भाजपचे राजेंद्र गावित शिवसेनेत : पालघरमध्ये शिवसेनेची उमेदवारी

राजेंद्र गावित

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राजेंद्र गावित यांनी 2018मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

भारतीय जनता पक्षाचे पालघरमधील खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेनत प्रवेश केला आहे. ते पालघरमधून शिवेसनेच्या तिकिटावर खासदारकी निवडणूक लढवणार आहेत. पालघरमधील शिवसेनेचे नेते श्रीनिवास वनगा यांना विधिमंडळावर पाठवले जाईल, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

भाजप-शिवसेना युतीमधील जागा वाटपात पालघरची जागा शिवसेनेला गेली आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांची गोची झाली होती. पण आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत या जागेचा गुंता सोडवला.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. गावित म्हणाले, "गेली 7 महिने खासदार म्हणून काम करताना मी बरीच कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्याकडे कामाचा चांगला अनुभव आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघरमधून दिलेल्या संधीबद्दल मी त्यांचा आभारी आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत, ही जनतेची इच्छा आहे, त्यामुळे प्रत्येक खासदार महत्त्वाचा आहे. पालघरमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेत ही निवडणूक लढवणार आहे."

पालघरचे भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांचं जानेवारी 2018ला निधन झालं. त्यानंतर मे 2018मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत शिवसेनेचे श्रीनिवास वगना यांचा पराभव केला होता. श्रीनिवास वनगा हे चिंतामण वनगा यांचे पुत्र आहेत. ही जागा भाजप विरुद्ध शिवसेना अशी थेट झाली होती, त्यात दोन्ही पक्षांत टोकाचे आरोपप्रत्यारोप झाले होते.

राजेंद्र गावित मुळचे काँग्रेसचे आहेत. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी आदिवासी विकास राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)