प्रियंका आणि राहुल गांधी यांनी खोटं वय सांगितलं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, फॅक्ट चेक टीम
- Role, बीबीसी न्यूज
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या उत्तर प्रदेशातील महासचिव प्रियंका गांधी यांनी जन्मतारखेबाबत खोटी माहिती दिल्याची अफवा सोशल मीडियावर काही लोकांनी पसरवली आहे. या दोघांपैकी एकाने आपली खरी जन्मतारीख सांगितली नसल्याचे अशी अफवा पसरवण्यात आली आहे.
राहुल गांधी आणि प्रियंका यांच्या वयात फक्त 6 महिन्यांचं अंतर कसं असू शकेल, असा प्रश्न विचारून गांधी परिवाराने काहीतरी गोंधळ घातला आहे का अशी शंका उपस्थित केली जात आहे.
काही फेसबुक ग्रुपवर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या विकिपीडियाच्या पेजचे एडीट करून स्क्रीनशॉटस शेअर केले आहेत.

फोटो स्रोत, FACEBOOK
'जन्मतारखेतही काँग्रेसचा महाघोटाळा. राहुलच्या जन्मानंतर 6 महिन्यात प्रियंकाचा जन्म,' असं शेअर करणाऱ्यांनी लिहिलं आहे.
ट्वीटर आणि व्हॉटसअपवरही अशाच प्रकारचे स्क्रीनशॉटस शेअर केले आहेत. काही लोकांनी इंडिया टुडे समुहाच्या आज तक न्यूज चॅनलचाही एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK
मात्र हे सर्व दावे आणि प्रश्न खोटे आहेत. राहुल आणि प्रियंका गांधी यांच्या जन्मामध्ये 18 महिने 24 दिवसांचे अंतर आहे. राहुल गांधी यांचा जन्म 19 जून 1970 रोजी दिल्लीमध्ये झाला. तर प्रियंका गांधी यांचा जन्म दिल्लीमध्ये 12 जानेवारी 1972 रोजी झाला. काँग्रेस पार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर दोघांच्याही जन्मतारखा देण्यात आल्या आहेत.
विकीपीडियावरसुद्धा या दोन्ही नेत्यांच्या जन्मतारखा देण्यात आल्या आहेत. मात्र विकीपीडियाच्या पेजचे हे स्क्रीनशॉट शेअर करणाऱ्यांनी ते एडिट करून राहुल गांधी यांची जन्मतारीख 19 जून 1971 केली आहे.
हे एडिट केलेले फोटो सोशल मीडिया आणि व्हॉटसअपवर शेअर केल्यामुळे नुकत्याच राजकारणात आलेल्या प्रियंका गांधी यांच्याबद्दल जाणूनबुजून चुकीची माहिती पसरवल्याचा प्रयत्न असल्याचे दिसते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








