नरेंद्र मोदींविरोधात असलेल्या प्रकाश राज यांनी धर्म बदलला?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, फॅक्ट चेक टीम
- Role, बीबीसी न्यूज
दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेते आणि आता राजकीय आखाड्यात उतरलेले प्रकाश राज यांनी ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्याच्या अफवा सध्या पसरवल्या जात आहेत. बंगळुरूमधील बेथल AG चर्चला त्यांनी रविवारी भेट दिल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
We Support Ajit Doval या फेसबुक ग्रुपने प्रकाश राज यांचा एक फोटो चर्चच्या धर्मगुरूंबरोबर टाकला आहे. अभिनेते प्रकाश राज हे दुटप्पी असून त्यांचा अयप्पांवर विश्वास नाही असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.
प्रकाश राज लॉर्ड अयप्पा विरुद्ध ख्रिश्चन हा वाद उकरून काढत आहे असा आरोप ट्विटरवरून करण्यात आला आहे.
अनेक हिंदुत्ववाद्यांनी प्रकाश राज यांच्यावर हिंदूंचा द्वेष करण्याचा आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्याचा आरोप केला आहे.
रमेश रामचंद्रन यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आलंय की प्रकाश राज एका ढोंगी धर्मगुरूबरोबर प्रार्थना करत आहेत. या धर्मगुरूंनी कर्नाटकात हजारो हिंदूंचं ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
अनेक ट्विटर अकाऊंटवर त्यांना ख्रिश्चन नास्तिक म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
आमच्या पडताळणीत असं लक्षात आलं आहे की हा दावा खोटा आहे.
आम्हाला असं लक्षात आलं की ते फोटो खरे होते मात्र सोशल मीडियावर जो दावा केला आहे तो खरा नाही.
वर उल्लेख केलेल्या फेसबुक ग्रुप्सवर आणि ट्विटर हँडलवर प्रकाश राज यांचे मशीद, गुरुद्वारा आणि मंदिरात जाणारे फोटो शेअर केलेले नाहीत.
धार्मिक स्थळांना भेटी
प्रकाश राज यांनी फक्त चर्चला भेट दिलेली नाही. तर त्यांनी मंदिर, मशीद, गुरुद्वारा आणि चर्चलाही भेटी दिल्यात. त्याचे फोटो स्वत: प्रकाश राज यांच्या फेसबुक आणि ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आले आहेत.
त्यांनी ट्विटही केलं. ते म्हणतात, "मी सगळ्या धर्माच्या लोकांना भेटायला जातो. सगळ्या धर्मांचा आदर करतो. देश या एकाच धर्माचा सगळ्यांनी आदर करावा. चला एकसंध भारताची निर्मिती करूया."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
प्रकाश राज यांनी बीबीसीला सांगितलं की आगामी निवडणुकांना धार्मिक रंग दिला जात आहे.
"मी चर्चला जातो, मशिदीत जातो, गुरुद्वारा आणि मंदिरातही जाईन. त्यांना धर्मनिरपेक्षतची व्याख्या आपल्या पद्धतीने करायची आहे आणि मी त्याचा आदर करतो. देशात दुही माजवण्याचा हा भक्तांचा डाव आहे." असं ते पुढे म्हणतात.
अयप्पांवर विश्वासाचं काय?
सोशल मीडियावर असाही आरोप करण्यात आला की प्रकाश राज स्वत:ला नास्तिक म्हणवतात. अयप्पांवर विश्वास ठेवत नाहीत, मात्र ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवतात.
हा दावा सोशल मीडियावरच्या त्यांच्याच एका व्हीडिओवरून करण्यात आला होता. त्यात त्यांनी शबरीमला मंदिरात प्रवेश बंदीच्या मुद्द्यावर वक्तव्य केलं होतं.
त्या व्हीडिओत ते म्हणतात, "ज्या धर्मात एखाद्या बाईला पूजा करण्यापासून रोखतात तो माझ्यासाठी धर्म नाही. जो भक्त माझ्या आईला भक्ती करण्यापासून रोखतो तो माझ्यासाठी भक्त नाही."
हे वक्तव्य स्त्रियांच्या समर्थनार्थ जारी करण्यात आलं होतं.
त्यांनी ट्विटर हँडलवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. त्यांच्या धर्माबद्दल पसरलेल्या अफवांबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणतात, "मी देवावर विश्वास ठेवतो की नाही हा प्रश्न नाही. मात्र लोकांचा ज्यावर
विश्वास आहे त्यावर आपण विश्वास ठेवतो का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. धर्मात राजकारण आणायला नको."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
भारतात फेक न्यूजचं प्रमाण वाढतं आहे त्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले "जेव्हा एखादा गट अँटीनॅशनल, अर्बन नक्षल, तुकडे तुकडे गँगचे सदस्य, अँटी हिंदू असे लेबल लावले की या गोष्टी जास्त व्हायरल होतात."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)