स्पेक्सएक्स ड्रॅगन कॅप्सूल : पहिल्या व्यावसायिक अंतराळयानाची यशस्वी सफर

फोटो स्रोत, NASA/BILL INGALLS
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनतर्फे अंतराळात पाठवण्यात आलेल्या पहिल्या कमर्शियल यानात सफर करून दोन अमेरिकन अंतराळवीर सुखरुप पृथ्वीवर परतले.
स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल डग हर्ले आणि बॉब बेहेनकेन यांना घेऊन मेक्सिकोच्या खाडीत उतरलं. रिकव्हरी व्हेईकलच्या माध्यमातून त्यांना किनाऱ्यावर आणण्यात आलं.
45 वर्षांनंतर नासाचे अंतराळवीर समुद्रात उतरले आहेत. याआधी अपोलो कमांड मॉड्यूल समुद्रात उतरलं होतं.
कॅप्सूल ड्रॅगनच्या आजूबाजूच्या बोटींना सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. कॅप्सूलवर धोकादायक रसायनं असू शकतात हे लक्षात घेऊन ही सूचना देण्यात आली होती.
या मोहिमेचा भाग होणं अभिमानाचं आणि सन्मानाचं असल्याचं डग हर्ले यांनी म्हटलं आहे.
'स्पेक्स एक्स आणि नासाच्या वतीने पृथ्वीवर तुमचं मनापासून स्वागत. स्पेक्स एक्सचं परिचलान केल्याबद्दल मनापासून धन्यवाद,' असं स्पेक्सएक्स मिशन कंट्रोलने म्हटलं आहे.
दोन महिन्यांपूर्वी कॅप्सूल लाँच करण्यात आलं तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप उपस्थित होते. ट्रंप यांनीही ट्वीट करून मोहीम फत्ते केल्याबद्दल चमूचं अभिनंदन केलं आहे.

फोटो स्रोत, NASA/BILL INGALLS
नासाचे अंतराळवीर पृथ्वीवर सुरक्षित परतले आहेत ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. थँक्यू असं ट्रंप यांनी म्हटलं आहे.
ही मोहीम फत्ते होणं ही अमेरिकेच्या अंतराळ संस्थेसाठी नव्या युगाची सुरुवात आहे.
येणाऱ्या काळात अंतराळात माणसाला पाठवण्यासाठी स्पेसएक्ससारख्या कंपन्यांची मदत घेतली जाऊ शकते. अशा पद्धतीने सेवा देणाऱ्या कंपन्यांशी करार करण्यात आला तर सरकारच्या कोट्यवधी रुपयांची बचत होऊ शकते, असं सरकारी संस्थांचं म्हणणं आहे.
वाचलेल्या पैशांचा उपयोग अन्य प्रकल्पांसाठी म्हणजेच मंगळ किंवा चंद्रावर पाठवण्यासाठी केला जाऊ शकतो.
ड्रॅगन कॅप्सूल मे महिन्याच्या शेवटी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसाठी लाँच करण्यात आलं होतं. फाल्कन 9 रॉकेटच्या साह्याने ते प्रक्षेपित करण्यात आलं होतं.
ही मोहीम फत्ते झाल्याने पृथ्वीहून अंतराळात आणि अंतराळातून पृथ्वीवर जाण्यायेण्याचा मार्ग सुकर झाला आहे. टॅक्सी सर्व्हिस कंपनीचे मालक एलन मस्क हे नासाला विकू शकतील.
खाजगी कंपनीद्वारे प्रक्षेपण का?
2003 मध्ये कोलंबिया शटल पृथ्वीवर परतताना झालेल्या दुर्घटनेच्या केंद्रस्थानी पडल्यानंतर नासाने स्पेसशिप विकसित करण्याचा निर्णय घेतला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
2014 मध्ये उद्योगपती एलन मस्क यांनी स्पेसएक्स आणि अंतराळ वहन क्षेत्रातील मोठी कंपनी बोइंग क्रू ट्रान्सपोर्ट यांनी नासाचं कंत्राट मिळवलं.
स्पेसएक्स काय आहे?
स्पेसएक्स अमेरिकन कंपनी आहे. फाल्कन 9 आणि फाल्कन हेवी रॉकेट्सच्या साह्याने ही कंपनी कमर्शियल आणि सरकारी लाँच सेवा देते.
उद्योगपती एलन मस्क यांनी 2002 मध्ये या कंपनीची स्थापना केली. अंतराळात वाहतुकीसाठी लागणारी संसाधनं आणि त्यासाठी येणारा खर्च कमी करणं हा कंपनीचा हेतू आहे. मंगळ ग्रहावर मानवी वस्ती साकारणं हेही कंपनीचं उद्दिष्ट आहे.
कंपनी आयएसएसवर नियमितपणे कार्गो पाठवते. आता कंपनी अंतराळवीरांना लाँच करते आहे. स्पेसएक्सतर्फे स्टारशिप नावाचं यान तयार केलं जात आहे. मंगळावर मानवी वस्ती वसवण्यासाठी याचा उपयोग केला जाईल.
एलन मस्क कोण आहेत?
दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या मस्क यांनी त्यांची ऑनलाईन पेमेंट कंपनी पेपल ईबे कंपनीला विकली. या व्यवहारातून त्यांनी 16 कोटी डॉलरची कमाई केली.
माणसाला अंतराळात पाठवणं या मस्क यांच्या स्वप्नातून या कंपनीची स्थापना झाली. टेस्ला ही इलेक्ट्रिक कार तयार करणारी कंपनीही मस्क यांचीच आहे.
हायपरलूप प्रोजेक्टवरही ते काम करत आहेत. यामध्ये ट्यूब सिस्टमच्या माध्यमातून हायस्पीड वाहतूक प्रणाली कार्यान्वित करण्यात येते.
मार्व्हल कॉमिक्सच्या रॉबर्ट डॉनी ज्युनिअर यांच्या टोनी स्टार्क या पात्रामागची प्रेरणा ही एलन मस्क यांच्या शौकीन व्यक्तिमत्वातूनच मिळाली आहे.
मस्क हे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यातूनच त्यांना टेस्ला कंपनीचं चेअरमन पदही सोडावं लागलं आहे. मात्र तूर्तास ते टेस्लाच्या सीईओपदी आहेत.
हे लाँच इतकं महत्वाचं का?
2011 मध्ये स्पेस शटल बाद झाल्यानंतर नासाला अंतराळवीरांना पाठवण्यासाठी रशियाला लाखो डॉलर खर्च करावे लागले. रशिया अंतराळवीरांना सोयूज स्पेसक्राफ्टच्या माध्यमातून अंतराळात पाठवतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








