रजनीकांत यांची राजकारणात एंट्री

rajanikant

फोटो स्रोत, Getty Images

सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात सक्रिय व्हायचं ठरवलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा रजनीकांत यांनी रविवारी सकाळी केली.

गेली दोन दशकं रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा होती. अखेर, चेन्नई येथील राघवेंद्र कल्याण मंडप इथं रविवारी सकाळी त्यांनी समर्थकांच्या उपस्थितीत राजकारण प्रवेशाची घोषणा केली.

rajanikant

फोटो स्रोत, Getty Images

तामिळनाडू विधानसभेच्या सर्व 234 जागा त्यांचा पक्ष लढवणार आहे. लगेचच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मात्र एवढ्या कमीवेळात लढवता येणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.

या भाषणात काय म्हणाले रजनीकांत -

  • आगामी विधानसभा निवडणुकींपर्यंत एक राजकिय पक्ष स्थापन करणं ही काळाची गरज आहे.
  • 2021 मध्ये होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत आम्ही सर्व 234 जागांवर निवडणूक लढवणार आहोत. लोकशाहीच्या युद्धावेळी आम्ही संपुर्ण शक्तीनिशी कार्यरत राहू.
  • या संकटसमयी मी जर राजकारणात नाही आलो तर माझ्यासाठी ती शरमेची बाब असेल. आणि हो, हा सिनेमा नाही. हे सत्य आहे.
रजनीकांतच्या भाषणावेळी उत्साही दिसणारे कार्यकर्ते
फोटो कॅप्शन, रजनीकांतच्या भाषणावेळी उत्साही दिसणारे कार्यकर्ते
  • तामिळनाडूत लोकशाहीची अवस्था बिकट आहे. त्यामुळेच व्यवस्थेत बदल होणं गरजेचं आहे.
  • मी भित्रा नाही. त्यामुळंच मी मागे हटणार नाही. कर्तव्याच्या जोरावर मी पुढील वाटचाल करीन.
  • मी राजकारणात प्रसिद्धीसाठी किंवा पैसा कमावण्यासाठी येत नाही. तुम्ही लोकांनी मला अमाप प्रसिद्धी आणि पैसा दिला. माझ्या अपेक्षेपेक्षा एक हजार पट जास्त.
  • त्याच वेळी मी सत्तेसाठी राजकारणात प्रवेश करणार नाही. जर मी असं केलं तर मी अध्यात्मवादी होण्यास पात्र ठरणार नाही.
कार्यकर्ते
  • जाती किंवा सांप्रदायिक प्रवृत्तीशिवाय एक आध्यात्मिक पद्धतीचं राजकारण करणं हे माझं ध्येय आहे.
  • पूर्वीच्याकाळी राजे आणि त्यांच्या सैन्यांनी इतर देशांवर आक्रमण करून लूट केली. पण आता सत्ताधारी त्यांच्या स्वतःच्याच लोकांना लुबाडत आहेत.
  • मला पक्षासाठी कार्यकर्ता नको. लोकांच्या हक्कांचं रक्षण करू शकतील असे रक्षणकर्ते मला हवेत.
रजनी फॅन
फोटो कॅप्शन, रजनी फॅन
  • आपण लोकांना पक्षाचा अजेंडा आणि धोरणं समजावून सांगू. एकदा निवडून आल्यावर लोकांना दिलेलं वचन पाळण्यात आपण कमी पडलो तर तीन वर्षांतच आपण सत्तेचा राजीनामा देऊ.
  • ते म्हणतात, कार्यकर्ते हे कोणत्याही पक्षाचे मुळं असतात. पण मी म्हणतो ते मुळंच नाही तर फांद्या आणि झाडाचा प्रत्येक भाग असतात. आमदार, खासदार, मुख्यमंत्री हे तेथूनच येतात.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)