धुमसत्या काश्मीरमध्ये ट्युलिपची बहार; निसर्गाची रंगवर्षा

श्रीनगरमधली ट्यूलिप गार्डन

फोटो स्रोत, AAMIR PEERZADA

1. जम्मू-काश्मिरची राजधानी श्रीनगरमध्ये असलेलं ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. आशियातील हा ट्युलिपचा सर्वांत मोठा बगीचा आहे. हा बगीचा पर्यटकांसाठी खुला करण्यासोबतच राज्यातील पर्यटनाचा नवीन सीझन सुरू झालाय.

2. ट्युलिपचं सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक येत आहेत. एका आठवड्यात 70 हजारहून अधिक पर्यटकांनी या ट्युलिप गार्डनला भेट दिली आहे. पर्यटनाच्या आधारे गुजराण करणाऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.

श्रीनगरमधली ट्यूलिप गार्डन

फोटो स्रोत, KAMRAAN RAASHID BHAT

3. या बागेत 12 लाखांहून अधिक ट्युलिपची रोपं आहेत. ट्युलिपच्या रोपाचं आयुष्य तीन ते चार वर्षांचं असतं. वेगवेगळ्या रंगाच्या ट्युलिपच्या फुलांमुळे बगीचा 'इंद्रधनुषी' झाला आहे.

श्रीनगरमधली ट्यूलिप गार्डन

फोटो स्रोत, KAMRAAN RAASHID BHAT

4. दल सरोवराच्या काठावर असलेल्या जबरवान टेकड्यांमध्ये 90 एकरच्या क्षेत्रात ट्युलिप फुलांचा हा गालिचा पसरला आहे.

श्रीनगरमधली ट्यूलिप गार्डन

फोटो स्रोत, KAMRAAN RAASHID BHAT

5. काश्मीर खोऱ्यातील पर्यटनाचा सीझन दोन महिन्यांनी वाढावा, या उद्देशानं ट्युलिप बगीचा तयार करण्यात आला आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांची वाढती संख्या पाहता हा उद्देश सफल होताना दिसत आहे.

श्रीनगरमधली ट्यूलिप गार्डन

फोटो स्रोत, KAMRAAN RAASHID BHAT

6. लाल, गुलाबी, पिवळ्या, पांढऱ्या, निळ्या आणि जांभळ्या रंगाची ट्युलिपची फुलं पाहून असं वाटतं, की रंगांचा गालीचा जमिनीवर पसरला आहे. जगभरातून पर्यटक ट्युलिपचा बगीचा पहायला येतात.

श्रीनगरमधली ट्यूलिप गार्डन

फोटो स्रोत, KAMRAAN RAASHID BHAT

7. श्रीनगरमधल्या बादामवाडीतली बदामाच्या झाडांची रांगही नजर खेचून घेते. कदाचित त्यामुळेच बादामवाडी जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे.

श्रीनगरच्या बादामवाडीतली झाडं

फोटो स्रोत, AAMIR PEERZADA

8. बादामवाडी कोह-ए-मारन पर्वतरांगांमध्ये वसलेलं ठिकाण आहे. इथं वर्षभर पर्यटक येत असतात. मात्र मार्च महिन्यात इथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झालेली दिसते.

श्रीनगरच्या बादामवाडीतली झाडं

फोटो स्रोत, AAMIR PEERZADA

9. बादामवाडीतील वेगवेगळ्या रंगाची फुलं या छोट्याशा गावाला अधिक मनमोहक बनवतात.

बादामवाडीतली झाडं

फोटो स्रोत, AAMIR PEERZADA

10. काश्मीर खोऱ्यात मोहरीची ही पिवळी फुलंही ट्यूलिपच्या सौंदर्याशी स्पर्धा करत आहेत. वसंत ऋतूच्या सौंदर्यात या पिवळ्या धमक फुलांनी अधिक भर घातली आहे.

मोहरीची पिवळी फुलं

फोटो स्रोत, KAMRAAN RAASHID BHAT

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)