काश्मीरमध्ये जहालवाद्यांच्या हल्ल्यात 4 जवानांचा मृत्यू

फोटो स्रोत, Getty Images
- Author, माजिद जहांगीर
- Role, श्रीनगरहून बीबीसीसाठी
काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात रविवारी पहाटे जहालवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
श्रीनगरहून सुमारे 32 किलोमीटरवर लेथपुरा इथं असलेल्या CRPFच्या 185 बटालियनवर हा हल्ला झाला. हल्ल्यामध्ये जीवितहानीबरोबरच दोन जवान जखमी झाले आहेत.
मृत झालेल्या चार जवानांपैकी तिघांचा मृत्यू गोळी लागून तर एका जवानाचा मृत्यू ह्रदयविकाराचा झटका येऊन झाला.
चकमकीत दोन जहालवादीही मारले गेले आहेत.
हा हल्ला पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास झाला. जहालवाद्यांनी कॅम्पमध्ये घुसण्याआधी हँडग्रेनेड फेकले होतं. तसंच फायरिंग केली होती.
कॅम्पमध्ये अजूनही दोन ते तीन जहालवादी घुसलेले आहेत, अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यानं दिली.
CRPFच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जहालवादी कॅम्पमध्येच आहेत. पण सध्या गोळीबार बंद झालेला आहे.
याचवर्षी ऑगस्ट महिन्यात पुलवामामध्येच आत्मघाती हल्लेखोरांनी पोलीस लाईनला लक्ष्य केलं होतं.
या हल्ल्यात सुरक्षा दलाचे आठ जवान मारले गेले होते. तर प्रत्युत्तरात तीन जहालवादी मारले गेले होते.
आणखी वाचा -
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








