रॉबर्ट वाड्रा : प्रियंका गांधींचे नेहमी वादात असलेले पती

फोटो स्रोत, Getty Images
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची कन्या प्रियंका गांधी यांच्याशी लग्न झाल्यानंतर रॉबर्ट वाड्रा चर्चेत आले होते.
कोण आहेत रॉबर्ट वाड्रा?
वाड्रा यांचा जन्म 18 एप्रिल 1969ला उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादमध्ये झाला. त्यांचे वडील राजेंद्र वाड्रा पितळाचा व्यवसाय करायचे. तर आई मूळची स्कॉटलंडची आहे.
वाड्रा कुटुंबीय मूळत: पाकिस्तानातल्या सियालकोटमधलं आहे. फाळणीनंतर त्यांचं कुटुंब भारतात आलं.
रॉबर्ट वाड्रा यांचा हस्तकला आणि सौंदर्य प्रसाधनांचा व्यवसाय आहे. आर्टेक्स एक्सपोर्ट्स हे त्यांच्या कंपनीचं नाव आहे. याशिवाय अनेक कंपन्यांमध्ये त्यांची भागीदारी आहे.
रॉबर्ट यांना एक भाऊ आणि एक बहीण होती. 2001मध्ये त्यांच्या बहिणीचा कार अपघातात मृत्यू झाला होता. तर 2003मध्ये त्यांच्या भावानं आत्महत्या केली होती. 2009 मध्ये त्यांच्या वडिलांचंही निधन झालं होतं. आता ते त्यांच्या आईसोबत राहतात.
रॉबर्ट आणि प्रियंका यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

फोटो स्रोत, Getty Images
1991मध्ये दिल्लीतल्या एका मित्राच्या घरी रॉबर्ट आणि प्रियंका यांची भेट झाली होती. त्यानंतर 18 फेब्रुवारी 1997ला दोघांनी लग्न केलं.
रॉबर्ट यांना मोटारसायकल आणि कार यांचीही आवड आहे. त्यांच्याकडे काही विदेशी कार आहेत, असं म्हटलं जातं. व्यापाराशिवाय फिटनेस आणि फॅशनमध्येही त्यांना रुची आहे.
डिसेंबर 2011मध्ये एका इंग्रजी वर्तमानपत्रानं रॉबर्ट यांना बेस्ट ड्रेस्ड मॅन हा पुरस्कार दिला होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
काहीवेळेस बनाना रिपब्लिकसारख्या वादग्रस्त उपमा किंवा ट्वीटरवरील कमेंटसमुळेसुद्धा रॉबर्ट वाड्रा यांनी वाद ओढवून घेतले आहेत.
रॉबर्ट वाड्रांचा वडिलांशी वाद
प्रियंकांशी लग्न करायचा रॉबर्ट यांचा निर्णय त्यांच्या घरच्यांना पसंत नव्हता आणि यामुळे रॉबर्ट आणि त्यांच्या वडिलांमध्ये वितुष्ट निर्माण झालं, असं म्हटलं जातं.
2001 मध्ये एक सार्वजनिक वक्तव्य करत स्वत:ला वडिलांपासून वेगळं केलं होतं.
रॉबर्ट वाड्रा यांचे वडील राजेंद्र वाड्रा यांच्यावर आरोप होता की, उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ऑफिसमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या आमिषानं त्यांनी लोकांना फसवलं आहे.
रॉबर्ट वाड्रा काँग्रेससाठी ओझं?
2001मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान रॉबर्ट यांच्या बाईक रॅलीला एक आयएएस अधिकाऱ्यानं अडवलं होतं. यानंतर त्या आयएएस अधिकाऱ्याची बदली झाली आणि ते पुन्हा चर्चेत आले होते.

फोटो स्रोत, Getty Images
रॉबर्ट वाड्रा यांनी उत्तर प्रदेश निवडणुकांत पत्नी प्रियंका गांधी यांच्यासमवेत अमेठी आणि रायबरेली मतदारसंघात प्रचार केला होता.
2014च्या निवडणुकांत वाड्रा यांचं नाव आल्यामुळे प्रियंका गांधी यांना पुढे येऊन बोलावं लागलं होतं.
नरेंद्र मोदी यांनी रॉबर्ट वाड्रा यांच्याविषयीच्या कथित आरोपांबद्दल बोलताना त्यांना 'जावई' (दामादजी) असं संबोधलं होतं.
यूपीए आघाडीच्या 10 वर्षांच्या कालावधीचा सर्वाधिक फायदा आरएसवीपी (राहुल, सोनिया, वाड्रा आणि प्रियंका) यांना झाला, असं मोदी म्हणाले होते.
यानंतर काँग्रेस पक्षातर्फे अनेक केंद्रीय मंत्री रॉबर्ट यांचा बचाव करण्यासाठी पुढे आले होते. पण अवघ्या 10 दिवसांनंतर या मंत्र्यांनी मागे हटणं पसंत केलं.
तेव्हा अशी चर्चा होती की, सरकार आणि काँग्रेस पक्षाला रॉबर्ट वाड्रा यांचा बचाव करण्याची काही गरज नाही, असं सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाहून सांगण्यात आलं होतं.
रॉबर्ट वाड्रांवरील आरोप
रॉबर्ट वाड्रा यांच्यावर जमीनव्यवहारात कथित घोटाळे केल्याचे आरोप आहेत. विविध तपास यंत्रणाद्वारे वारंवार तपास आणि न्यायालयीन प्रक्रीयेमुळेही त्यांचं नाव माध्यमांमध्ये येत असतं.
नुकतंच जोधपूर उच्च न्ययालयानं राजस्थानमधील एका प्रकरणी रॉबर्ट आणि त्यांच्या आईंना 12 फेब्रुवारी रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
तसंच त्यांच्या अटकेला स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिला आहे. त्यासाठी सरकारनं वेगळी याचिका दाखल करावी असं कोर्टानं सुचवलं आहे. असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.
रॉबर्ट वाड्रांवरील इतर आरोप
टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, सप्टेंबर महिन्यात हरियाणातल्या गुडगावमधील जमीन घोटाळाप्रकरणी रॉबर्ट वाड्रा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे.
FIR मध्ये DLF ही कंपनी आणि ओंकारेश्वर प्रॉपर्टीज यांचं नाव सामील आहे.
निवडणुका जवळ आल्या आहेत आणि त्यामुळे जुन्या प्रकरणांना समोर आणलं जात आहे, असं रॉबर्ट यांनी याप्रकरणी म्हटलं होतं.
सुरेंद्र शर्मा नावाच्या व्यक्तीनं याप्रकरणी एक FIR दाखल केली होती. शर्मा यांनी सांगितलं की, 2007मध्ये स्काईलाईट हॉस्पिटॅलिटी कंपनीनं शिकोहपूर गावात ओंकारेश्वर प्रॉपर्टीजच्या माध्यमातून 3 एकर जमीन कवडीमोल दरानं विकत घेतली होती.
रॉबर्ट वाड्रा या कंपनीचे संचालक आहेत. हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी नियम धाब्यावर बसवत या जमिनीचा व्यापार केला होता, असा आरोप आहे.
यावर बोलताना वाड्रा यांनी म्हटलं होतं, 'निवडणुकीचा काळ आहे. इंधनाच्या किंमत वाढल्या आहेत...यामुळे लोकांचं मुख्य प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी माझ्या एका दशकाहून जुन्या प्रकरणाला समोर आणलं जात आहे. यात नवीन काय आहे?'
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








