पुलवामा : अक्षय कुमारने पाकिस्तानचं समर्थन केल्याच्या व्हीडिओचं सत्य काय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, फॅक्ट चेक टीम
- Role, बीबीसी न्यूज
कट्टरवाद हा पाकिस्तानात नाही तर भारतात आहे असं सांगणारा अक्षय कुमार यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर #BoycottAkshayKumar हॅशटॅग ट्रेंड केला जातोय.
ट्वीटरवर अनेक लोक हा व्हीडिओ शेअर करत आहेत आणि अक्षयकुमार देशद्रोही असल्याची टीकाही होत आहे. इतकंच नाही तर अक्षय कुमार यांच्यावर बहिष्कार घालण्याचं आवाहनही सोशल मीडियावर केलं जातंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
या ट्वीटमध्ये असा दावा करण्यात येतोय की, "पाकिस्तान हा कट्टरवादी देश नाहीए तर भारतातच कट्टरवादी लोक आहेत"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या "दुनिया न्यूज" नावाच्या चॅनलं अशीच एक बातमी केली होती. ज्यात दावा करण्यात आला होता की कट्टरवादी देशांमध्ये पाकिस्तानचं नाव येत नाही असं विधान अक्षय कुमार यांनी केलंय. इतकंच नाही तर कट्टरवाद जगभर पसरत असल्याचंही बातमीत म्हटलं होतं."

फोटो स्रोत, DUNYANEWS.TV
मात्र बीबीसीनं केलेल्या पडताळणीत असं समोर आलंय की अक्षय कुमार यांच्या व्हीडिओचा आणि पुलवामा हल्ल्याचा काहीही संबंध नाहीए.
व्हीडिओची सत्यता
खरंतर हा व्हीडिओ 2015चा आहे. त्यावेळी अक्षय कुमार आपल्या 'बेबी' नावाच्या फिल्मचं प्रमोशन करत होते. यादरम्यान त्यांनी कट्टरवादावर एक विधान केलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
खऱ्याखुऱ्या व्हीडिओत अक्षय कुमार यांनी म्हटलंय की, "कट्टरवाद कुठला एक देश कट्टरवादी नसतो. तर कट्टरवादाचे काही एलिमेंट तिथं काम करत असतात. कट्टरवाद भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पॅरीस आणि पेशावरमध्येही आहे. काही लोक कट्टरवाद पसरवण्याचं काम करतात. मात्र कुठलाही देश त्याचं समर्थन करत नाही."
दरम्यान अक्षय कुमार यांनी आवाहन केलंय की पुलवामा हल्ल्यात मारल्या गेलेल्या सैनिकांसाठी भारतीयांनी मदतनिधी द्यावा आणि ही रक्कम "भारत के वीर" फंडात जमा करावी.
मात्र या खोट्या आणि कथित व्हीडिओवर अक्षय कुमार यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)