महाराष्ट्रातल्या या शाळांमध्ये पहिलीपासून सेक्स एज्युकेशन, कशी आहे शिकवण्याची पद्धत?
महाराष्ट्रातल्या या शाळांमध्ये पहिलीपासून सेक्स एज्युकेशन, कशी आहे शिकवण्याची पद्धत?
शाळेत पहिलीपासून लैंगिकता शिक्षण सहजपणे देण्यासाठी प्रयास आरोग्य गटाने एक मॉड्युल तयार केलंय. या शिक्षणपद्धतीचं नाव सहज- म्हणजे सन्मान, हक्क, जबाबदारी असं आहे.
फलटणच्या कमला निंबकर बालभवन या शाळेत पहिलीपासून लैंगिकता शिक्षण विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. अहिल्यानगरच्या ऊर्जा गुरुकूल, पुण्याच्या अक्षर नंदन शाळा यासह इतर शाळांमधूनही हा अभ्यासक्रम शिकवला जातोय.
सुरुवातीला संस्थेचे प्रशिक्षक काही काळ हे वर्ग घेतात. आणि नंतर हे शिक्षण शिक्षक पुढे नेतात. सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात हे शिक्षक यशस्वी झाले आहेत. मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये याचे सकारात्मक परिणाम पहायला मिळाल्याचं शिक्षक आणि पालक सांगतायत.
रिपोर्ट- प्राची कुलकर्णी
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






