'अमित शाह आणि राम मंदिराच्या पुजाऱ्यांना धर्माचे पालन न केल्यामुळे कोरोना': दिग्विजय सिंह

दिग्विजय सिंह

फोटो स्रोत, Getty Images

1. अमित शहा यांना अशुभ मुहुर्तामुळे कोरोना-दिग्विजय

सनातन धर्म आणि हिंदू परंपरेचं उल्लंघन केल्यामुळेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राम मंदिराच्या पुजाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे.

हिंदू धर्मातील मान्यतांना न मानल्याने असं झालं आहे. अशुभ मुहुर्तावर कोरोनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सनातन हिंदू धर्माच्या मान्यता डावलल्याचा हा परिणाम आहे असं दिग्विजय यांनी लिहिलं आहे.

भगवान राम हे कोट्यवधी हिंदू भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या धर्माच्या नियमांना तिलांजली देऊ नका असं दिग्विजय यांनी ट्वीट करून म्हटलं आहे. महाराष्ट्र टाईम्सने यासंदर्भात बातमी दिली आहे.

कोरोना
लाईन

अशुभ मुहुर्तावर भूमीपूजन करून तुम्ही किती लोकांना रुग्णालयात पाठवू इच्छिता असा सवाल दिग्विजय यांनी पंतप्रधान मोदी यांना केला आहे. तुम्ही असताना सनातन धर्माच्या नियमांचं उल्लंघन होतं आहे. तुमचा एवढा नाईलाज का झाला आहे असं दिग्विजय यांनी विचारलं आहे.

2. हिंदुत्वाचा विसर पडल्याची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल-दरेकर

सत्तेसाठी शिवसेनेला हिंदुत्व आणि सामाजिक बांधिलकाची विसर पडला आहे. शिवसेनेला याची किंमत मोजावी लागेल असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. खेड तालुक्यातील भाजप मेळाव्यात अनेक शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दरेकरांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. सकाळने ही बातमी दिली आहे.

प्रवीण दरेकर

फोटो स्रोत, Getty Images

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने धर्मनिरपेक्ष सरकार असल्याचं सांगत हिंदूंशी दुजाभाव केला. अयोध्येतील विवादित ढाचा पाडण्यात पुढाकार घेणाऱ्या बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार अयोध्येत जाऊ देतील का? असा सवाल दरेकर यांनी केला.

3. अजितदादांना मुख्यमंत्रीपदी पाहायचं आहे, बहिणीची इच्छा

दादा अर्थात अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पाहायची इच्छा आहे असं त्यांची बहीण डॉ. रजनी इंदुलकर यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधानपदी तर अजितदादांना मुख्यमंत्रीपदी पाहायचं आहे.

आमच्या सर्वांच्या मनातील इच्छा एक दिवस पूर्ण व्हावी अशी आहे असं त्यांनी सांगितलं. बहीण म्हणून अजित पवार यांनी काही दु:ख असेल तर ते हलकं करण्याची संधी द्यावी असंही त्या म्हणाल्या. लोकमतने ही बातमी दिली आहे.

तुम्ही सगळ्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी, ओळखीच्या माणसांसाठी केलं आहे. कधीतरी तुमच्या मनात काय आहे, हे शेअर करा.

4. अमित शाह बरे होईपर्यंत रोजा ठेवणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत रोजा ठेवणार असल्याचं जम्मू काश्मीरमधील नेते गुफ्तार अहमद यांनी म्हटलं आहे. अमित शहा यांना बरं वाटावं म्हणून अल्लाकडे प्रार्थना करतो आहे. त्यांना पूर्ण बरं वाटत नाही तोपर्यंत रोजे ठेवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. लोकमत न्यूज18ने ही बातमी दिली आहे.

अमित शाह यांनी स्वत: ट्वीट करून कोरोना झाल्याचं सांगितलं होतं. प्रकृती स्थिर आहे मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हॉस्पिटलमध्ये दाखल होत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

5. मुंबई पोलीस आमची शान, आमचा गर्व-केदार शिंदे

आता बास्स झालं. मुंबई पोलीस, तुम्ही आमची शान आहात, गर्व आहात. सतत तुमच्या विषयी नकारात्मक बातम्या सुरू आहेत. कुणीही येतंय आणि टिकली वाजवून जातंय. तोंडावर त्यांना पुरावे द्या. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा समारोप करा. तुमच्यावर आम्हाला गर्व आहे अशा शब्दांत दिग्दर्शक केदार शिंदे यांनी मुंबई पोलिसांची पाठराखण केली आहे. टीव्ही9 मराठीने यासंदर्भात बातमी दिली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणासंदर्भात मुंबई पोलिसांवर टीका केली होती. त्यासंदर्भात केदार यांनी हे वक्तव्य केलं आहे.

सुशांतच्या जाण्याचं दु:ख आपल्या सगळ्यांनाच आहे. त्या प्रकरणाचा छडा लावाच. लोकांना वेगळ्याच घटनेत गुंतवून देशासमोरचे महत्त्वाचे विषय बाजूला सारले जात आहेत. हे जाणीवपूर्वक चाललंय असा सवाल केदार शिंदे यांनी विचारला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)