#BudgetWithBBC बजेटमध्ये महिलांसाठी काय आहे?

फोटो स्रोत, hadynyah/GETTY IMAGES
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2018-19 या आर्थिक वर्षासाठी बजेट सादर केलं. या बजेटमध्ये महिलांसाठी अनेक महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली.
महिलांसाठी कोणत्या घोषणा आहेत?
- उज्ज्वला योजनेअंतर्गत 3 कोटी नवीन मोफत गॅस कनेक्शन देण्याची घोषणा केली.
- स्वच्छ भारत योजनेअंतर्गत शौचालयं उभारण्याची घोषणा सहा कोटीवरून आठ कोटी शौचालयं बांधणार.
- गरीबांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 51 लाख नवीन घरं तयार करण्याची घोषणा.

फोटो स्रोत, LOK SABHA TV
- महिलांसाठी नोकरीच्या पहिल्या तीन वर्षांपर्यंत EPFचा फक्त 8 टक्के भाग जाणार. अगोदर ही रक्कम 12 टक्के होती. यामुळे हातात पडणारा पगार वाढणार आहे.
- आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करत 1.5 लाख वैद्यकीय केंद्र उभारण्याची घोषणा.
- सुकन्या समृद्धी योजनेचं यश बघता ती आणखी वाढवण्याचा निर्णय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)




