आकाश मुकेश अंबानी-श्लोका रसल मेहता यांच्या लग्नाला कोण कोण आलं होतं - पाहा पूर्ण अल्बम

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता

फोटो स्रोत, Reliance PR

फोटो कॅप्शन, आकाश अंबानी आणि श्लोका मेहता

देशातल्या सर्वांत मोठ्या उद्योगपतीकडचं लग्न म्हटलं की सिनेमा, उद्योग तसंच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणातले मोठे चेहरे हजेरी लावणारच.

शनिवारी रात्री मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीचं लग्न श्लोका मेहता हिच्याशी पार पडलं. आकाश अंबानीच्या लग्नात सहभागी झालेल्या प्रभूतींवर एक नजर टाकूया.

वरमाय नीता अंबानी

फोटो स्रोत, Reliance PR

फोटो कॅप्शन, वरमाय नीता अंबानी
मुकेश आणि नीता अंबानी

फोटो स्रोत, Reliance PR

फोटो कॅप्शन, मुकेश आणि नीता अंबानी

मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा शाही लग्नसोहळा पार पडला. त्याची तयारी बरेच दिवसांपासून सुरू होती.

हिरे व्यापारी रसेल मेहता यांची सगळ्यांत लहान कन्या श्लोका मेहता ही आता अंबानींची सून झाली आहे.

इशा अंबानी

फोटो स्रोत, Reliance PR

फोटो कॅप्शन, इशा अंबानी (मध्ये)

मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांची मुलगी इशा विवाहबद्ध झाली. तिच्या लग्नालाही काही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सिनेमा, क्रीडा, राजकीय क्षेत्रातल्या दिग्गजांनी हजेरी लावली होती.

वरात

फोटो स्रोत, Reliance PR

आकाशने 2009 मध्ये धीरूभाई इंटरनॅशनल स्कूलमधून International Baccalaureate हा आंतरराष्ट्रीय शालेय अभ्यासक्रमाचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. याच धीरूभाई इंटरनॅशनल शाळेत आकाश आणि श्लोका शिकायला एकत्रच होते.

2013 मध्ये त्याने अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातून बिझनेस कॉमर्सची पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण झाल्यावर आकाश सध्या रिलायन्स इन्फोकॉम लिमिटेड या कंपनीचं काम पाहतो. रिलायन्सने सध्या 4G आणि इतर टेलेकॉम सेवांवर लक्ष केंद्रित केलं आहे.

अंबानी आणि मेहता कुटुंबांचे आधीपासूनच चांगले संबंध आहेत. आकाश आणि श्लोका यांचा गेल्या वर्षी गोव्यात साखरपुडा झाला होता. या समारंभात फक्त कुटुंबातील जवळचे सदस्यच उपस्थित होते.

श्लोका ही रसेल मेहता आणि मोना मेहता यांचं तिसरं अपत्य आहे. रसेल मेहता रोझी ब्लू डायमंड्सचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांची गणना जगातील मोठ्या हिरे व्यापाऱ्यांमध्ये होते.

अंबानी

फोटो स्रोत, Reliance PR

2009 मध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर श्लोकाने अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठातून अॅन्थ्रोपोलॉजीचं शिक्षण पूर्ण केलं.

अंबानी

फोटो स्रोत, Reliance PR

नंतर तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून कायद्याचं पद्वयुत्तर शिक्षण घेतलं. 2014 पासून रोझी डायमंड्सची ती संचालिका आहे.

श्लोकाला वाचनाची आणि समाजसेवेची आवड आहे. 2015 मध्ये स्थापन झालेल्या 'कनेक्ट फॉर की'ची सह-संस्थापक आहे. ही संस्था NGO साठी स्वयंसेवक शोधण्याचं काम करते.

अंबानी

फोटो स्रोत, Reliance PR

इशा अंबानीचं लग्न ज्या भव्य दिव्य पद्धतीने झालं, तो साऱ्या जगभरात चर्चेचा विषय ठरला होता. मात्र या छायाचित्रांमधून आकाश अंबानीच्या लग्नाचा थाटही काही कमी नाही, असं कळतंय.

अंबानी

फोटो स्रोत, Reliance PR

अंबानी

फोटो स्रोत, Reliance PR

अंबानी

फोटो स्रोत, Reliance PR

देवेगौडा

फोटो स्रोत, Reliance PR

आकाश अंबानीच्या लग्नात माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडांनी हजेरी लावली.

रजनीकांत

फोटो स्रोत, Reliance PR

फोटो कॅप्शन, सुपरस्टार रजनीकांत ही लग्नाला आले होते.
वरातीत नाचताना करण जोहर, शाहरुख खान, गाताना मिका सिंग

फोटो स्रोत, Reliance PR

फोटो कॅप्शन, वरातीत नाचताना करण जोहर, शाहरुख खान, गाताना मिका सिंग

रणवीर कपूर, शाहरुख खान आणि करण जोहर देखील या सोहळ्याला उपस्थित होते. करण जोहर यांनी कलंक या त्यांच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. तर रणबीर कपूरचा ब्रह्मास्त्रही लवकरच येणार आहे.

जुही चावला

फोटो स्रोत, Reliance PR

फोटो कॅप्शन, जूही चावला पती जय मेहता यांच्यासह
फराह खान

फोटो स्रोत, Reliance PR

बॉलिवुडमधील नृत्य दिग्दर्शिका आणि दिग्दर्शक फराह खान देखील लग्नाला आल्या होत्या.

रतन टाटा

फोटो स्रोत, Reliance PR

फोटो कॅप्शन, उद्योगपती रतन टाटा

उद्योगपती रतन टाटा यांनीही समारंभात सहभागी झाले.

आनंद महिंद्रा

फोटो स्रोत, Reliance PR

आनंद महिंद्रा यांचा अनोखा अंदाज.

सुंदर पिचाई

फोटो स्रोत, Reliance PR

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची अशा प्रकारची उपस्थिती अगदीच दुर्मिळ आहे.

टाटा उद्योग समूहाचे चेअरमन एन. चंद्रशेखर

फोटो स्रोत, Reliance PR

फोटो कॅप्शन, टाटा उद्योग समूहाचे चेअरमन एन. चंद्रशेखर
आमीर खान

फोटो स्रोत, Reliance PR

आमीर खान आणि पत्नी किरण राव.

जॅकी श्रॉफ

फोटो स्रोत, Reliance PR

बॉलिवुड अभिनेते जॅकी श्रॉफ या आकाश अंबानीच्या लग्नात उपस्थित होते.

अंबानी

फोटो स्रोत, Reliance PR

अंबानी

फोटो स्रोत, Reliance PR

फोटो कॅप्शन, अंबानी कुटुंबीयांबरोबर भारतातील जर्मनीतील रादजूत मायकेल स्टीनीयर
आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या लग्नातील एक क्षण

फोटो स्रोत, Reliance PR

फोटो कॅप्शन, आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या लग्नातील एक क्षण

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)