पुलवामा CRPF हल्ला : ओमर अब्दुल्ला जितेंद्र सिंहांवर भडकले

फोटो स्रोत, Getty Images
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील लेथपोराजवळ श्रीनगर-जम्मू महामार्गावर जहालवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांच्या बसला लक्ष्य केलं. त्यात 34 जण ठार झाले.
हा हल्ला झाल्यानंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले, नैराश्यातून हा हल्ला करण्यात आला आहे. मला अशा लोकांना प्रश्न विचारावा वाटतो की जे भारतात राहतात आणि स्वतःला काश्मीरच्या मुख्य प्रवाहातला नेता मानतात आणि जर असा जहालवाद्यांचा हल्ला झाला तर समोर येण्याचं टाळतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
त्यांच्या या ट्वीटला जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांनी हरकत घेतली आणि उत्तर दिलं की अशा वक्तव्याची मंत्र्यांना लाज वाटायला हवी.
काश्मीरच्या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींच्या आधीच निषेध केला आहे. जितेंद्र सिंह हे सैनिकांवरून राजकारण खेळण्याचा प्रयत्न करत आहेत, असं अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, @DRJitendrasingh
नेमकं काय झालं?
"जवानांच्या ताफ्यात एकूण 70 गाड्या होत्या. यातल्या एका बसवर हल्ला झाला. जवानांचा ताफा जम्मूहून श्रीनगरला चालला होता."
हा मोठा ताफा होता. वेगवेगळ्या वाहनांमधून अडीच हजार जवान प्रवास करत होते. जवानांच्या गाड्यांवर गोळीबारही करण्यात आला, अशी माहिती CRPF चे महासंचालक आर. आर. भटनागर यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
जवानांचा ताफा पहाटे साडेतीन वाजता जम्मूहून निघाला होता. संध्याकाळपूर्वी हे जवान श्रीनगरला पोहोचणं अपेक्षित होतं, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
खराब हवामानामुळे गेल्या दोन-तीन दिवसांत या महामार्गावर फारशी वाहतूक नसल्यानं तसंच इतरही काही प्रशासकीय कारणांमुळे जवान मोठ्या संख्येने श्रीनगरकडे जात होते, असं लष्करातील अधिकाऱ्यांनी सांगितलं.
एरवी कोणत्याही ताफ्यात 1 हजार जवान असतात. मात्र यावेळी एकूण 2547 जवान प्रवास करत होते. या ताफ्यात रस्ते मोकळे करणारं पथक होतं. तसंच बुलेट-प्रूफ वाहनंही होती.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








