नरेंद्र मोदींच्या सभेतून मणिपूरचे लोक उठून गेले का? - फॅक्ट चेक

मोदींची सभा

फोटो स्रोत, SM VIRAL POST

    • Author, फॅक्ट चेक टीम
    • Role, बीबीसी न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंफाळ (मणिपूर) इथल्या सभेचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जातो आहे. या व्हीडिओत असं दिसतं आहे की पोलिस काही तरूणांना एका दरवाजातून बाहेर जाण्यापासून थांबवत आहेत.

'2014 मध्ये लोक स्वतःहून मोदींच्या रॅलीमध्ये येत होते, पण 2019 मध्ये मात्र पोलिसांच्या बळाचा वापर करून त्यांना थांबवाबं लागत आहे.' असं त्यावर लिहिलं आहे.

'मणिपूर टॉक्स' नावाच्या स्थानिक वेबसाईटने हा व्हीडिओ शेअर केला आणि लिहिलं, "मोदींच्या सभेच्या वेळेस मोठा गोंधळ उडाला. लोकांनी सभा सोडून जाऊ नये म्हणून पोलिसांना बरीच मेहनत करावी लागली. त्यांना बॅरिकेड लावून लोकांना थांबवावं लागलं. ही लाजिरवाणी गोष्ट आहे."

या वेबसाईटच्या ट्विटर हॅण्डलवर पोस्ट केलेला हा व्हीडिओ जवळपास तीन लाख वेळा पाहिला गेला आहे आणि शेकडो लोकांनी याला रीट्वीट केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

खरंच असं झालं होतं का?

हा व्हीडिओ फेसबुक आणि शेअर चॅटवरही अनेकदा शेअर झाला आहे. यातल्या अनेक युझर्सनी लिहिलंय की मोदींच्या भाषणाने निराश होऊन मणिपूरचे लोक सभा अर्ध्यातच सोडून उठून निघून गेले.

सोशल मीडियावर एक-दोन व्हीडिओ असेही दिसतात ज्यात पोलिसांनी सभेच्या मैदानाचं गेट बंद केलं आहे आणि महिला त्या लोखंडी गेटवर चढून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

रविवार, 7 एप्रिल 2019 ला मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये नक्की काय झालं होतं? सभा अर्ध्यातून सोडून लोक खरंच निघून गेले का? आम्ही याची पडताळणी केली.

नरेंद्र मोदींच्या सभेची वेळ

नरेंद्र मोदींची सभा इंफाळ ईस्ट जिल्ह्यातल्या कंगला पॅलेसपासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हप्ता कंगजेईबुंग मैदानात आयोजित केली होती.

भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदींच्या सभेचं जे वेळापत्रक जाहीर केलं होतं, त्यानुसार ते संध्याकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी मणिपूरच्या या सभेला पोहोचणार होते.

पण मणिपूर भाजपने या सभेचं जे पोस्टर प्रसिद्ध केलं त्यानुसार ही सभा दुपारी 2.30 वाजता होणार होती.

मोदींची सभा

फोटो स्रोत, TWITTER/@BJP4MANIPUR

रविवारी ही सभा कव्हर करायला गेलेल्या काही स्थानिक पत्रकारांनी बीबीसीला सांगितलं की सकाळी 10 पासूनच लोक सभेच्या मैदानात पोहोचायला लागले होते.

पंतप्रधान येणार म्हणून रविवारी मणिपूरध्ये सक्रीय असणारी भूमिगत कट्टरतावादी संघटना कोरकोमने या भागात बंदचं आवाहन केलं होतं.

पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या वेळेस आपला विरोध दर्शवण्यासाठी ही संघटना नेहमीच बंद पुकारते.

भाजप समोरचं आव्हान

मणिपूरचे भाजप प्रवक्ते विजय चंद्र यांनी बीबीसीचे सहयोगी पत्रकार दिलीप कुमार शर्मा यांना सांगितलं की पंतप्रधानांच्या दौऱ्यांची त्यांना बरीच काळजी होती.

"सुरक्षिततेच्या कारणाशिवाय आम्हाला याचीही चिंता होती की बंदमुळे सभेला कमी गर्दी होऊ शकते. म्हणूनच आम्ही सभेची वेळ अडीच वाजताची सांगितली होती. पण जे लोक लांबून लांबून आले होते ते सकाळी 11 वाजताच पोचले होते," विजय चंद्र यांनी सांगितलं.

काही स्थानिक पत्रकारांनी सांगितलं की सभेच्या ठिकाणी सूत्रसंचालक घोषणा देत होते की पंतप्रधान कोणत्याही क्षणी आता लोकांमध्ये उपस्थित होती. त्यांचं स्वागत करायला सगळे उभे राहतील आणि त्यांना नमस्कार करतील.

मोदींची सभा

फोटो स्रोत, Getty Images

हे सगळं घडत असताना दिवस मावळायला लागला होता, त्याची काळजी लोकांना होती. मणिपूरमध्ये संध्याकाळी 5 नंतर दिवस मावळतो.

ऑनलाईन मीडियामध्ये काही बातम्या आल्यात ज्यात असं म्हटलं आहे की लोकांची वाढती अस्वस्थता पाहून मणिपूरचे मंत्री थोंगम बिस्वजीत यांनी सभेच्या ठिकाणी संगीत वाजवायला सांगितलं.

यूट्यूबच्या एका व्हीडिओमध्ये थोंगम बिस्वजीत यांना "पीएम मोदींकडे मणिपूर आणि उत्तर भारतासाठी काय संदेश आहे ते ऐकायला थोडी वाट पाहा," असं म्हणताना आपण ऐकू शकतो.

पण मोदी आपल्या ठरलेल्या वेळापत्रकापेक्षा जवळपास दीड तास उशिरा सभास्थानी पोहचले आणि या दरम्यान काही लोकांनी मैदान सोडून बाहेर जायला सुरूवात केली.

पोलिसांची जबरदस्ती

रविवारी संध्याकाळी 4 वाजून 37 मिनिटांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बीरेन यांनी काही फोटो ट्वीट केले आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं होतं, "माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठ्या संख्येने लोक वाट पाहात आहेत."

भाजपचे प्रवक्ता विजय चंद्र यांनी सांगितलं, "जे लोक सकाळपासून वाट पाहून कंटाळले होते आणि ज्यांना अंधार पडण्याची काळजी होती, त्यांना वाटलं की जोपर्यंत पंतप्रधानांचं भाषण चालेल तोपर्यंत अंधार पडेल आणि ते बाहेर पडू शकणार नाहीत आणि म्हणूनच काही लोकांचा एक गट गेटच्या बाहेर जायचा प्रयत्न करायला लागला. पण पोलिसांनी त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव रोखलं."

आपल्या मर्जीने सभा सोडून जाणाऱ्या लोकांना पोलिसांनी जबरदस्ती का थांबवलं या प्रश्नावर इंफाळ ईस्टचे पोलिस अधिक्षक जोगेश चंद्रा हाऊबिजन यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हप्ता कंगजेईबुंग मैदानात 5 वाजून 23 मिनिटांनी आपलं भाषण सुरू केलं आणि ते जवळपास 22 मिनिटं बोलले.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

या सभेचा जो व्हीडिओ 'नरेंद्र मोदींचं भाषण ऐकून, नाराज लोक अर्ध्यातून सभा सोडून जायला लागले,' असं म्हणत शेअर केला जातो, तो पाहिला की लक्षात येतं की हा व्हीडिओ त्यांचं भाषण सुरु व्हायच्या आधीचा आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)