मोदींचं 'पुलवामा'वर इमोशनल ब्लॅकमेलिंग - पृथ्वीराज चव्हाणांची टीका
- Author, किंजल पंड्या वाघ
- Role, बीबीसी प्रतिनिधी, लंडन
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी त्यांची जगात ओळख आहे, त्यांनी ट्विटरवर स्वतःला चौकीदार म्हणवून घेत असले तरी त्यांना रफालवर उत्तरं द्यावी लागतील," अशी टीका महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी लंडनमध्ये बीबीसीला विशेष मुलाखत दिली. त्यात त्यांनी 'चौकीदार' हा प्रचाराचा मुद्दा काँग्रेसवर उलटला नसल्याचं स्पष्ट शब्दांत सांगितलं.
ते म्हणाले, "रफालचे कंत्राट अनिल अंबानींना का मिळालं, विमानांची संख्या कमी का झाली अशा अनेक प्रश्नाची उत्तर मोदींना द्यावी लागतील," असं ते म्हणाले.
लोक मोदींमध्ये आपला नेता पाहतात या म्हणल्याला अर्थ नाही, असंही ते म्हणाले. "निवडणुकीचं निकाल ही एक चाचणी असू शकते. लोक मोदींच्या मागे आहेत, हे मतदानातून दिसत नाही. 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मोदींचा धुव्वा उडाला होता," ते म्हणाले.
पुलवामा हल्ला आणि त्यानंतर बालाकोट इथल्या हवाईहल्ला यासंदर्भात इमोशनल ब्लॅकमेल करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. विरोधी पक्षांचं कर्तव्य प्रश्न विचारणं हे आहे आणि आम्ही ते विचारणारच, असंही ते म्हणाले.
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)