भारतात लहान मुलांवरील अत्याचार प्रकरणांत वाढ होतेय?

बाललैंगिक अत्याचार

फोटो स्रोत, BBC Sport

    • Author, दिव्या आर्य
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

गेल्या काही आठवड्यांपासून बाललैंगिक अत्याचाराच्या बातम्या आणि लोकांचा रोष बघता भारतात बाललैंगिक अत्याचाराचं प्रमाण वाढतंय, असं चित्र समोर येतंय. ते किती खरं आहे?

जून महिन्यात मध्य प्रदेशात एका सात वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर जनक्षोभ उसळला होता. प्रश्न असा निर्माण होतो की 18 वर्षांखालील व्यक्तींवर किंवा बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होतेय का?

बाललैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांत वाढ होतेय की त्यांची नोंद भारतात प्रसारमाध्यमांचा वाढता प्रसार, मोबाईल फोन्सची व्यापकता हेही याचं मुख्य कारण असू शकतं.

बलात्काराच्या कायदेशीर व्याख्येतसुद्धा बदल झाला आहे आणि नवीन तरतुदीनुसार पोलिसांना लैंगिक हिंसाचाराची तक्रार नोंदवून घेणं अनिवार्य आहे.

काश्मीरमध्ये या वर्षाच्या सुरुवातीला एका आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्यानं या चर्चेला वाचा फुटली आणि या प्रकरणातील आरोपींवर एप्रिलमध्ये कारवाई सुरू करण्यात आली. बाललैंगिक अत्याचाराचा मुद्दा प्रकर्षाने उजेडात आला.

महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी म्हणतात की काश्मीरच्या आणि उजेडात येणाऱ्या बलात्काराच्या प्रकरणांनी त्या अतिशय दुखावल्या आहेत.

कायदेशीर व्याख्येत बदल

भारत सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2012 ते 2016 या काळात बाललैंगिक अत्याचाराचं प्रमाण दुप्पट झालंय.

2012च्या आधी बाललैंगिक अत्याचाराबाबत एकही कायदा अस्तित्वात नव्हता. (आणि बलात्काराची व्याख्या फक्त बळजबरीने केलेला संभोग इतकीच होती.)

बालकांवर अत्याचाराचे काही प्रकार जे सामान्यत: आढळतात. त्यांचा यात समावेश नव्हता. तसंच ही तक्रार नोंदवण्याची बंधनं होती.

बलात्कार
फोटो कॅप्शन, प्रसारमाध्यमांच्या विस्तारामुळे बलात्काराच्या घटना उजेडात आल्या आहे.

बाललैंगिक अत्याचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी Protection of Children from Sexual Offences Act 2012 हा सगळ्यात महत्त्वाचा कायदा आहे.

पुढच्याच वर्षी बालकांवर होणाऱ्या बलात्कारांच्या प्रमाणात 45 टक्क्यांनी वाढ झाली.

नवीन कायदा लिंगभेदरहित होता आणि त्यात विविध लैंगिक अत्याचाराच्या प्रकारांचा उल्लेख होता.

यामुळे बाललैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांची नोंद होत नव्हती आणि पर्यायाने शिक्षाही सुनावली जात नव्हती.

"आता डॉक्टर आणि पोलीस ही प्रकरणं घरगुती प्रकरणं या नावाखाली टाळू शकत नाही. असं केलं तर त्यांनाच तुरुंगवास होऊ शकतो." असं माजिस लीगल सेंटरचे ऑड्री डी मेलो यांनी सांगितलं. त्या लैंगिक अत्याचारातील पीडितांना आधार देण्याचा प्रयत्न करतात.

महिला अत्याचार

फोटो स्रोत, AP

फोटो कॅप्शन, नुकत्याच झालेल्या बलात्कारांच्या घटनांमुळे लोक रस्त्यावर उतरली आहेत.

त्यांच्या मते, विविध यंत्रणांनी या प्रकरणाची तक्रार नोंदवून घेतल्यामुळे या संख्येत जास्त वाढ झाली आहे.

2012 साली झालेल्या निर्भया प्रकरणानंतर भारतात होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना आणि पोलीस त्याची कशी चौकशी करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आकर्षित झालं.

त्यानंतर लगेच भारत सरकारने Criminal Law Amendment Ordinance 2013 हा कायदा आणून लैंगिक अत्याचाराची व्याख्या रुंदावली.

हिमनगाचं टोक

बाललैंगिक अत्याचाराचं प्रमाण दिसतं त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे असं अनेकांना वाटू शकतं.

2007 मध्ये महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे एक सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात 13 राज्यातील 17000 मुलांची व्यथा ऐकण्यात आली.

या सर्वेक्षणांसाठी विविध प्रकारच्या हिंसाचाराचा अभ्यास करण्यात आला. त्यात फक्त बलात्काराचा समावेश नव्हता.

बलात्कार

फोटो स्रोत, AFP

कुमार शैलभ हे हक् सेंटर ऑफ चाईल्ड राईट्स यांच्या मते, लैंगिक अत्याचाराची अतिशय कमी प्रकरणं उजेडात आली आहेत.

संमतीचं वयसुद्धा 2012 साली आलेल्या या कायद्यात 16 वरून 18 वर आणण्यात आलं त्यामुळे या वयातील लैंगिक संबंधांना गुन्हेगारीचं स्वरुप मिळालं.

विविध कायदेशीर प्रक्रिया

तक्रारीत वाढ झाली, कायदे झाले तरी शिक्षेचा दर 2012 पासून 28.2% इतकाच आहे, तो बदललेला नाही.

2012 च्या कायद्यानुसार बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याच्या प्रकरणाचा निकाल एका वर्षांच्या आत लागला पाहिजे. पण कायदेशीर प्रक्रियेची गती कमी असल्यामुळे क्वचितच ही प्रकरणं एका वर्षांच्या आत मार्गी लागतात.

बलात्कार

जेव्हा गुन्हेगार ओळखीचा किंवा कुटुंबातलाच सदस्य असतो तेव्हा तक्रार मागे घेण्याचं प्रमाण सगळ्यांत जास्त असतं.

कुटुंबाच्या सन्मानाचं कारण देत अनेक लोक त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध तक्रार नोंदवायला तयार नसतात.

डी मेलो म्हणतात, "तक्रारी जरी केल्या तरी गुन्हेगारांना शिक्षा होऊ नये म्हणून प्रयत्न होत असतात. त्यामुळे संपूर्ण व्यवस्था तक्रारदाराच्या विरोधात जाते आणि तिच्यावर चुकीची तक्रार नोंदवल्याचा आरोप होतो."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)