बिहार निवडणूक 2020: गुप्तेश्वर पांडे यांचं तिकीट या कारणामुळे हुकलं का?

गुप्तेश्वर पांडे

फोटो स्रोत, Gupteshwar Pandey/facebook

फोटो कॅप्शन, गुप्तेश्वर पांडे
    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

जेडीयूनं (जनता दल युनायटेड) बुधवारी (7 ऑक्टोबर) बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 115 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत गुप्तेश्वर पांडे यांचं नाव नाहीये.

बिहारचे माजी पोलीस उपसंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी गेल्या महिन्यात स्वेच्छानिवृत्ती घेतली होती आणि त्यानंतर बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जेडीयूमध्ये प्रवेश केला होता.

पांडे यांना विधानसभेचं तिकीट दिलं जाईल अशी त्यावेळी अशी चर्चा होती. पण, आता उमेदवारांच्या यादीत त्यांचं नाव नसल्यामुळे यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

पांडे काय म्हणाले?

उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पांडे यांनी फेसबुकवर लिहिलं, "मी सेवानिवृत्ती घेतल्यानंतर सगळ्यांना वाटलं होतं की मी निवडणूक लढवेल. पण, मी यावेळी विधानसभेची निवडणूक लढणार नाही. पण, यामुळे नाराज होऊ नको. संयम ठेवा. माझं जीवन संघर्ष करण्यात गेलं आहे."

"मी संपूर्ण जीवन जनतेची सेवा करणार आहे. बिहारच्या जनतेप्रती माझं जीवन समर्पित आहे," असंही त्यांनी म्हटलंय.

उमेदवारी न मिळण्याची कारणं...

गुप्तेश्वर पांडे यांना उमेदवारी न मिळण्यामागे तीन कारणं असू शकतात असं स्थानिक पत्रकार नीरज प्रियदर्शी यांना वाटतं.

त्यातलं पहिलं कारण म्हणजे भाजप आणि जेडीयूचं जागावाटप होण्याच्या दोन दिवस आधी स्थानिक मीडियामध्ये बातम्या आल्या होत्या की, गुप्तेश्वर पांडे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यानंतर या चर्चेनं अधिक जोर धरला. नीतीश कुमार यांना ते पटलं नसावं आणि मग पांडे यांना जेडीयूनं तिकीट दिलं नसावं.

गुप्तेश्वर पांडे

फोटो स्रोत, FACEBOOK/GUPTESHWAR PANDEY

दुसरं म्हणजे बिहारमध्ये जेडीयू आणि भाजप यांची आघाडी सत्तेत आहे. गुप्तेश्वर पांडे ज्या बक्सर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा होती, तो मतदारसंघ भाजपला सोडण्यात आला आहे. भाजपनं इथून परशुराम चतुर्वेदी यांना तिकीट दिलं आहे.

तिसरं म्हणजे सुशांत सिंगची हत्या नसून आत्महत्या झाल्याचा अहवाल AIIMSनं सीबीआयकडे दाखल केल्यानंतर भाजप या मुद्द्यावर काही बोलत नाही. पण, देवेंद्र फडणवीस सुरुवातीला बिहार निवडणुकीचे प्रभारी म्हणून तेव्हा मात्र त्यांनी सुशांत मृत्यू प्रकरणाचा उल्लेख केला होता.

त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून रोज याबाबतीत काही ना काही वक्तव्यं यायची. पण, आता ती थांबली आहेत. सुशांत मृत्यू प्रकरणाबाबत गुप्तेश्वर पांडे मीडियात खूप काही बोलले. आता जर त्यांना भाजप म्हणा किंवा जेडीयू यांनी तिकीट दिलं असतं तर त्या पक्षाकडे लोकांनी गुप्तेश्वर पांडेंच्या वक्तव्यांचा पुरावा मागितला असता आणि इतर रिस्क कोणतीच पार्टी घेऊ शकणार नाही.

फडणवीस यांनी पांडेंचा प्रचार केला असता का?

देवेंद्र फडणवीस हे भाजपचे बिहार निवडणुकीचे प्रभारी आहेत. जर पांडेंना तिकीट मिळालं तर तुम्ही अशा माणसाच्या प्रचाराला जाल का ज्याने मुंबई पोलिसांना लक्ष्य केलं होतं. असा सवाल आम्ही भाजपला विचारला. या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. आमच्या प्रश्नाला घाबरूनच पांडेंचं तिकीट कापलं गेलं असं गृहमंत्री अनिल देशमुख यांना वाटतं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

'सुशांत प्रकरणी सरकारला आरोप नको होते'

बिहारमधील ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक मणिकांत ठाकूर याप्रकरणाकडे वेगळ्या दृष्टीनं बघतात.

त्यांच्या मते, "सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात गुप्तेश्वर पांडे यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आणि बरीच उलटसुलट वक्तव्यं केली. त्यावेळी अशी सर्रास चर्चा सुरू झाली की, बिहारमध्ये निवडणूक आहे म्हणून सुशांत सिंह मृत्यू प्रकरण उचललं जात आहे. भाजप-जेडीयूला या प्रकरणाचा राजकीय फायदा घ्यायचा आहे, अशी ही चर्चा होती. त्यानंतर काही दिवसांनी गुप्तेश्वर पांडेनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि जेडीयूत प्रवेश केला.

"आता जर जेडीयूनं त्यांना उमेदवारी दिली असती तर ते त्यांनी सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात केलेल्या कामगिरीचं बक्षीस आहे, असं समजलं गेलं असतं. सरकारवर सरळसरळ तसा आरोप लागला असता. भाजप आणि जेडीयूला हे नको होतं. म्हणून मग या दोन्ही पक्षांनी गुप्तेश्वर पांडेंना दूर ठेवणं पसंत केलं."

गुप्तेश्वर पांडे

फोटो स्रोत, FACEBOOK/GUPTESHWAR PANDEY

'बोलण्याची सवय महाग पडली'

गुप्तेश्वर पांडे यांना पहिल्यापासून माध्यमांसमोर यायची आणि वक्तव्यं करण्याची सवय आहे. हीच सवय त्यांना महागात पडल्याचं प्रियदर्शी सांगतात.

त्यांच्या मते, "गुप्तेश्वर पांडे पहिल्यापासून माध्यमस्नेही आहेत. त्यांना बोलायची फार सवय आहे. त्यांची एक दबंग अधिकाऱ्याची इमेज बनवण्यात आली आहे. ही इमेज नीतीश कुमार कधीच स्वीकारू शकत नसते. कारण, नीतीश यांच्या पक्षात त्यांना फक्त एकच बोलणारा नेता आवडतो, तो म्हणजे स्वत: नीतीश कुमार."

गुप्तेश्वर पांडे यांनी काही दिवसांपूर्वी जेडीयूमध्ये प्रवेश केला.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, गुप्तेश्वर पांडे यांनी काही दिवसांपूर्वी जेडीयूमध्ये प्रवेश केला.

मणिकांत ठाकूर यांच्या मते, "गुप्तेश्वर पांडे सतत काही ना काही बोलत असतात. त्यामुळे ते मीडियातही अधिक झळकतात. त्यामुळे मग उद्या हा नेता आपल्याला भारी पडेल, अशी शंकाही नीतीश कुमार यांच्या मनात आली असू शकते. कारण असा नेता दबून राहणं शक्य नसतं."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)