कोरोना मुंबई: लॉकडाऊन आणि रेड झोनमधून बाहेर पडण्यासाठी मुंबई पोलीसने जारी केले हे 5 नियम

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईतील कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे.
भारत सरकारनं मुंबईचा समावेश रेड झोनमध्ये केल्यामुळे काही दिशानिर्देश नियमांचं पालन करणं आवश्यक आहे, असं मुंबई पोलीस आयुक्तालयानं जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.
4 ते 17 मे या कालावधीदरम्यान या नियमांचं पालन करावं लागणार आहे. मुंबईत सध्या राज्यात सर्वाधिक केसेस आहेत.
या पत्रात सांगितलेली नियमावली पुढीलप्रमाणे-
1. एकापेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी फिरता येणार नाही. तसंच धार्मिक स्थळांवर लोकांना एकत्र जमता येणार नाही.
2. अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी 8 ते सकाळी 7 पर्यंत फिरण्यास परवानगी नाही.
3. सकाळी 7 ते संध्याकाळी 8 पर्यंतच्या हालचाली लॉकडाऊनच्या नियमानुसार करण्यात याव्यात.
4. सहा फुटांचं सोशल डिस्टन्सिंग पाळावं लागणार. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा पालन बंधनकारक.
5. कुणीही व्यक्ती या नियमांचं उल्लंघन करताना आढळल्यास IPCच्या 188 व्या कलमांतर्गत गुन्हा दाखल होणार.

फोटो स्रोत, Mumbai Police
राज्यात आतापर्यंत कोरोनाचे 13 हजारहून जास्त रुग्ण आढळले आहेत. तसंच मुंबई आणि पुणे महानगरचा भाग वगळता नागपूर, मालेगाव, औरंगाबाद आणि यवतमाळमध्येही रुग्णांची संख्या वाढतच असल्याने रेड झोन जाहीर करण्यात आली आहेत.

फोटो स्रोत, ANI
महाराष्ट्रातील रेड झोन - मुंबई, पुणे, ठाणे (जिल्हा), नाशिक (शहर-ग्रामीण), मालेगाव, पालघर, नागपूर (शहर-ग्रामीण), सोलापूर (शहर-ग्रामीण), यवतमाळ, औरंगाबाद (शहर-ग्रामीण), सातारा, धुळे (शहर-ग्रामीण), अकोला (शहर-ग्रामीण), जळगाव (शहर-ग्रामीण).
महाराष्ट्रातील ऑरेंज झोन - रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, नंदूरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा आणि बीड.
महाराष्ट्रातील ग्रीन झोन - उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया, वर्धा

- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








