UIDAI : गुगल म्हणतंय चुकीने सेव्ह झाला आधार नंबर, पण...

या स्क्रीनशॉटमध्ये अँड्रॉईड आणि अॅपलचे फोटोही आहेत.
फोटो कॅप्शन, या स्क्रीनशॉटमध्ये अँड्रॉईड आणि अॅपलचे फोटोही आहेत.
    • Author, कुलदीप मिश्र
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

तुमच्याही फोनमध्ये तो अनोळखी फोन नंबर स्वतःहून सेव्ह झाला आहे का? फोनबुकमध्ये जा आणि 1947 टाईप करा. 'UIDAI' असं आलं की समजा तुम्ही त्या लाखो मोबाईल युजर्सपैकी एक आहात जे सध्या एका 'अनोळखी' मोबाईल नंबरमुळे हैराण झाले आहेत.

या लोकांच्या फोनमध्ये UIDAI नावाचा एक नंबर सेव्ह झाला असून त्यात हा 1800-300-1947 नंबर असतो. वरवर पाहता हा हेल्पलाईन नंबर वाटतो. पण, हा नंबर डायल केला तर बेल वाजत नाही. उलट 'हा नंबर उपलब्ध नाही', असं सांगितलं जातं.

मग हा नंबर आला कुठून? तो लोकांच्या मोबाईलमध्ये कधीपासून आहे? ठामपणे कुणालाही हे सांगता येत नाही आहे.

शुक्रवारी हा मुद्दा एलियट अँडरसन ( @fs0c131y ) या ट्विटर हँडलने उचलला. या हँडलवरून UIDAI ला टॅग करून 'असं का होत आहे,' हे विचारण्यात आलं.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

हे ट्विटर हँडल आधीपासूनच आधारच्या गोपनीयतेवर प्रश्न उपस्थित करत आलं आहे.

अफवा, शंका आणि तथ्य

  • काही लोकांनी सांगितलं की, UIDAI चा हा कथित नंबर फक्त अँड्रॉईड फोनमध्ये सेव्ह होत आहे. पण आमच्या ऑफीसमधल्या अनेक आयफोन वापरकर्त्यांच्या मोबाईलमध्येही हा नंबर सेव्ह झालेला आहे.
  • काहींनी सांगितलं की, सॉफ्टवेअर अपडेट झाल्यामुळे हा नंबर सेव्ह झाला आहे. पण बीबीसीबरोबर बोलताना टेक्नॉलॉजी एक्सपर्ट रितेश भाटिया यांनी सांगितलं की, सॉफ्टवेअर अपडेटमुळे असं होण्याची शक्यता कमीच आहे.
  • काहींचं म्हणणं आहे की, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, त्यांच्याच मोबाईलमध्ये हा नंबर सेव्ह होत आहे. पण असंही नाहीये. कारण ज्यांच्याकडे आधार नाही, अशांकडेही हा नंबर सेव्ह होत आहे. काही जण असेही आहेत, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे पण हा नंबर त्यांच्याकडे सेव्ह नाही.
  • तर काहींचं म्हणणं आहे की, दोन वर्षांपूर्वीच्या फोनमध्ये असं होत नाही. पण हे सुद्धा खरं नसल्याचं आम्हाला आढळलं आहे. आमच्याकडील काही नवीन फोन्समध्ये हा नंबर होताच.

'आधार'चं स्पष्टीकरण - 'आम्ही केलं नाही'

सरकारच्या इशाऱ्यावरून टेलेकॉम सर्व्हिस पुरवठादार कंपन्या असं करत असल्याची शंका काहींनी व्यक्त केली आहे.

आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया करणारी व्यक्ती

फोटो स्रोत, NARINDER NANU/AFP/GETTY IMAGES

पण आधारची संस्था UIDAI ने स्पष्टीकरण देताना सांगितलं की, त्यांनी कोणत्याही टेलेकॉम कंपनीला असं करण्यास सांगितलेलं नाही.

आधारने आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांचं अधिकृत मत व्यक्त करताना सांगितलं की, "UIDAIच्या जुन्या आणि आता अस्तित्वात नसलेला टोल फ्री नंबर 1800-300-1947 आपोआप अँड्रोईड फोनमध्ये सेव्ह झाल्याचं आढळून आलं आहे. परंतु, UIDAI ने कोणत्याही मॅन्युफॅक्चरर आणि सर्व्हिस पुरवठादार कंपन्यांना अशी सुविधा देण्यास सांगितलेलं नाही."

"हा नंबर UIDAIचा अधिकृत नंबर नाही. परंतु, काही जण उगाचच याबद्दल गैरसमज निर्माण करत आहेत. आमचा अधिकृत टोल फ्री नंबर 1947 असून तो गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

UIDAIने आपलं अधिकृत निवदेन देताना केवळ अँड्रोईड फोनचा उल्लेख केला आहे. पण मग, अॅपल फोनमध्येही हा नंबर का आढळून येत आहे, हा प्रश्न राहतोच.

अनेक जण याला खासगी आयुष्यात ढवळाढवळ आणि हॅकिंगच्या रूपातून बघत आहेत.

वरिष्ठ पत्रकार प्रभू चावला यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, "जर ही गोष्ट खरी असेल तर याचा अर्थ असा आहे की, एजन्सी तुम्हाला न सांगता तुमच्या फोनमध्ये काहीही टाकू शकते आणि त्यातून कोणतीही माहिती मिळवू शकते."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

आतिश बोस नावाच्या एका ट्विटर युजरने व्होडाफोनला टॅग करत विचारलं आहे की, हा नंबर तुमच्या कॉन्टॅक लिस्टमध्ये कसा आला? यावर वोडाफोननेही उत्तर दिलं आहे, "आम्ही आमच्या ग्राहकांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. आम्ही सगळ्या नियमांचं पालन करतो. तुम्ही तुमची ही चिंता प्रायव्हसी ऑफीसर [email protected] वर व्यक्त करू शकता."

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

संभाव्य कारण

मुंबईत राहणारे टेक्नोलॉजी एक्स्पर्ट रितेश भाटिया सांगतात की, त्यांना अजून हा प्रश्न नीट समजलेलाच नाही. त्यांना याबद्दल एकच शंका वाटते - मोबाईल ऑपरेटर कंपन्यांनी हे केलं असेल.

ते सांगतात, "जेव्हा तुम्ही सिम कार्ड खरेदी करता, तेव्हा त्यात काही नंबर अधीपासूनच सेव्ह असतात, जसे की कस्टमर केअर, अँब्युलन्स, अग्निशमन, पोलीस कंट्रोल रूम, पिझ्झा ऑर्डर वगैरे."

कम्प्युटरची स्क्रीन

फोटो स्रोत, MANSI THAPLIYAL

रितेश सांगतात, "पहिले आम्हाला वाटलं की UIDAIचं कोणतं अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यानं असं होत आहे का? पण असंही नाहीये. ज्यांनी असं कुठलंही अॅप डाऊनलोड केलं नाही, त्यांच्याकडेही हा नंबर सेव्ह होता."

सॉफ्टवेअर अपडेटसह हा नंबर सेव्ह झाला असावा, अशी शंका रितेश यांनी व्यक्त केली आहे.

कंपन्यांचा नकार

बीबीसीने या प्रकरणी टेलिकॉम ऑपरेटर्ससोबतही चर्चा केली. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (COAI) यावर निवेदन प्रसिद्ध केलं आहे. यात ते सांगतात की, "फोनबुकमध्ये अनोळखी नंबर सेव्ह करण्याचं काम कोणत्याही टेलिकॉम सर्व्हिस पुरवठादार कंपनीकडून केलेलं नाही."

COAIचे प्रमुख राजन मॅथ्यूज यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "आम्हाला हे हँडसेटशी संबंधित प्रकरण वाटतं. टेलिकॉम ऑपरेटर्सना याबद्दल कोणतीही माहिती नाही आणि त्यांचा याच्यात हातही नाही. या सगळ्याचा शोध घेण्याची जबाबदारी UIDAIची आहे. टेलीकॉम ऑपरेटर्स काम न करणारा नंबर पुढे करणार नाहीत."

UIDAI चा नंबर मोबाईलमध्ये असा सेव्ह झालेला दिसतो.

फोटो स्रोत, TEJALI SHAHASANE/BBC

फोटो कॅप्शन, UIDAI चा नंबर मोबाईलमध्ये असा सेव्ह झालेला दिसतो.

एलियट अँडरसन ट्विटर हँडलने या प्रकरणाची बाजू पुढे आणली आहे. या ट्विटर हँडलच्या म्हणण्यानुसार, ही गोष्ट काही नवी नाही.

एलियट अँडरसनने अरविंद इनामदार नावाच्या एका व्यक्तीचं 2017मधलं एक ट्वीट रिट्वीट केलं आहे. ज्यात UIDAIचा नंबर आपोआप सेव्ह झाल्याबद्दल लिहिण्यात आलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

UIDAI आणि त्यानंतर टेलीकॉम असोसिएशनने दिलेल्या निवेदनानंतर या प्रकरणातील गूढ वाढलं. कारण या दोन्ही संस्थांनी हे त्यांच्याकडून न झाल्याचं स्पष्ट केलं आहे.

अखेर शनिवारी गुगलने एक निवेदन जारी करत आपल्याकडून ही चूक झाली असावी, असं सांगितलं.

X पोस्टवरून पुढे जा, 6
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 6

"आमच्या अंतर्गत चौकशीदरम्यान आढळलं की, 2014मध्ये अँड्रॉइडच्या सेटअप सॉफ्टवेअरचं कोडिंग करताना काहीतरी घोळ झाला आणि हे नंबर फोनमध्ये स्टोर झाले असावे. आम्ही हे अँड्रॉइडचं सेटअप सॉफ्टवेअर सगळ्या मोबाईल निर्मात्यांना पाठवतो जिथून ते तुमच्या फोनमध्ये येतं. आणि म्हणून हे तेव्हापासून तयार होणाऱ्या सर्व अँड्रॉइड फोन्समध्ये हा नंबर होताच."

अॅपल फोनमध्ये कुठून आला 1947?

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, अॅपल फोनमध्ये कुठून आला 1947?

"कुणालाही यामुळे झालेल्या त्रासाबद्दल आम्ही माफी मागतो. पण निश्चिंत राहा, हा कुठल्याही प्रकारे तुमच्या सुरक्षिततेवर घाला नाही. तुमचे अँड्राइड डिव्हाईस सुरक्षित आहेत. तुम्ही हा नंबर स्वतःहून डिलीट करू शकता."

यानंतर नव्याने येणाऱ्या सेटअप सॉफ्टवेअरमध्ये आम्ही हा मुद्दा मार्गी लावू, असंही गुगलने स्पष्ट केलं.

पण तरीही एक प्रश्न उरतोच - मग अॅपलच्या फोनमध्ये कुठून आला 1947 हा नंबर? यामागचं गूढ मात्र कायम आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)