राजस्थान पोटनिवडणुकीत काँग्रेसची हॅट्ट्रिक, भाजप धोबीपछाड

वसुंधरा राजे आणि सचिन पायलट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वसुंधरा राजे आणि सचिन पायलट

भाजपची सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं बाजी मारली आहे.

भाजपच्या तीन खासदारांचं निधन झाल्यामुळे इथे पोटनिवडणुका घ्याव्या लागल्या होत्या.

राजस्थानमध्ये मांडलगढ मतदारसंघातून काँग्रेसचे विवेक धाकड विजयी ठरले आहेत. त्यांनी 12,976 मतांनी विवेक विजय मिळवत भाजपच्या शक्ती सिंग हाडा यांचा पराभव केला.

अलवर मतदारसंघात भाजपचे जसवंत सिंग यादव यांनी काँग्रेसच्या करण सिंग यादव यांना कडव्या झुंजीत धोबीपछाड केलं.

अजमेर मतदारसंघात काँग्रेसच्या रघू शर्मा यांनी भाजपच्या रामस्वरूप लांबा यांना हरवलं.

वसुंधरा विरुद्ध पायलट

राजस्थानमध्ये डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुकांकडे विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिलं जात आहे. भाजपच्या मुख्यमंत्री वसंधुरा राजे यांच्यासाठी या पोटनिवडणुका अग्निपरीक्षा होती.

राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्याकडे काँग्रेसची धुरा आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासाठी हा विजय मोठा आहे.

काँग्रेस तसंच भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने पोटनिवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हा सामना वसुंधरा राजे विरुद्ध सचिन पायलट असाच रंगला.

'भाजपला नाकारलं'

लोकांनी भाजपला नाकारलं असल्याचं काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधींनी म्हटलंय.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

तर आम्ही अजून मेहनत करू, असं मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनी म्हटलंय.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

बंगालमध्ये तृणमूल

ममता बॅनर्जी

फोटो स्रोत, DIPTENDU DUTTA

फोटो कॅप्शन, ममता बॅनर्जी

राजस्थानमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का बसला असला बंगालमध्ये ममतांची घोडदौड कायम आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने नाओपाडा ही विधानसभेची जागा काँग्रेसकडून हिसकावून घेतली आहे.

उलबेरिया या मुस्लीमबहुल लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत तृणमूलच्या साजीदा अहमद यांनी भाजपच्या अनुपम मलिक यांचा तब्बल साडे चार लाख मतांनी परभाव केला.

तृणमूलच्या सुलतान अहमद यांच्या निधनानंतर ही जागा रिकामी झाली होती. उलबेरियामध्ये 76 टक्के तर नोआपाडा मतदारसंघात 75 टक्के मतदान झालं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)