बाबरी मशीद खटला: लालकृष्ण अडवाणींसह सर्व आरोपींनी हजर राहावे; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

लालकृष्ण आडवाणी

फोटो स्रोत, Getty Images

बाबरी मशीद खटल्याच्या सुनावणीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांना न्यायालयात हजर राहण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

आज 30 सप्टेंबरला लखनौच्या विशेष न्यायालयात बाबरी प्रकरणाचा निकाल दिला जाणार आहे.

28 वर्ष चाललेल्या या खटल्याने देशाच्या राजकारणाची दिशाच बदलून टाकली.

स्पेशल सीबीआय न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव या खटल्याचा निकाल जाहीर करतील. याप्रकरणातली सर्व आरोपींना अंतिम सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर 1 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता.

बाबरी मशीद, अयोध्या

फोटो स्रोत, K K MUHAMMED

फोटो कॅप्शन, बाबरी मशीद

केंद्रीय अन्वेषण विभागाने या खटल्यात 351 साक्षीदार न्यायालयासमोर सादर केले. 600 पुरावे मांडले.

कारसेवकांनी 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडली होती. लालकृष्ण अडवाणी, कल्याण सिंग, उमा भारती यांच्यावर बाबरी मशिदी पाडल्याचा कट केल्याचा आरोप आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रोहिंटन फली नरिमन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने 19 ऑगस्ट रोजी एक महिन्याचा वेळ मागून घेतला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )