You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कसा कराल विजेशिवाय मोबाईल चार्ज?
तुम्ही सकाळी उठता आणि बघता की मोबाईलची बॅटरी संपली आहे. चार्जिंगला लावता आणि नेमकी वीज गेलेली असते. त्यातल्या त्यात पावर बँकही डिस्चार्ज झालेली. किंवा कधी असंही झालं असेल ना की तुम्ही डोंगर-दऱ्यात फिरायला गेल्यावर फोटो काढतांना तुमच्या मोबाईलची बॅटरीच संपली.
चिंता नको. या तीन सोप्या स्टेप्स पटकन शिकून विजेशिवाय मोबाईल चार्ज करा!
गरजेचं सामान
एक कार युएसबी अडाप्टर (कारमधलं सिगरेट लायटर), युएसबी केबल, 9 वोल्टची बॅटरी, धातूची एक चीप आणि एक पेनाची स्प्रिंग किंवा स्क्रू आवळण्याचा पाना.
आता तुम्हाला बॅटरीतून वीज निर्माण करून मोबाईलपर्यंत पोहोचवायची आहे. त्यासाठी कमी तीव्रतेचं इलेक्ट्रिकल फिल्ड निर्माण करावं लागणार आहे, ज्यानं मोबाईल चार्ज करता येईल.
पहिली स्टेप
एका बॅटरीला दोन पोल असतात - एक पॉसिटिव आणि एक निगेटिव. या दोन्ही बाजुंना जोडणाऱ्या कोणत्याही माध्यामातून विद्युत प्रवाह होतो. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला निगेटिव पोलकडे धातूची चीप लावा.
दुसरी स्टेप
कार अडाप्टरला दुसऱ्या बाजुला म्हणजे पॉसिटीव पोलला जोडा. यातून इलेक्ट्रिक फिल्ड तयार होईल.
तिसरी स्टेप
आता चीपचे टोक आणि अडाप्टरच्या धातूकडच्या बाजूला जोडा. याने बॅटरीमधील इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह सुरू होऊन वीज निर्माण होण्यास सुरुवात होते.
सगळ्या बॅटरींमध्ये इलेक्ट्रोलाइट आणि रासायनिक तत्वं असतात. त्यांच्यात प्रक्रीया होऊन इलेक्ट्रॉन्स तेजीने वाहतात आणि वीज निर्माण होते.
आणि तूमचा विजेशिवाय चालणारा चार्जर तयार आहे!
हा चार्जर मोबाईलच्या चार्जिंग पॉइंट मध्ये लावा की लगेच तुमचा फोन सुरू होईल.
ही क्लृप्ती तूम्ही अटीतटीच्या वेळी वापरू शकता.