सुप्रिया सुळे: 'मी मुख्यमंत्री व्हावं असं अजितदादांना वाटणं, हे त्यांचं प्रेम'
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
बारामती लोकसभा मतदारसंघ प्रत्येक लोकसभा निवडणुकीत चर्चेत असतो तो शरद पवार यांच्यामुळे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या मतदारसंघाच्या खासदार आहेत. यावेळी माढा, मावळ आणि बारामती हे मतदारसंघ आणि पवार घराण्याच राजकारण चर्चेत राहील. पवार घराण्यात गृहकलह सुरू असल्याच्याही चर्चा सुरू होत्या. पण सुप्रिया सुळे यांनी खासदार म्हणून काम करणार असल्याचं बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केलं.
सुप्रिया सुळे यांनी बीबीसी मराठीला विविध विषयांवर सविस्तर मुलाखत दिली.
त्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील का असा प्रश्न सतत चर्चेत असतो. यापूर्वी अजित पवार यांनी सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्यास आवडेल असं मत व्यक्त केलं होतं.
म्हणाल्याबद्दल त्या म्हणाल्या, "मला माझ्या पक्षानं नेहमीच लोकसभेचं तिकीट दिलं आहे आणि मी खासदार म्हणूनच काम करेन. मुख्यमंत्रिपद किंवा कोणत्याही पदासाठी स्त्री किंवा पुरुष असे मापदंड लावता येत नाहीत. त्यासाठी केवळ कर्तृत्व आणि संवेदनशीलता हे मापदंड असतात. मी मुख्यमंत्री होण्याची इच्छा अजितदादांनी व्यक्त करणं यातून त्यांचं प्रेम व्यक्त होतं."
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसवर पवार कुटुंबातील व्यक्तींनाच राजकारणात अधिकाधिक संधी देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. तसेच राष्ट्रवादीचा ताबा आता अजित पवार घेत आहेत असा थेट आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथे झालेल्या सभेत केला. त्यामुळेच घराणेशाहीचा आरोप अधिक चर्चेत आला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यासर्व आरोपांना राष्ट्रवादीच्या खासदार आणि पक्षाच्या बारामती मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये उत्तरे दिली.
त्या म्हणाल्या, घराणेशाही सर्वत्र आहे. ती कोणीच नाकारत नाही. परंतु त्यासाठी आम्हाला निवडून यावं लागतं. जर तुम्हाला वैद्यकक्षेत्र, विधी, मीडिया अशा क्षेत्रांमध्ये घराणेशाही चालते मग तोच न्याय आम्हाला का लावत नाही?

फोटो स्रोत, Getty Images
पवार कुटुंबात अंतर्गत संघर्ष सुरू आहे का असे विचारताच त्यांनी तसं काहीही नसल्याचं सांगितलं. "या प्रश्नाला आपण आता कंटाळलो आहोत. देशात निवडणुका आल्या आहेत आणि मला आमच्या कुटुंबाबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. (या प्रश्नाला) मी कंटाळले आहे. हा प्रश्न च्युइंगमसारखा झाला आहे. त्यात काहीही राहिलेले नाही. प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस वेगळे निर्णय घेतले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसलाच हा प्रश्न का विचारला जातो? मला दुष्काळाबद्दल का प्रश्न विचारला जात नाही? लोकसभेसाठी पार्थ आणि विधानसभेसाठी रोहित असं काहीही ठरलेलं नाही." असं त्या म्हणाल्या.
'खऱ्या विषयांवर चर्चा होतच नाही'
शरद पवार यांच्या राष्ट्रवादाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी विधान केल्याबद्दल सुप्रिया सुळे म्हणाल्या, "शरद पवार यांच्या राष्ट्रवादाबद्दल कोणीच शंका घेऊ शकणार नाही. महाराष्ट्रात जोपर्यंत तुम्ही शरद पवार यांना लक्ष्य करत नाही तोपर्यंत तुम्ही बातम्यांच्या मथळ्यांमध्ये झळकूच शकत नाही. महाराष्ट्रासमोर पवार कुटुंब हा विषय नाही तर बेकारी आणि दुष्काळ हे विषय आहेत. खऱ्या विषयांवर ते बोलत नाही हे दुर्दैवच आहे."

फोटो स्रोत, Getty Images
या प्रश्नावर बोलताना त्या पुढे म्हणाल्या, " ही निवडणूक राष्ट्रवादाबद्दल नाही तर (केलेल्या) कामगिरीबद्दल आहे. लोकांना चांगलं अन्न, आरोग्यसुविधा आणि शिक्षण मिळणं म्हणजे राष्ट्रवाद असं माझं मत आहे."
'शरद पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाहीत'
शरद पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत का? असे विचारताच सुप्रिया सुळे म्हणाल्या, "शरद पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाहीत. ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतील. केंद्रामध्ये नवं सरकार आल्याचं तुम्हाला दिसेल. केंद्रामध्ये मंत्रिपदाचा मी कोणताही विचार केलेला नाही."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








