नक्षलवाद्यांनी केली आमदाराची गोळ्या घालून हत्या

(डावीकडून) किडारी सर्वेस्वररा राव आणि सेवेरा सोमा

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, (डावीकडून) किडारी सर्वेस्वररा राव आणि सेवेरा सोमा

आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम पार्टीचे आमदार किडारी सर्वेश्वरा राव आणि माजी आमदार सिवेरा सोमू यांची नक्षलवाद्यांनी रविवारी दुपारी 12 वाजता गोळ्या घालून हत्या केली आहे.

विशाखापट्टणम जवळच्या आदिवासी भागात हा हल्ला झाला आहे. गोळी लागल्याने किडारी आणि सिवेरू हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.

"नक्षलवाद्यांनी या दोघांची गोळ्या घालून हत्या केल्याचं, पडेरुचे (विशाखापट्टणम) पोलिस उप-अधीक्षक महेंद्र मत्थे यांनी बीबीसीला सांगितलं.

20 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. सुरक्षेला असलेल्या जवानांची शस्त्रे घेऊन त्यांनीच या दोघांवर गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती विशाखापट्टणम पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत यांनी दिली.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

किडारी यांचा जागीच मृत्यू झाला तर सिनेरा यांनी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आमदार किडारी

किडारी हे आदिवासी होते. ते 2014मध्ये YSR काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. पण नंतर त्यांनी TDPमध्ये प्रवेश केला.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेचा निषेध केला आहे. चंद्राबाबू नायडू सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)