You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानचा शस्त्रास्त्ररुपी ड्रोन भारताने पाडला
जम्मू काश्मीरमधल्या कठुआजवळ शस्त्रास्त्रं घेऊन आलेल्या पाकिस्तानच्या ड्रोनला भारताच्या सीमा सुरक्षा दलाने पाडलं.
शनिवारी सकाळी हेरगिरी करणारा पाकिस्तानचा ड्रोन भारतीय हद्दीत सुरक्षा यंत्रणांना दिसला. या ड्रोनच्या बरोबरीने शस्त्रास्त्रंही होती.
पहाटे 5 वाजून 10 मिनिटं झालेली असताना भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या 'एरिया ऑफ रिस्पॉसिबिलिटी' क्षेत्रात हा ड्रोन दिसला. सीमा सुरक्षा दलाच्या हिरानगर चेकपोस्टच्या अधिकाऱ्यांना अशी वस्तू दिसली.
देवेंदर सिंग यांनी 8 फैरी झाडत ड्रोनला भारतीय जमिनीवर, आंतरराष्ट्रीय सीमेपासून 250 मीटर आतमध्ये पाडलं असं सूत्रांनी सांगितलं.
हेक्सा कॉप्टर असं या ड्रोनचं नाव असून, 8*6 फूट याचा आकार आहे. चार बॅटरी असणाऱ्या या ड्रोनची क्षमता 22000 mah एवढी आहे. या ड्रोनला एक रेडिओ सिग्नल रिसिव्हर तैनात करण्यात आला होता.
या ड्रोनच्या बरोबर 7 ग्रेनेड्स, 2 काडतुसं, अमेरिकन बनावटीची बंदूक आणि बंदुकीच्या गोळ्या अशी शस्त्रास्त्रं होती.
ड्रोनच्या बरोबर असलेली शस्त्रं सीमा सुरक्षा दलाने ताब्यात घेतली आहेत.
काही दिवसांपूर्वी पंजाबमध्येही पाकिस्तानचा ड्रोन भारतातर्फे पाडण्यात आला. प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळ पाकिस्तानकडून जोरदार फायरिंग होत आहे. जम्मू काश्मीरमधील कट्टरतावाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराने मोहीम हाती घेतली आहे. यामुळे वातावरण संवेदनशील झालं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)