रती अधिक दयावान आहोत."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
लेखक अमर वाणी लिहितात, "मिलिंद सोमण याने निर्वस्त्र धावणे आणि पूनम पांडेचं शूट यात फरक आहे. मिलिंद पांडेला तुमच्या नाजूक भावनांना गुदगुल्या करायच्या नाहीत. त्यांचा फोटो हा निखल स्वतःची अभिव्यक्ती (self-expression) आहे आणि तो अत्यंत सुंदर आहे. पण तिच्याबाबतीत असं म्हणता येत नाही. दोन्ही फोटो सारखे नाहीत."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
हे वाचलंत का?

YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)