उद्धव ठाकरे बहुमत चाचणीः विधानसभेत पहिला दिवस गाजला या 9 गोष्टींमुळे
.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी पाठिंबा दिल्यामुळे उद्धव ठाकरे यांचं सरकार तरलं खरं, परंतु बहुमत चाचणीचा दिवस मात्र वेगवेगळ्या कारणांनी गाजला.
1) विरोधकांचा अधिवेशनावरच आक्षेप

बहुमताची चाचणी घेण्यासाठी कामकाज सुरू करताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण अधिवेशनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
"सदस्यांचा शपथविधी झाल्यानंतर राष्ट्रगीत होऊन ते अधिवेशन संपलं होतं. त्यामुळे आज जमलेले सदस्य हे नव्या अधिवेशनासाठी जमलेले आहेत. असे अधिवेशन सुरू होण्यासाठी राज्यपालांनी समन्स काढण्याची गरज होती," असा आक्षेप फडणवीसांनी घेतला.
त्यावर हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटलांनी फडणवीसांचा मुद्दा फेटाळला. हे अधिवेशन कायदेशीर आणि नियमानुसार असल्याचं ते म्हणाले.
2) 'प्रोटेम स्पीकर का बदलले?'
देवेंद्र फडणवीस यांनी प्रोटेम स्पीकर का बदलला, असा प्रश्न उपस्थित केला. प्रोटेम स्पीकर (हंगामी विधानसभा अध्यक्ष) बदलण्याची कोणतीही पद्धती नाही, असं त्यांनी सांगितलं.
"तसेच प्रोटेम स्पीकरच्यासमोर बहुमताची चाचणी घेण्यात यावी, असा सुप्रीम कोर्टाने केवळ 'त्या' दिवसाबाबतीत निर्णय दिला होता. आज प्रोटेम स्पीकरसमोर बहुमत घेण्याची गरज नव्हती. त्यासाठी अध्यक्षांची निवड होण्याची आवश्यकता होती," असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
3) मंत्र्यांची शपथ घटनाबाह्य?
उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतल्या मंत्र्यांनी घेतलेली शपथ घटनाबाह्य असल्याचं मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं. घटनेत दिलेल्या मसुद्याप्रमाणे या मंत्र्यांनी शपथ घेतली नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
4) विरोधकांचा सभात्याग
आपण मांडलेल्या मुद्द्यांवर पीठासीन अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाचं समाधान न झाल्यामुळे भाजपा सदस्यांनी सभात्याग केला. त्यामुळे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचा मार्ग अधिकच सोपा झाला.
5) शिरगणतीत आकड्यांचा गोंधळ
गोंधळामुळे आवाजी मतदानानंतर आमदारांची शिरगणती करण्याचा निर्णय हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी घेतला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी उभं राहून नाव सांगून पुढे क्रमाने 1, 2, 3... असा क्रमांक बोलून मोजणीला सुरू केली. मात्र त्यातही आमदार चुकत होते.
कुणाला त्यांच्या आधीचा क्रमांक लक्षात न आल्यामुळे किमान तीन-चार वेळा अधिकाऱ्यांना त्या आमदारांना त्यांच्या चुका लक्षात आणून द्याव्या लागल्या.
6) 'आदित्य रश्मी-उद्धव ठाकरे'
एकीकडे अनेक आमदारांना मागच्या आमदाराच्या पुढील क्रमांकही योग्यपणे सांगता आला नाही. तर वरळीचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी आपं नाव 'आदित्य रश्मी-उद्धव ठाकरे' असं सांगितलं.
7) 4 आमदार तटस्थ
भाजपने सभात्याग केल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या आमदारांबरोबर काही अपक्ष आणि लहान अपक्षांचे आमदार सभागृहात राहिले.
आधी महाविकास आघाडीचे आमदार एक एक करून क्रमांक सांगताना जेव्हा आकडा 144-145 वर आला तेव्हा सभागृहात जल्लोष सुरू झाला. त्यानंतर जेव्हा 162वर आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्वतःचं नाव घेतलं, तेव्हा आणखी टाळ्या वाजल्या.
अखेर, उद्धव ठाकरे सरकारच्या बाजूने 169 आमदारांनी मतदान केलं तर 4 आमदार तटस्थ राहिले. MIMचे दोन, मनसे आणि माकप यांच्या प्रत्येकी एका सदस्याने तटस्थ राहाण्याचा निर्णय घेतला आणि ते तटस्थ राहात असल्याचं कामकाजात नोंद करण्यात आलं.
8) नेत्यांची भाषणं
आजच्या मतदानानंतर सर्व पक्षांच्या नेत्यांनी थोडक्यात भाषण करून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. तसंच "आम्ही आम्हाला आदरणीय वाटणाऱ्या आदर्शांची नावं शपथेच्यावेळी घेतली होती. त्यामुळे विरोधकांना का त्रास झाला," असा प्रश्न विचारला.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी "कदाचित विरोधीपक्षनेते पदासाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यात चुरस असावी म्हणून देवेंद्र फडणवीस असे आक्रमक झाले असावेत," असा टोला लगावला.
9) 'इथं येताना दडपण होतं'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही विरोधकांच्या आजच्या भूमिकेवर प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त केली.
"मी मैदानातला माणूस... इथे वैधानिक कसं वागायचं, मला ठाऊक नाही. इथे आल्यावर असं वाटलं की यापेक्षा मैदानच चांगलं. आज मी रिकाम्या बाकांशी मी बोलणार नाही, कारण रिकाम्या मैदानात मी तलवारबाजी करत नाही," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पहिल्या विधानसभेतील भाषणात म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रथमच सभागृहात येत असल्यामुळे त्यांचं अनेक सदस्यांनी अभिनंदन केलं. आज प्रथमच सभागृहात येत असल्यामुळे आपल्यावर दडपण आलं होतं, असं त्यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)