सोशल : 'इतरांचंच ऐकायचं असेल तर मग सेन्सॉर बोर्ड रद्दच करा ना!'

पद्मावती

फोटो स्रोत, Twitter

वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती' या चित्रपटाविरुद्ध आता भाजप आमदार मंगल प्रभात लोढा हेही मैदानात उतरले आहेत.

'चित्रपटात भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या व्यक्तीचे चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्यात आले आहे. त्यामुळे अशा चित्रपटावर महाराष्ट्रात बंदी घालावी', अशी मागणी भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.

मंगल प्रभात लोढा यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे. या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने आपल्या वाचकांना विचारलं होतं की, 'पद्मावती' चित्रपटावर महाराष्ट्रात बंदी घालावी, या भाजप आमदार लोढांच्या मागणीबद्दल तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न विचारला होता. त्यावर अनेकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.

संजय वावळे म्हणतात, 'पैशासाठी चाललेला हा मांडवलीचा खटाटोप आहे. चित्रपट 500 कोटीहून जास्त धंदा करणार, पण यांचा विरोध हा केवळ पैशांसाठी आहे."

प्रतिक्रिया

फोटो स्रोत, Facebook

'बाजीराव मस्तानी'च्यावेळी लोढा कुठं होते? असा सवाल हृषिकेश मोराणकर यांनी उपस्थित केला आहे.

प्रतिक्रिया

फोटो स्रोत, Facebook

कल्पेश तेली तर संजय लीला भन्साळींना आव्हान देतात. 'हिंदू सोडून इतर कुठल्या समाजाच्या इतिहासावर चित्रपट बनवून दाखवा', असं ते लिहितात.

प्रतिक्रिया

फोटो स्रोत, Facebook

मंगेश जाधव यांनी पद्मावती प्रदर्शित न केल्याने कोणाला काहीच फरक पडत नाही, असं मत व्यक्त केलं आहे.

प्रतिक्रिया

फोटो स्रोत, Facebook

'सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी प्रमाणपत्र सेन्सॉर बोर्ड देतं. मग इतरांचं ऐकण्याचा विषयच कुठे येतो. जर यांचं ऐकायचं असेल तर सेन्सॉर बोर्ड रद्द करा', अशी प्रतिक्रिया महिला मंडळ फोंडाघाट यांनी नोंदवली आहे.

प्रतिक्रिया

फोटो स्रोत, Facebook

एखाद्या चित्रपटाला विरोध करण्याऐवजी, तेवढाच वेळ शेतकरी प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी दिला असता तर शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळाले असते, असं मत रामेश्वर पाटील यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया

फोटो स्रोत, Facebook

'कोणताही चित्रपट आपण रसिक वृत्तीनं बघितला पाहिजे', असं सांगत माऊली रुद्र यांनी सरकारला भावनिक राजकारण थांबवा आणि आम्हाला अच्छे दिन दाखवा, असा सल्ला दिला आहे.

प्रतिक्रिया

फोटो स्रोत, Facebook

मूलभूत प्रश्नावरून लक्ष विचलित करण्याचे उद्योग सुरू असल्याची प्रतिक्रिया हितेन पवार यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया

फोटो स्रोत, Facebook

तर शुभम गौराजे यांच्यासह अनेकांनी महाराष्ट्रात बंदी घातली तर काहीच फरक पडणार नाही, असं म्हटलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)