कुंभमेळ्यात नरेंद्र मोदींनी खरंच गंगेत स्नान केलं का?

मोदी

फोटो स्रोत, Sm viral image grab

    • Author, फॅक्ट चेक टीम
    • Role, बीबीसी न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत, ज्यामध्ये त्यांनी कुंभमेळ्यात स्नान केलं आहे, असा दावा काही जण करत आहेत. पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलहून ही माहिती दिली नाही पण काही जण असा दावा करत आहेत की पंतप्रधान मोदी यांनी गंगेमध्ये स्नान केलं.

काही हिंदुत्ववादी ग्रुप हे फोटो शेअर करत आहेत. पंतप्रधान मोदींना 'हिंदू सिंह' संबोधणाऱ्या काही जणांनी राहुल गांधी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. स्वतःला जानवंधारी हिंदू म्हणवणारे राहुल गांधी गंगेमध्ये डुबकी घेणार आहेत का, असा सवाल ट्विटरवर विचारला जात आहे.

उत्तर प्रदेशच्या प्रयागराज (अलाहाबाद) कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. या मेळाव्याला हिंदूंचं सर्वांत मोठे धार्मिक संमेलन म्हटलं जात.

49 दिवस चालणाऱ्या कुंभ मेळ्याचं पहिलं शाही स्नान हे मकर संक्रातीच्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीला झालं. त्यानंतर सहा मुहूर्तांवर शाही स्नान होणार आहे.

मोदी

फोटो स्रोत, Sm viral image grab

कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी नरेंद्र मोदी प्रयागराजला गेले होते आणि त्याठिकाणी तयारी कशी सुरू आहे याची पाहणी त्यांनी केली. पण मोदींनी या कुंभमेळ्यात स्नान केलं का याची अधिकृत माहिती मिळत नाही.

2016चे फोटो

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

रिव्हर्स इमेजचा वापर करून हे समजलं आहे की सध्या सोशल मीडियावर जे फोटो फिरत आहेत ते 2016चे आहेत. 2016मध्ये उज्जैनमध्ये जो कुंभमेळा झाला होता त्यावेळी हे फोटो 'शेअर' करण्यात आले होते. पण हे फोटो त्यावेळी देखील घेतले गेलेले नाहीत.

2016मध्ये 22 एप्रिल ते 21 मे मध्ये सिंहस्थ कुंभाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि अंतिम शाही स्नानाच्या मुहूर्तावर ते या उज्जैनला गेले होते. जुन्या रिपोर्टनुसार भाजपचे दिवंगत खासदार अनिल माधव दवे यांच्याकडे या आयोजन समितीची सूत्रं होती. त्यांनी म्हटलं होतं की पंतप्रधान मोदी कुंभमेळ्यात येतील पण ते क्षिप्रा नदीमध्ये स्नान करणार नाहीत. म्हणजेच हे फोटो 2016चे देखील नाहीत. तर प्रश्न हा येतो की हे फोटो कधी घेण्यात आले आहेत.

मोदी

फोटो स्रोत, Sm viral image grab

तर त्याचं उत्तर असं आहे की हे फोटो 2004 सालचे आहेत.

बीबीसीच्या फॅक्ट चेक टीमनं केलेल्या अभ्यासात त्यांना हे आढळलं आहे की हे फोटो 2004चे आहेत. काही रिपोर्टनुसार 2004मध्ये सिंहस्थ कुंभावेळी मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वैचारिक महाकुंभामध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी क्षिप्रा नदीत स्नान केलं होतं.

2004 साली लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर मोदींनी उज्जैन दौरा केला होता असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)