सप्टेंबर महिन्यात का वाढतं नैराश्य?

फोटो स्रोत, Getty Images
वातावरण बदलतं, तसं तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, सर्व काही ठीक असूनसुद्धा काहीतरी हरवल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही 'सप्टेंबर ब्लूज'चे शिकार असू शकता.
अशा प्रकारचा अनुभव घेणारे तुम्ही एकटे नाही. सामान्यत: सप्टेंबर महिन्यात उत्तर गोलार्धातील अनेकांना असा अनुभव येतो.
त़़ज्ज्ञांच्या मते, हिवाळ्याच्या सुरुवातीला हा अनुभव अधिक तीव्रपणे जाणवतो. वातावरण बदलामुळे आरोग्याशी निगडीत समस्यांना 'सप्टेंबर ब्लूज' असं म्हणतात.
या महिन्यात दिवस छोटा असतो. तसंच दक्षिणेकडील देशांच्या तुलनेत पश्चिमेकडच्या देशांत 'सप्टेंबर ब्लूज'चा परिणाम अधिक असतो.
पण, यापासून स्वत: ला कसं वाचवायचं हे तुम्हाला माहिती असेल तर या हिवाळ्याचा तुम्ही चांगल्याप्रकारे अनुभव घेऊ शकता.
काय आहे नेमका एसएडी आजार?
वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या या आजारांना सीझनल अॅफेक्टिव डिसऑर्डर (एसएडी) असं संबोधलं जातं. दरवर्षी ऋतू बदलाच्या वेळी असे आजार अनेकांना होतात. ब्रिटनच्या सरकारी आरोग्य सेवा 'एनएचएसतनुसार, 'ब्रिटनमध्ये दर 15 व्यक्तींमागे एक व्यक्ती या आजाराची शिकार झालेला असतो.'
यापासून कसे वाचाल?
'यापासून स्वत:चा बचाव करण्याकरता, आरोग्याशी संबंधित सगळ्या सवयी व्यवस्थितपणे पाळायला हव्यात', असं मानसोपचार तज्ज्ञ शेरिलिन थॉम्पसन सांगतात.








