You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राहुल आणि सोनिया गांधी हिंदू आहेत की नाहीत?
- Author, रशिद किदवई
- Role, ज्येष्ठ पत्रकार
सोमनाथ मंदिराला भेट दिल्यानंतर आई सोनिया गांधीसारखीच राहुल गांधी यांची वैयक्तिक आणि खासगी बाब असलेली त्यांची आस्था हा चर्चेचा विषय ठरली आहे.
या ऐतिहासिक मंदिरात काँग्रेसच्या भावी अध्यक्षांची नोंद बिगर हिंदू म्हणून नोंद केल्यानं ट्विटर आणि इतर माध्यमांत एकच गोंधळ उडाला.
हिंदू नसलेल्या सर्व लोकांना या मंदिरात आपली ओळख सांगावी लागते.
या घटनेनंतर भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी लगेच ट्वीट केलं, "शेवटी राहुल गांधी यांनी आपली धार्मीक ओळख स्पष्ट केली. त्यांनी नियमाप्रमाणे सोमनाथ येथील मंदिरात हिंदू नसलेल्या रजिस्टरमध्ये नोंद केली."
पुढे ते विचारतात, "जर ते श्रद्धेने हिंदू नसतील तर त्याचं पालन तर ते अजिबात करत नाही मग ते मंदिरात जाऊन ते लोकांना का फसवत आहेत?"
काहीतरी गडबड झाल्याचं लक्षात येताच स्पष्टीकरण देण्यासाठी अस्वस्थ काँग्रेसजन तातडीनं कामाला लागले. त्यांच्या अधिकृत @INCIndia या ट्विटर हँडलने कमेंट केली, "सोमनाथ मंदिराला भेट देणाऱ्यांसाठी एकच रजिस्टर आहे. त्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सही केली. बाकी सगळे फोटो जे पसरवले जातात आहे ते बनावट आहेत. आगतिक परिस्थितीमुळं आततायीपणा करावा लागत आहे का?"
टीव्ही पत्रकार ब्रजेश कुमार सिंग म्हणाले, "राहुल यांच्या सोमनाथ भेटीदरम्यान त्यांच्या माध्यम समन्वयक असलेल्या मनोज त्यागी यांनी हिंदू नसलेल्या लोकांसाठी असलेल्या विशेष रजिस्टरमध्ये राहुल गांधी आणि अहमद पटेल यांच्या नावाची नोंद केली. ऐन निवडणुकांच्या वेळी झालेली ही चूक फार मोठी आहे."
त्यागी यांनी देखील खुलासा केला. "माध्यमांच्या प्रतिनिधी आणि माझ्या नावाची नोंद केली. त्यात राहुल गांधी किंवा अहमद पटेल यांच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. त्यांची नावं नंतर लिहिली असावीत," असं ते म्हणतात.
पण सोमनाथ मंदिराचे जनसंपर्क अधिकारी ध्रुव जोशी यांचा रोख त्यागी यांना दोषी ठरवण्यावर आहे.
ते म्हणाले, "राहुल गांधी आणि अहमद पटेल यांचं नाव राहुल गांधी यांचे माध्यम समन्वयक असलेल्या मनोज त्यागी यांनी नोंदवलं. नियमाप्रमाणे हिंदू नसलेल्या सगळ्या व्यक्तींना प्रवेशद्वाराजवळ असलेल्या सिक्युरिटी पाँईटवर नोंद करणं आवश्यक आहे."
जुनाच वाद
यामुळं काही वर्तुळात राहुल गांधी हे हिंदू आहेत की नाही यावर वाद सुरू झाला. यानिमित्ताने राहुल गांधींची आई म्हणजेच सोनिया गांधी यांना राजीव गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यावर याचा गोष्टींचा सामना करावा लागला होता, याची आठवण होते.
सोनिया गांधी यांनी 1998 साली राजकारणात प्रवेश केल्यापासून त्या आपल्या धार्मीक श्रद्धेबद्दल निर्माण होणारा वाद टाळतात. उलट विश्लेषकांचं म्हणणं असं आहे की राजकीय कारणांमुळं त्यांच्या पालकांच्या पसंतीस पडण्यापलीकडं त्यांचा हिंदुत्वाकडे कल वाढला आहे.
1999 च्या निवडणुकांच्या वेळी संघ परिवाराने सोनिया गांधी त्यांच्या विदेशी असण्यावरून आणि ख्रिश्चन धर्मावरून 'राम राज्य विरुद्ध रोम राज्य' असं अभियान सुरू केलं होतं. तेव्हा भारतातील रोमन कॅथलिक असोसिएशनने सोनिया कॅथलिक असल्याचा आश्चर्यकारकरीत्या इन्कार केला होता.
सोनिया आणि राजीव यांच्या लग्नानंतर श्रद्धास्थळावर जाताना सोनिया राजीव यांच्याबरोबर असत. त्यांच्या डोक्यावर पदर असायचा आणि तिथल्या श्रद्धास्थानाला त्या वाकून नमस्कार करत. 1989 च्या निवडणुकीच्या आधी जेव्हा राजीव यांनी देवराह बाब यांना आमंत्रित केलं तेव्हा त्या राजीव यांच्याबरोबर होत्या.
हे बाबा लाकडी भागावर राहत असत. तसंच जमिनीपासून सहा फूट उंचीवर असलेल्या मचाणावर झोपत. कोणत्याही मानवी लहरीपासून ते दूर राहण्याठी ते असं करत. त्यांची आशीर्वाद देण्याची पद्धत वेगळी होती. ते भक्तांना लाथ मारायचे. नंतर एकदा राजीव आणि सोनिया गुजरातमधील अंबाजी मंदिरात गेले. या मंदिराला ही त्यांची दुसरी भेट होती. यापूर्वी त्या इंदिरा गांधी यांच्याबरोबर 1979 साली या मंदिराला भेट दिली होती. 1979-80 च्या 'करा किंवा मरा' अशी स्थिती असलेल्या या निवडणुकीला सामोरे जाताना इंदिरा यांनी भेट दिली होती. अंबाजी यांनी इंदिरा यांना आशीर्वाद दिला आणि त्यांनी पुन्हा सत्ता काबीज केली.
तिरुपतीला भेट
1998 च्या निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी काँग्रेस अध्यक्ष आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिराला भेट दिली होती.
AICC अध्यक्षांनी तेव्हा लिहिलं होतं की त्या त्यांचे पती आणि सासुबाईंच्या धर्माचं पालन करतात. आपण हिंदू असल्याचा उल्लेख करणं त्यांनी बंद केलं होतं पण त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यासाठी 'दर्शनाची' व्यस्था केली. त्यात टीटीडी सुब्बी रमी रेड्डी यांचा देखील समावेश होता.
सोनिया यांनी बालाजीचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले.
त्यांच्या तिरुपती भेटीनंतर काँग्रेस कार्यकारी समितीने एक ठराव संमत केला. त्यात हिंदूत्वामुळेच भारतात धर्मनिरपेक्षतेची शाश्वती असल्याचं नमूद केलं होतं.
नेपाळबरोबर संबंध बिघडले
1989 साली जेव्हा सोनिया राजीव यांच्याबरोबर काठमांडूला गेल्या त्यावेळी त्या भेटीचा खूप बोलबाला झाला होता. राजीव तेव्हा नेपाळबरोबरचे संबंध सुधारायचे प्रयत्न करत होते.
नेपाळ हा जगात एकमेव हिंदू देश आहे. ऐतिहासिक पशुपतिनाथ मंदिराला भेट देईपर्यंत राजीव आणि बिरेंद्र यांचे चांगले संबंध होते. तिरुपती आणि पुरी येथे पवित्र स्थळी हिंदू नसलेल्यांना प्रवेश करण्यास नकार दिला. राजीव आणि सोनिया यांना नेण्याचा आग्रह केला. पण तेथील पुजाऱ्यांनी नकार दिला.
राजे बिरेंद्र यांना देखील याप्रकरणात या 'देवदूतां'समोर हस्तक्षेप करता आला नाही. त्यावेळी अशी चर्चा होती की बिरेंद्र यांच्या पत्नी राणी ऐश्वर्या यांचा मंदिराच्या विश्वस्त मंडळावर प्रभाव होता. त्यांनी सोनियांना प्रवेश मिळू नये यासाठी कडक भूमिका घेतली होती.
राजीव यांना या घटनेमुळे प्रचंड अपमानित झाल्यासारखं वाटलं. राजाचा आपल्याला अपमानित करण्याचा मार्ग आहे अशी त्यांची भावना झाली. ते पशुपतिनाथला भेट न देताच परतले आणि दोन देशांमधील संबंध सुधारण्याऐवजी आणखीच बिघडले.
भारत नेपाळ या अत्यंत नाजूक असलेल्या सीमेवर आर्थिक निर्बंध घातले. त्यामुळे नेपाळचं खूप नुकसान झालं. भारताविरुद्ध संताप वाढायला सुरूवात झाली आणि राजाच्या विरोधकांकडून त्यांच्यावर खूप दबाव येण्यास सुरूवात झाली. दोन देशांमध्ये तह झाला. तत्कालीन परराष्ट्र सचिव के. नटवर सिंग यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आणि राजाबरोबर गुप्तपणे वाटाघाटी केल्या.
जानेवारी 2001 साली काँग्रेस अध्यक्षांनी प्रचंड धार्मिक महत्त्व असलेल्या अलाहाबादच्या कुंभ मेळ्यादरम्यान पवित्र स्नान करण्याचा निर्णय घेतला. 24 जानेवारी 2001 साली त्रिवेणीत पवित्र स्नान करून दुहेरी हेतू साध्य केला.
पहिला म्हणजे त्यांनी त्यांच्या मूळ परदेशी वंशाबद्दल असलेल्या वादावर त्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आणि दुसरं म्हणजे संघाच्या उदारमतवादी आणि मध्यममार्गी ब्रँडला पर्याय म्हणून स्वत:ला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे.
सोनिया गांधींचे गंगा, गणपती, कुलदेवतेची आणि त्रिवेणीची पूजा करतानांचे फोटो सगळीकडे वितरीत झाले. एका हिंदू पुजाऱ्याने दिलेला लाल धागा त्यांनी बांधला होता. त्यांची या धाग्यावर खूप श्रद्धा आहे. सगळ्या धोक्यापासून रक्षण होईल, अशी त्यांची श्रद्धा आहे. घरात कोणताही कार्यक्रम असला की ते या पंडिताला वाराणसीहून धार्मीक विधीसाठी बोलवतात.
जेव्हा प्रियंकांचा मुलगा रेहानचा जन्म झाला तेव्हा एका पंडितानं मोठी पूजा आयोजित केली होती आणि बाळाचं नामकरण केले.
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)