IPL 2019 : हार्दिक आणि कृणाल पंड्या दोघांनी अवघ्या तीन ओव्हरमध्ये बदललं सामन्याचं चित्र

पांड्या

फोटो स्रोत, Getty Images

सामन्याचं रूप पालटण्यासाठी आयपीएलमध्ये एक ओव्हर पुरेशी असते तेव्हा तीन ओव्हर या किती महत्त्वपूर्ण असतात याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो.

गुरुवारी दिल्ली विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं शेवटच्या तीन ओव्हरमध्ये 50 धावा काढल्या याच धावा मुंबईच्या विजयाला कारणीभूत ठरल्या.

हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पांड्याने 54 धावांची भागीदारी करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. दिल्लीच्याच होम ग्राऊंडवर मुंबईने त्यांना पाणी पाजलं आणि 40 धावांनी विजय मिळवला.

दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 169 धावांचं आव्हान होतं. पण त्यांना 20 ओव्हरमध्ये केवळ 128 धावाच काढता आल्या. मुंबईच्या राहुल चाहरने 19 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट काढल्या.

नाणेफेक जिंकून मुंबईने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 20 ओव्हरमध्ये 168 धावा काढल्या.

हेलिकॉप्टर शॉटसाठी महेंद्रसिंह धोनी प्रसिद्ध आहे. पण अगदी धोनीच्या शैलीची साधर्म्य असणारे फटके लगावत हार्दिक पांड्याने 15 चेंडूत 32 धावा कुटल्या.

हार्दिक पांड्याचा मोठा भाऊ कृणाल पांड्याने 26 चेंडूत 37 धावा काढल्या. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने देखील मान्य केलं की शेवटच्या दोन ओव्हरमुळेच मॅच आमच्या हातून गेली.

जेव्हा दिल्लीचे फलंदाज खेळण्यासाठी उतरले तेव्हा शिखर धवन चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याला पृथ्वी शॉची उत्तम साथ मिळत होती.

शिखर धवन

फोटो स्रोत, Getty Images

पहिल्या विकेटसाठी 6.3 ओव्हरमध्ये त्यांनी 49 धावांची भागीदारी केली. पण ही जोडी फुटल्यानंतर दिल्लीला विशेष कामगिरी बजावता आली नाही.

जेव्हा दिल्लीने 107 धावापर्यंत मजल मारली त्यानंतर त्यांच्या एकापाठोपाठ एक अशा तीन विकेट गेल्या.

लसिथ मलिंगाच्या 16 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर क्रिस मॉरिस झेलबाद झाला. त्यानंर कीमो पॉल धावबाद झाला. आणि जसप्रीत बुमराहने अक्षर पटेलला बोल्ड केलं. दिल्लीचा स्कोअर 107/8 असा होता. यानंतर दिल्ली हरणार हे जवळपास अनिश्चित झालं होतं.

या खेळात पांड्या बंधुनी रंग भरला. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून फलंदाजीला सुरुवात केली आणि 15 ओव्हरमध्ये 104 धावा काढल्या. पण जेव्हा दोघं भाऊ खेळपट्टीवर आले तेव्हा दृश्य पूर्णपणे बदललं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)